द्योजक त्याच्या क्षेत्रात ज्ञानी असतो; मात्र त्याच्याजवळ चारित्र्य नसेल तर त्यालाही भविष्य नसते असे प्रतिपादन करतानाच अपयश पचविणारे उद्योजकच यशस्वी ठरतात, असे ठाम मत गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी नुकतेच येथे व्यक्त केले.
‘उद्योगश्री’च्या वतीने दिले जाणाऱ्या विविध पुरस्कारांचे वितरण मुख्यमंत्री पर्रिकर यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. कॅम्लिन कोकोयोचे मानद अध्यक्ष सुभाष दांडेकर, सारस्वत बँकेचे अध्यक्ष एकनाथ ठाकूर, केसरी टूर्सचे अध्यक्ष केसरी पाटील, साहित्यिक मधु मंगेश कुलकर्णी, विश्वा उद्योग समूहाचे खेमराज हिंगणकर आदी यावेळी उपस्थित होते.
उद्योग क्षेत्रात नावलौकिक व यश मिळविण्यासाठी उद्योजक हा ज्ञानी व चारित्र्यवान असला पाहिजे; ही जाण केवळ त्याच्या व्यक्तिमत्त्वातच नव्हे तर आर्थिक तसेच सामाजिक जीवनातही दिसायला हवी, अशी अपेक्षाही स्वत: उद्योजक असलेल्या पर्रिकर यांनी यावेळी मांडली. मुंबई आयआयटीतील आपल्या उच्च शैेक्षणिक जीवनातील अनेक आठवणीही त्यांनी यावेळी जागविल्या.
‘इंडिको रेमिडिज’चे कार्यकारी अध्यक्ष सुरेश कारे यांना यावेळी २० व्या ‘उद्योगश्री जीवन गौरव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तर विविध ७ उद्योजक व ४ उद्योजिकांना ‘उद्योगश्री जीवन गौरव’ सन्मानाने गौरविण्यात आले.

Story img Loader