वेगवेगळ्या बँकेत बचत खाती उघडायची असल्यास प्रत्येक ठिकाणी ‘केवायसी’ (नो युवर कस्टमर) कागदपत्रे द्यावी लागतात. शेअर बाजारात मात्र पुन्हा ‘केवायसी’ची गरज नसते. १ जानेवारी २०१२ पासून  एकत्रितपणे हा सर्व शेअर गुंतवणूकदारांचा ‘केवायसी’ तपशील साठवून त्याचे जतन करणारी संस्था म्हणजे केआरए- ङफअ अस्तित्त्वात आल्याने ही सोय झाली आहे. ही ‘केआरए’ प्रणाली कसे काम करते हे समजावून देणाऱ्या मालिकेतील हा दुसरा भाग..
० गुंतवणूकदार त्याचा केवायसी तपशील सीडीएसएलची उपकंपनी CVL-KRA कडे कशा प्रकारे नोंदवू शकेल?
उत्तर : CVL-KRA च्या मान्यताप्राप्त मध्यस्थाकडे जेव्हा गुंतवणूकदार जातो तेव्हा त्याला पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी लागते
६ मध्यस्थाकडून केवायसी फॉर्म घेऊन तो व्यवस्थित भरून मध्यस्थाकडे द्यावा.  उपरोक्त फॉर्म  http://www.cvlkra.com या वेबसाइटवरून डाऊनलोड देखील करता येईल
६ बिगर व्यक्तिगत स्वरूपाच्या संस्थानी  सेबीने सूचित   केल्याप्रमाणे कार्यालयीन स्थळाचा  पुरावा आणि ओळखपत्राचा पुरावा याची कागदपत्रे द्यावीत.
६ मध्यस्थ गुंतवणूकदारांची व्यक्तिश: पडताळणी करील (In Person Verification) त्यानंतर मध्यस्थ गुंतवणूकदाराचा केवायसी तपशील http://www.cvlkra.com या वेबसाइटवर नोंदवील तसेच संबंधित कागदपत्रे  CVL-KRA च्या कार्यालयात रवाना करील
६ केवायसी कागदपत्रांची छाननी होताच CVL-KRA कडून गुंतवणूकदाराला तशा प्रकारचे पत्र पाठवले जाईल
० एकदा व्यक्तिश: पडताळणी  झाल्यावर ते पुन्हा पुन्हा  करून घेण्याची गरज आहे का?
उत्तर : सेबीच्या २३ डिसेंबर २०११ च्या परिपत्रक क्र. MIRSD/Cir-26/2011 नुसार  एका सेबी मान्यताप्राप्त मध्यस्थाने प्रमाणित केलेली व्यक्तिश: पडताळणी दुसऱ्या मध्यस्थाला गृहीत धरता येईल. त्यामुळे पुन्हा ती प्रक्रिया करण्याची गरज नाही.
० कॉर्पोरेट्स, विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार आणि अन्य बिगर व्यक्तिगत संस्था यांच्याबाबतीत केवायसी कार्यप्रणालीत काही बदल झाला आहे का?
उत्तर : सेबीच्या ५ ऑक्टोबर २०११ च्या परिपत्रक क्र. MIRSD/SE/CIR-21/2011 मध्ये सूचित केलेली प्रणाली  बिगर व्यक्तिगत संस्था यांच्याबाबतीत  तशीच राहिल.
० केवायसी प्रक्रिया अपूर्णावस्थेत असताना गुंतवणूकदार डिमॅट / ट्रेडिंग खाते उघडू शकतो का?
उत्तर : होय. खाते उघडू शकतो. समजा जर कागदपत्रामध्ये काही त्रुटी आढळल्यास संबंधित गुंतवणूकदारांकडून मध्यस्थ ते दुरुस्त करून घेईल.
० केवायसी बाबतची पूर्ण माहिती CVL-KRA  कडून मिळू शकते का?
उत्तर : होय. सर्व तपशील अगदी गुंतवणूकदाराच्या स्वाक्षरीसह मध्यस्थाला मिळू शकतो
० मध्यस्थाने केवायसी कागदपत्रे घेताना ती वैध होती मात्र CVL-KRA कडे ती पोहोचेपर्यंत कालावधी समाप्त झाला असेल तर केवायसीची वैधता काय असेल ?
उत्तर : मध्यस्थाला कागदपत्रे सादर करताना ती वैध होती म्हणजे ती  वैध समजली जातील.
० CVL-KRA कडे एकदा केवायसीची नोंदणी झाल्यानंतर जर काही बदल झाला असेल तर गुंतवणूकदाराने काय करावे?
उत्तर : विवक्षित नमुन्यातील फॉर्म घेऊन (Modification form) संबंधित कागदपत्रांसह मध्यस्थाकडे द्यावा ज्याची नोंद मध्यस्थ CVL-KRA डेटाबेसमध्ये करील व ती कागदपत्रे CVL-KRA कडे पाठवून देईल. तिथे त्याची छाननी पडताळणी झाली की मग सुधारित तपशीलासह सर्व माहिती सर्व मध्यस्थांना उपलब्ध असेल.
० केवायसी तपशील CVL-KRA यंत्रणेत नोंद होण्याच्या प्रक्रियेत गुंतवणूकदाराला काही कळविले जाते का?
उत्तर : होय. CVL-KRA कडून गुंतवणूकदाराला एसएमएस पाठविला जातो. समजा काही कारणाने जर नाकारला जात असेल तर तसा एसएमएस देखील नंतर पाठविला जातो.
शेअर बाजारातील आर्थिक साक्षरता या विषयावर अनेक व्याख्याने होत असतात पण खरे तर खूप सुरुवातीपासून म्हणजे विद्यार्थी दशेपासूनच त्याची सुरुवात होणे गरजेचे आहे. मुळात या विषयाची गोडी लागण्याच्या दृष्टीने काहीतरी ठोस उपाय करावेत या हेतूने बीएसईच्या  पुढाकाराने ‘व्हच्र्युअल ट्रेडिंग’विषयी प्रात्यक्षिके तसेच अनेक स्पर्धा असा दोन दिवसांचा कार्यक्रम १७ आणि १८ डिसेंबरला माटुंगा येथील खालसा कॉलेजमधे होणार आहे. ‘सीडीएसएल’तर्फे देखील तेथे आवश्यक अशी माहिती दिली जाईल.RGESS अर्थात राजीव गांधी इक्विटी सेव्हिंग स्कीम या सरकारतर्फे अंमलात येऊ घातलेल्या नवीन योजनेबाबत माहिती पुढील शुक्रवारी.

Story img Loader