किंगफिशरमधील २४ टक्के हिस्सा विकून मोठय़ा कर्जसंकटातील हवाई कंपनीला तारण्याचा प्रयत्न प्रवर्तक विजय मल्ल्या यांच्याकडून होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
मुख्य प्रवर्तक युनायटेड ब्रुअरीजने आपल्या या अडचणीतील हवाई कंपनीतील काही हिस्सा विकण्यासाठी खाजगी गुंतवणूकदारांना आकर्षित करण्याची तयारी सुरू केली असल्याची माहिती कंपनीने मुंबई शेअर बाजाराला दिली आहे.
सुरुवातीला टीपीजी (टेक्सास पॅसिफिक ग्रुप) या खाजगी गुंतवणूक कंपनीने याबाबत रस दाखविल्याचे वृत्त आहे. असे असले तरी टीपीजी १० टक्क्यांच्या वर किंगफिशरमधील हिस्सा घेणार नाही, असेही सांगितले जाते.
किंगफिशरमध्ये खुद्द विजय मल्ल्या (१.८७%) आणि यूबी होल्डिंग, किंगफिशर फिन्व्हेस्ट आदी प्रवर्तक कंपन्यांचा मिळून ३५.८३ टक्के हिस्सा आहे. युनायटेड स्पिरिटने यापूर्वी भांडवली बाजाराच्या माध्यमातून पायोनिअर डिस्टीलरिजला काही समभाग विकण्याचा प्रयत्न केला होता. यूबी समूहाने नुकताच युनायटेड स्पिरिट्स लिमिटेडमधील मोठा हिस्सा मद्यनिर्मितीतील जागतिक स्पर्धक कंपनी डिआजियोला विक्री करण्याचा करार केला आहे.
सध्या उड्डाणे स्थगित ठेवणाऱ्या किंगफिशर एअरलाइन्सला येत्या ३० नोव्हेंबपर्यंत नव्याने वाहतूक सेवा पूर्ववत करण्याबाबत विकास आलेख सादर करावयाचा आहे. तर सध्या निलंबित असलेला कंपनीच्या हवाई परवान्याची मुदतही येत्या ३१ डिसेंबर रोजी संपत आहे. कंपनीने गेल्याच आठवडय़ात बँकांनाही आपण लवकरच आर्थिक जुळवणी करीत असल्याचे सांगितले.
किंगफिशर हिस्सा विकणार?
किंगफिशरमधील २४ टक्के हिस्सा विकून मोठय़ा कर्जसंकटातील हवाई कंपनीला तारण्याचा प्रयत्न प्रवर्तक विजय मल्ल्या यांच्याकडून होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. मुख्य प्रवर्तक युनायटेड ब्रुअरीजने आपल्या या अडचणीतील हवाई कंपनीतील काही हिस्सा विकण्यासाठी खाजगी गुंतवणूकदारांना आकर्षित करण्याची तयारी सुरू केली असल्याची माहिती कंपनीने मुंबई शेअर बाजाराला दिली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 21-11-2012 at 01:02 IST
TOPICSअर्थसत्ता
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Will kingfisher sale share