महागाई निगडित किरकोळ पाठोपाठ घाऊक किंमत निर्देशांकही नरमल्याने रिझव्र्ह बँकेकडून व्याजदर कपातीच्या अपेक्षांना पुन्हा एकदा बळ मिळाले आहे. मात्र अमेरिकी चलनाच्या पुढय़ात रुपया ६३ पर्यंत नांगी टाकत असल्याने स्वस्त कर्जाची गव्हर्नर डॉ. राजन यांची भेट नवे वर्ष सुरु झाल्यानंतरच मिळण्याची चिन्हे आहेत.
नोव्हेंबरमधील महागाई दर शून्य टक्क्य़ांवर विसावताना गेल्या पाच वर्षांच्या नीचांकावर येऊन ठेपला आहे. गेल्याच आठवडय़ात जाहिर झालेल्या किरकोळ महागाई दरानंतर आता घाऊक महागाई दरही किमान स्तरावर आला आहे. घाऊक किंमत निर्देशांक ऑक्टोबरमध्ये १.७७ टक्के तर वर्षभरापूर्वी ७.५२ टक्के होता. जुलै २००९ नंतर प्रथमच महागाई दर शून्याखाली आला आहे. यापूर्वी तो उणे ०.३ टक्के होता.
भाज्या, कांदे, खाद्यतेल, पेट्रोल व डिझेल यांच्या किंमती कमी झाल्याने महागाई दराला यंदा ही दिलासाजनक कामगिरी बजाविता आली आहे. सलग सहाव्या महिन्यात दर नरमला आहे. तर अन्नधान्याचा महागाई दर ०.६३ टक्क्य़ांवर आला आहे. यंदाच्या मेपासून तो सतत घसरत आता गेल्या तीन वर्षांच्या तळात आला आहे. इंधन व ऊर्जा महागाई दरदेखील ४.९१ टक्क्य़ांनी कमी होऊन २००९ च्या समकक्ष आला आहे.
महागाई शून्यात!
महागाई निगडित किरकोळ पाठोपाठ घाऊक किंमत निर्देशांकही नरमल्याने रिझव्र्ह बँकेकडून व्याजदर कपातीच्या अपेक्षांना पुन्हा एकदा बळ मिळाले आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 16-12-2014 at 12:25 IST
मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Wpi inflation drops to zero per cent in november