फोक्सवॉगनच्या चाकण येथील प्रकल्पात राबविण्यात येणाऱ्या ‘थिंक ब्ल्यू फॅक्टरी’ या पर्यावरणपूरक उपक्रमांतर्गत जैविक कचऱ्यापासून बायोगॅस निर्मितीचा प्रकल्प उभारला आहे.
फोक्सवॉगन इंडियाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक महेश कोदुमुदी, नियोजन व उत्पादन अभियांत्रिकी विभागाचे संचालक वुल्फगँग होलमन यांच्या प्रमुख उपस्थितीत या प्रकल्पाचे बुधवारी उद्घाटन करण्यात आले. सुमारे दहा टनांचा मासिक जैविक कचऱ्याचे या प्रकल्पात विघटन करून त्याचा पुनर्वापर व स्वयंपाकाचा गॅस तयार करण्यात येणार आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून दरवर्षी १०० टन कटरा कमी होऊ शकणार असून, कार्बन डायऑक्साइडचे वार्षिक उत्सर्जनही कमी करण्यास मदत होईल, असे होलमन यांनी सांगितले. कंपनीच्या या उपक्रमाच्या माध्यमातून कार्बनच्या उत्सर्जनामध्ये ६.४ टक्क्य़ांची घट तर ऊर्जेच्या वापरामध्ये ५.५ टक्क्य़ांनी घट झाली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा