माहिती तंत्रज्ञानातील अग्रणी विप्रोची उपकंपनी असलेल्या ‘विप्रो लायटिंग अॅण्ड फर्निचर’ने इंटरस्टुहल या जर्मन कंपनीचा ब्रॅण्ड असलेल्या गोल तसेच पॉज या दोन आरामदायी खुच्र्याची निर्मिती आपल्या चन्नई येथील प्रकल्पातून केली जाणार आहे. केवळ खुच्र्या तयार करणाऱ्या कंपनीची या प्रकल्पाची वार्षिक उत्पादन क्षमता १.२५ लाख आहे. कंपनीच्या अन्य फर्निचरची निर्मिती महाराष्ट्रातील औरंगाबादनजीकच्या वाळुंज येथे केली जाते.
विप्रोच्या या व्यवसाय विभागाचे प्रमुख व वरिष्ठ उपाध्यक्ष पराग कुलकर्णी यांनी सांगितले की, खुद्द माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातूनही अतिआरामदायी खुच्र्याना मोठी मागणी आहे. सार्वजनिक ठिकाणी असणाऱ्या खुच्र्याची मागणीही पॉजद्वारे पूर्ण केली जाणार असून यासाठी कंपनीला स्थानिक स्वराज्य संस्था तसेच अन्य शासकीय यंत्रणांकडून प्रतिसाद मिळेल. कंपनीची या दोन्ही उत्पादन क्षेत्रात ५५ टक्क्यांहून अधिक बाजार हिस्सा आहे. मुंबई उपनगरातील पंचतारांकित हॉटेलमध्ये आयोजित कंपनीच्या प्रदर्शनामध्ये या वेळी निवडक फर्निचरसह निवासी तसेच वाणिज्य वापराचे एलईडी दिवेही मांडण्यात आले होते. विप्रोने दोन वर्षांपूर्वी खरेदी केलेल्या क्लिनरे या नाममुद्रेतील प्रकाशदिवेही कंपनीने तयार केले आहेत. किराणा क्षेत्र परदेशी गुंतवणुकीला खुले झाल्यानंतर स्वीडनची आयकिया ही कंपनीदेखील देशात विस्तार करण्याच्या तयारीत आहे. या विदेशी स्पर्धेचा सामना करण्यासाठी विप्रोने टोरन्टोस्थित कंपनीशी करार करून उत्पादन विस्तार करण्याचे योजिले असल्याचे मानले जाते. कंपनीने दोन वर्षांपूर्वी क्लिनरे हा युरोपियन ब्रॅण्ड भारतात आणला होता.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा