घरोघरी खाद्यपदार्थ पोहचवणारे अॅप्लिकेशन असलेल्या झोमॅटो कंपनीने आज भांडवली बाजारात प्रवेश केला गुंतवणूकदारांमध्ये चांगलीच चर्चा असणाऱ्या या कंपनीच्या समभागांची विक्री आज सकाळी १० वाजल्यापासून सुरु झाली. १४ जुलै ते १६ जुलै दरम्यान या नव्या पिढीच्या कंपनीची प्रारंभिक समभाग विक्री प्रत्येकी ७२ रुपये ते ७६ रुपयांदरम्यान केली जाणार आहे. या आयपीओच्या माध्यमातून ९,३७५ कोटी रुपये उभारण्याचं लक्ष्य कंपनीने समोर ठेवलं आहे.
अलीकडच्या काळात सर्वाधिक उत्सुकतेने वाट पाहिल्या गेलेल्या प्रारंभिक समभाग विक्रीची घोषणा मागील गुरुवारी करण्यात आली होती. या आयपीओच्या माध्यमातून उभारण्यात येणाऱ्या ९,३७५ कोटींपैकी ३७५ कोटी रुपये हे इन्फो एज (इंडिया) लिमिटेड ही मूळ गुंतवणूकदार कंपनी तिच्याकडील समभाग विकून मिळवणार आहे. तर नव्याने समभाग जारी करून कंपनीकडून ९,००० कोटी रुपये उभारले जातील.
नक्की वाचा >> ThopTV App च्या निर्मात्याला महाराष्ट्र सायबर पोलिसांकडून अटक
अँकर पोर्शनमधून उभारले ४ हजार १९३ कोटी
आयपीओ विक्रीच्या सुरुवातील मंगळवारी म्हणजेच १३ जुलै २०२१ रोजी सुरु करण्यात आलेल्या अँकर प्रोर्शनदरम्यान कंपनीने ४ हजार १९६ कोटी रुपये उभे केले. यामध्ये १८६ अँकर इनव्हेस्टर्सने गुंतवणूक करत ५५ कोटी २१ लाख ७३ हजार ५०५ समभागांची विक्री झाली. प्रत्येक समभाग हा ७६ रुपयांना विकला गेला. कंपनीच्या अँकर इनव्हेस्टर्सच्या यादीत अनेक बड्या कंपन्यांचा समावेश आहे. यामध्ये टायगर ग्लोबल इनव्हेसमेंट फंड, ब्लॅकरॉक, फिडेलीटी, जेपी मॉर्गन, मॉर्गन स्टॅनली, टी रोवी प्राइज, कॅनडा पेन्शन प्लॅन इनव्हेसमेंट बोर्ड, सिंगापूर सरकार, एसबीआय म्युच्युअल फंड, अॅक्सेस बँक, कोटक म्युच्यूअल फंड, युटीआय म्युच्यूअल फंड, मोतीलाल ओस्वाल एएमसी, एचडीएफसी म्युच्यूअल फंड, आयसीसी प्रेडेन्शीयल म्युच्यूअल फंड, टाटा म्युच्यूअल फंड, ग्लोड्मन सॅशे इंडिया, आबुधाबी इनव्हेसमेंट अथॉरिटी, प्रॅकलिन टेम्पल्टन, एचएसबीसी अॅसेट मॅनेजमेंट (इंडिया) यासारख्या कंपन्यांच्या या यादीत समावेश आहे.
नक्की वाचा >> ‘पाच ट्रिलियनच्या नादात सगळं विकलं’, ‘मोदींच्या तिसऱ्या लाटेपासून देशाला वाचवा’; #Resign_PRimeMinister ट्रेण्डमध्ये
कंपनीची स्थिती काय?
वैयक्तिक गुंतवणूकदारांना अर्ज करताना, किमान १९५ समभागांसाठी आणि त्यापुढे १९५च्या पटीत (दोन लाख रुपयांच्या गुंतवणूक मूल्यांपर्यंत) समभागांसाठी बोली लावता येईल. भागविक्रीपश्चात कंपनीचे बाजार मूल्यांकन हे ६४,३६५ कोटी रुपयांच्या घरात जाईल, असे झोमॅटोचे मुख्य वित्तीय अधिकारी अक्षत गोयल यांनी सांगितले आहे. आर्थिक वर्ष २०२०-२१ मध्ये झोमॅटोचा महसूल आधीच्या वर्षांच्या तुलनेत दोन पटींनी वाढून २,९६० कोटी रुपयांच्या घरात गेला आहे. तर व्याज, कर व घसाऱ्यापश्चात कंपनीला २,२०० कोटी रुपयांचा तोटा झाला आहे.
महत्त्वाचे काय..
> किमान १९५ समभागांसाठी बोली लावता येईल.
> बोलीसाठी किंमत पट्टा ७२ ते ७६ रुपये प्रति समभाग
> किमान अर्ज रक्कम – १४,०४० रु.
> कालावधी – १४ जुलै ते १६ जुलै
जर तुम्हाला झोमॅटोचा आयपीओ विकत घ्यायचा असेल तर अपस्टॉक्स (Upstox), झिरोदा (Zerodha) सारख्या ब्रोकिंग कंपन्यांच्या माध्यमातून खरेदी करता येईल.