सोन्याच्या किंमतीत गेल्या काही वर्षांत सतत होत असणारी वाढ ही सरकारसाठी मोठी चिंतेची बाब ठरू पाहत आहे. गेल्या ५ वर्षांत दरवर्षी सोन्याचा भाव जवळपास २५% वाढत गेला आहे. अंदाजे १९६०-६१ मध्ये सोन्याच्या १० गॅ्रमची किंमत १८० रुपये होती. आज तोच भाव १० गॅ्रमला ३० ते ३१ हजार रुपयांच्या आसपास आहे. सोने एवढे महागले असतानाही २००७-२००८ या वर्षांत भारताने ५३७ टन सोन्याची आयात केली. तर २०१०-११ मध्ये ती १,००४ टनांपर्यंत वाढत गेली आहे. नंतर ती थोडी कमी झाली आणि या प्रचंड सोन्याच्या आयातीमुळे देशाच्या चालू खात्यातील तुटीमध्ये खूप मोठी वाढ होत आहे. हीच गोष्ट सरकारसाठी मोठय़ा काळजीचे कारण ठरत आहे.
१९९०-९१ मध्ये देशाजवळ वस्तूंची आयात करण्यासाठी १०-१५ दिवस पुरेल एवढाच परकीय चलनाचा साठा होता. तेव्हा सरकारने आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडे वस्तूंची आयात करण्यासाठी मोठय़ा प्रमाणावर सोने गहाण ठेवून परकीय चलन घेतले व कालांतराने ते सोने पुन्हा परत सोडवून आणले. अनेक आयुर्वेदिक औषधांमध्ये सोन्याचा वापर करतात. पूर्वी नोटा छापतांना काही प्रमाणात आधारभूत म्हणून सरकार सोने बाजूला ठेवत असे. आपल्याकडे श्रीमंत देवस्थानांच्याकडे भक्तांनी अर्पण केलेले कोटय़ावधी रूपयांचे सोने आहे. अशा प्रकारे जनमानसामध्ये सोन्याला मोठे स्थान आहे. हा पसा सोने धातूत अडकून पडतो व म्हणून तो आíथक व्यवहारात न आल्यामुळे आíथक प्रगती होण्यास या पशाची फारशी मदत होत नाही, असा काही अर्थतज्ज्ञांचा आक्षेप आहे. बँक, पोस्टाच्या ठेवी, शेअर अथवा म्युच्युअल फंड यात गुंतविलेल्या पशातून गुंतवणूकदारांना अपेक्षेइतका परतावा मिळत नाही. त्यामुळे देखील अनेकजण आपल्याकडील पसा हा सोन्यामध्ये अथवा जमीन खरेदीत गुंतवितात. बँकांमधील ठेवींवरील व्याजावरदेखील लोकांना उत्पन्न कर भरावा लागतो. वाढत्या महागाईच्या दिवसात गुंतवणूकदारांना हा परतावा कमी वाटतो. सोने ही अमूल्य वस्तू सध्या सरासरी २५% किंवा त्यापेक्षा जास्त वार्षकि परतावा देते, हे आता गुंतवणूकदारांच्याही लक्षात आले आहे. अशाप्रकारे सोन्याची किंमत व आयात वाढतच गेली.
सोन्याला मागणी वाढण्याचे आणखी एक महत्त्वाचे कारण असे आहे की, जगातील अनेक मध्यवर्ती बँका महत्त्वाच्या चलनांचा व सोन्याचा साठा राखीव म्हणून आपल्याकडे ठेवतात. परंतु २००८ मध्ये जागतिक मंदी सुरू झाल्यावर या मध्यवर्ती बँका, अमेरिकन डॉलर अथवा युरो यांचा राखीव म्हणून साठा करण्यापेक्षा सोन्याला प्राधान्य देऊ लागल्या व त्यांनीही मोठय़ा प्रमाणावर सोने खरेदी करण्यास प्रारंभ केला. सोन्यावरील विश्वास हा असा वाढतच गेला. भारतात रिझव्र्ह बँकेनेही मध्यंतरी बरेच सोने विकत घेतले. सोन्याच्या उत्पादनातही काही प्रमाणात घट झाली आहे. परिणामी मागणी वाढल्यामुळे सोन्याचा भाव वाढतच जात आहे. मधूनच तो कमीही होतो. पण तो नगण्यच. सोन्याची भाववाढ व जास्त मागणी यामुळे भारतातून फार मोठय़ा प्रमाणावर सोन्याच्या आयातीसाठी पसा बाहेर गेला व परिणामी चालू खात्यातील तूट वाढतच जात आहे. सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या एका ठराविक मर्यादेच्या प्रमाणाबाहेर जर तूट वाढली तर त्याचा विपरीत परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवर होतो. देशाची आíथक सक्षमता कमी होत असल्याचे हे लक्षण मानले जाते. प्रामुख्याने विदेशी गुंतवणूकदार अशा देशात पैसा टाकायला बिथरतात.
सोन्याची आयात कमी करण्यासाठी सरकारने अनेक उपाययोजना आखल्या आहेत व काही अद्याप सुरूही आहेत. नुकतेच सरकारने सोन्यावरील आयात शुल्क ४% वरून ६% वर नेले आहे. त्यामुळे सोने महाग होऊन त्याची मागणी कमी होईल तसेच भाव वाढण्याचा फायदा घेण्यासाठी गुंतवणूकदार काही प्रमाणात सोने विकूनही टाकतील. परंतु काहींच्या मते आयात शुल्क वाढल्यामुळे चोरटी आयात वाढण्यास मदतच होईल. बिगर बँकिंग वित्तसंस्थांनी त्यांच्याकडे गहाण ठेवलेल्या सोन्यावर त्या सोन्याच्या किंमतीच्या ६०% पेक्षा जास्त कर्ज देऊ नये तसेच मोठय़ा प्रमाणावर सोने खरेदी करणाऱ्या आयातदारांनी निर्यातदेखील वाढवावी, असे बंधन घातले आहे. हे आणि असेच काही आíथक उपाय सरकार व रिझव्र्ह बँकेचा कार्यगट यांनी सोन्याची आयात कमी होण्यासाठी सुचविले आहेत. त्याचा नेमका परिणाम काय हे येणारा काळ दाखवेलच!
सोन्याचे आकर्षण कशासाठी?
* भारतात सोने मोठय़ा प्रमाणावर खरेदी का केले जाते, याची अनेक सामाजिक, आíथक व भावनिक कारणे आहेत.
* सर्वसामान्य भारतीयांना पूर्वापार सोन्याचे मोठे आकर्षण हे मुख्यत: या धातूला परंपरागतरीत्या प्राप्त प्रतिष्ठेपायी आहे.
* चांगल्या प्रतीचे सोने वर्षांनुवष्रे तसेच राहते. अगदी थोडे पसे जवळ असले तरी सोने विकत घेता येते किंवा ते लगेच विकताही येते.
* लग्नकार्य, देणी-घेणी, आपत्कालीन प्रसंगात आíथक अडचणींचे निराकरण तात्काळ करण्यासाठी सोन्याची आवश्यकता आजही समाजाला वाटते.
* जवळ असलेले सोने बँकेत गहाण ठेऊन (बँकेकडून कर्जरूपात) आपल्या कुवतीनुसार व गरजेनुसार पसा अल्पवेळेत अगदी सहजसुलभ उभा करता येतो.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा