तुम्ही चार वर्षांहून अधिक काळ एकाच ठिकाणी काम करत आहात का? जर होय, असं उत्तर असेल तर ही बातमी फक्त तुमच्यासाठी आहे. माणूस कामाला लागला की त्याला ग्रॅच्युइटीबद्दल फारशी माहिती नसते. पण नोकरीमध्ये जसा वेळ वाढतो, तसतशी त्याबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता माणसाला असते. असं असलं तरी, आजकाल ग्रॅच्युइटीबद्दल खूप चर्चा होत आहे.

ग्रॅच्युइटी म्हणजे काय?

एकाच कंपनीत जास्त वर्ष काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पगार, पेन्शन आणि भविष्य निर्वाह निधीशिवाय ग्रॅच्युइटीही दिली जाते. ग्रॅच्युइटी हे कंपनीकडून कर्मचाऱ्याला दिले जाणारे बक्षीस आहे. जर कर्मचाऱ्याने नोकरीच्या काही अटींची पूर्तता केली, तर त्याला विहित सूत्रानुसार ग्रॅच्युईटी पेमेंटची हमी दिली जाईल. कर्मचार्‍यांच्या पगारातून ग्रॅच्युइटीचा एक छोटासा भाग कापला जातो, पण मोठा हिस्सा कंपनीकडून दिला जातो. सध्याच्या नियमांनुसार, जर एखाद्या व्यक्तीने कंपनीत किमान ५ वर्षे काम केले असेल, तर तो ग्रॅच्युइटीचा हक्कदार आहे.

टॅक्स-फ्री ग्रॅच्युइटी

१९७२ च्या पेमेंट ऑफ ग्रॅच्युइटी कायदा अंतर्गत, याचा लाभ अशा कंपनीच्या कर्मचार्‍यांना होतो जिथे १० पेक्षा जास्त लोकं काम करणासाठी उपलब्ध आहे. जर कर्मचाऱ्याने नोकरी बदलली, सेवानिवृत्त झाला किंवा कोणत्याही कारणाने नोकरी सोडली परंतु त्याने ग्रॅच्युइटीचे नियम पूर्ण केले तर त्याला ग्रॅच्युइटीचा लाभ मिळतो. सरकारने टॅक्स फ्री ग्रॅच्युइटीची रक्कम १० लाखांवरून २० लाख रुपये केली आहे.

किती वर्षाच्या नोकरीवर मिळेल ग्रॅच्युइटी?

त्याचे एक निश्चित सूत्र आहे.

एकूण ग्रॅच्युइटीची रक्कम = (अंतिम वेतन) x (१५/२६) x (कंपनीत किती वर्षे काम केले)

समजा एका कर्मचाऱ्याने एकाच कंपनीत २० वर्षे काम केले. त्या कर्मचार्‍याचे अंतिम वेतन ७५००० रुपये आहे. येथे एका महिन्यात केवळ २६ दिवस मोजले जातात, कारण असे मानले जाते की ४ दिवस सुट्ट्या असतात. त्याच वेळी ग्रॅच्युइटीची गणना वर्षातील १५ दिवसांच्या आधारे केली जाते.
ग्रॅच्युइटीची एकूण रक्कम = (७५०००) x (१५/२६) x (२०) = ८,६५,३८५ रुपये

अशा प्रकारे, ग्रॅच्युइटीची एकूण रक्कम ८,६५,३८५ रुपये होईल.

किती वर्षांसाठी नोकरीवर ग्रॅच्युइटी

जर एखाद्या कंपनीतील कर्मचाऱ्याने साडेचार वर्षांपेक्षा जास्त म्हणजे ४ वर्षे ७ महिने काम पूर्ण केले, तर अशा परिस्थितीत शेवटचे वर्ष कर्मचाऱ्याचे पूर्ण वर्ष मानले जाते. म्हणजेच, जर कर्मचारी गेल्या वर्षात ६ महिन्यांपेक्षा जास्त काळ काम करत असेल तर त्याला कंपनीकडून ग्रॅच्युइटी दिली जाते. तथापि, मृत्यू किंवा अपंगत्व असल्यास ग्रॅच्युइटीच्या रकमेसाठी ५ वर्षे सेवा पूर्ण करणे आवश्यक नाही.