स्वित्र्झलडच्या आरामदायी कार उत्पादक कंपनी व्हॉल्वोने भारतात तिची व्ही४० ही क्रॉस कंट्री कार सादर केली आहे. पेट्रोलवरील १.६ जीडीटीआय इंजिनचा समावेश असलेल्या या कारचे अनावरण कंपनीचे भारतातील व्यवस्थापकीय संचालक थॉमस एर्नबर्ग यांनी सोमवारी मुंबईत केले.
व्होल्वोच्या प्रवासी कार श्रेणीतील व्ही४० या वाहनाची किंमत २७ लाख रुपये आहे. व्होल्वो नाममुद्रेंतर्गत कंपनीच्या एस८०, एस६०, एक्ससी६०, व एक्ससी९० या प्रवासी कार आहे. छोटय़ा प्रवासी कार श्रेणीत व्हॉल्वो ही निस्सान, रेनो या नव्या दमाच्या कंपन्यांबरोबर वाटचाल करत आहे.
गेल्या वर्षांत १,२०० कारची विक्री नोंदविणाऱ्या या कंपनीने यंदा २,००० विक्रीचे लक्ष्य राखले आहे. २०१५ च्या पहिल्या तिमाहीत तब्बल १०० टक्के विक्री वाढ नोंदवित कंपनीने ५०० प्रवासी वाहने विकली आहेत. येत्या चार ते पाच महिन्यात कंपनी आणखी दोन वाहन प्रकार सादर करणार आहे.

Story img Loader