जागतिक अर्थव्यस्थेमध्ये गेले काही दिवस जी उलथापालथ सुरू आहे त्यावरून ‘अच्छे दिना’ची स्वप्ने बघणा-यांना थोडाफार धक्का बसणार आहे. तसेच  चहुबाजूंनी संकटे येत असताना त्याविरूध्द ठाम पावले उचलावी लागतील, नाहीतर ही अवस्था देशाच्या अर्थव्यवस्थेला अधिक अशक्त करून सोडेल, असे स्पष्ट मत लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांनी व्यक्त केले. सध्याच्या आर्थिक संकटाचा मुकाबला करण्यासाठी निर्यात अधिक असणे गरजेचे होते. मात्र, निर्यातीच्या आघाडीवर भारताची परिस्थिती फारच कमकुवत आहे. तसेच जागतिक बाजारपेठेत खनिज तेलाची किंमत घसरत असताना रूपयाचे होणारे अवमूल्यन आपल्या संकटात अधिक भर घालणारे आहे. देशातील उद्योगतींचाही भारतीय अर्थव्यवस्थेवरील विश्वास उडत चालला आहे, असेही फिक्कीच्या ताज्या अहवालात म्हटले आहे.

Story img Loader