तांदूळ, गहू, डाळी, बटाटेसारख्या खाद्य वस्तूंच्या किंमती वधारत्या राहूनही डिसेंबरमधील घाऊक किंमत निर्देशांक काहीसा घसरून ७.१८ टक्क्यांवर आला आहे. पतधोरण निर्नायकीसाठी मध्यवर्ती बँकेला हा दर ५ ते ६ टक्के असणे आवश्यक आहे. रिझव्र्ह बँकेचे तिमाही पतधोरण २९ जानेवारी रोजी जाहिर होत आहे. सध्या रेपो दर ८ तर रिव्हर्स रेपो दर ७ टक्के आहे. वाढती महागाई ही चिंतेची बाब मानूनच रिझव्र्ह बँकेने एप्रिल २०१२ पासून प्रमुख व्याजदर कमी केलेले नाहीत. परिणामी नोव्हेंबरमधील शून्याच्याही खालचे औद्योगिक उत्पादन आणि अनपेक्षित ८ टक्के सकल राष्ट्रीय उत्पादनही दुर्लक्षिले गेले आहे. दरम्यान, सलग तिसऱ्या महिन्यात किरकोळ महागाईचा दर वधारला आहे.
घाऊक किंमत निर्देशांकात घसरण
तांदूळ, गहू, डाळी, बटाटेसारख्या खाद्य वस्तूंच्या किंमती वधारत्या राहूनही डिसेंबरमधील घाऊक किंमत निर्देशांक काहीसा घसरून ७.१८ टक्क्यांवर आला आहे. पतधोरण निर्नायकीसाठी मध्यवर्ती बँकेला हा दर ५ ते ६ टक्के असणे आवश्यक आहे.
First published on: 15-01-2013 at 12:16 IST
TOPICSअर्थसत्ता
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Wholeprise sensex fallen down