भारती एअरटेलमधील सर्व हिस्सा विकून स्पर्धक व्होडाफोन बाहेर पडली आहे. व्होडाफोनचा एअरटेलमध्ये ४.२ टक्के हिस्सा होता. तो कंपनीने २० कोटी डॉलरना विकला आहे. एअरटेल व व्होडाफोन या भारतातील मोबाइल सेवा क्षेत्रात ग्राहकसंख्येने अनुक्रमे क्रमांक एक व दोनच्या कंपन्या आहेत. अधिकाधिक ग्राहकसंख्या मिळविण्यात उभय कंपन्यांची तीव्र स्पर्धा आहे.
एकाच क्षेत्रातील स्पर्धक कंपन्यांमधील हिश्श्याबाबत सरकारच्या नव्या नियमानुरूप व्होडाफोनने हा निर्णय घेतला आहे. याबाबतच्या आधीच्या नियमात कंपन्यांना ९.९ टक्क्यांपर्यंत हिस्सा ठेवण्यास परवानगी होती. मात्र आता नव्या नियमाप्रमाणे एकाच परिमंडळात एकापेक्षा अधिक कंपन्यांचे व्यवसाय परवाने असल्यास संबंधित कंपन्यांमध्ये हिस्सेदारी करता येणार नाही.

Story img Loader