अजय वाळिंबे
अदानी पोर्ट्स आणि स्पेशल इकॉनॉमिक झोन लिमिटेड ही बंदर सेवा आणि संबंधित पायाभूत सुविधांचा विकास, संचालन आणि देखभाल व्यवसायात कार्यरत कंपनी आहे. कंपनीने मुंद्रा येथील बंदराशी संलग्न बहुउत्पादन विशेष आर्थिक क्षेत्र (सेझ) आणि संबंधित पायाभूत सुविधा जोडल्या आहेत. कंपनीचे एकूण महसुलाच्या ९२.१ टक्के उत्पन्न बंदरे आणि टर्मिनल्सचे व्यापक विस्ताराचे असून उर्वरित उत्पन्न लॉजिस्टिक आणि सेझपासून मिळते आहे. कंपनीने देऊ केलेल्या एकात्मिक सेवेमुळे ते एक प्रारूप पुढे आणण्यास ती यशस्वी ठरली आहे. आघाडीच्या व्यवसायाशी युती करून भारतीय बंदर उद्योग क्षेत्रातील ती आघाडीची कंपनी बनली आहे.
अदानी पोर्ट्स आज भारतातील सर्वात मोठय़ा बंदराचे संचालन आणि विकसन करणारी कंपनी आहे. कंपनीकडून वाढीव क्षमतेसह सध्या १२ बंदरे आणि टर्मिनल्सचे संचालन केले जाते, जे देशाच्या एकूण बंदर क्षमतेच्या २४ टक्के इतके भरते. या बंदरात गुजरातमधील मुंद्रा, दहेज, टुना आणि हजिरा, ओडिशातील धामरा, गोव्यातील मुरगाव, आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम आणि कृष्णपट्टणम, महाराष्ट्रातील दिघी आणि तमिळनाडूमधील कट्टपल्ली आणि एन्नोर यांचा समावेश आहे. कंपनी मुंद्रा येथे भारतातील सर्वात मोठे (८,४८१ हेक्टर्स) सेझ (एसईझेड) उभारत असून आतापर्यंत ५५ कंपन्यांनी तेथे प्रकल्प नोंदणी केली आहे. कंपनीकडे भारतातील सर्वात मोठी कंटेनर हाताळणी सुविधादेखील आहे. गेल्या आर्थिक वर्षांत कंपनीने सर्व बंदरांवर उच्च मालवाहतूक नोंदवली आहे.
अदानी पोर्ट्स तिच्या उपकंपनीद्वारे हरयाणा, पंजाब, राजस्थान आणि कर्नाटक येथे चार लाख चौरस फूट वेअरहाऊसिंग जागेसह पाच लॉजिस्टिक पार्क चालवते. फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया आणि विविध राज्य सरकारच्या कृषी-जिन्नस वेअरहाउसिंग विभागांच्या सवलतीअंतर्गत, कंपनी अन्नधान्याच्या साठवणुकीसाठी आणि धान्याची वाहतूक सुलभ आणि विकसित करण्याच्या प्रक्रियेत कार्यरत आहे. कंपनीने फ्लिपकार्टसमवेत मुंबईत ५,३४,००० चौरस फूट लॉजिस्टिक हब विकसित करण्याचा करार केला आहे.
कंपनीची आत्तापर्यंतची कामगिरी उत्कृष्ट असून आगामी कालावधीत प्रगतीची घोडदौड अशीच चालू राहील अशी अपेक्षा आहे. कंपनीच्या व्यवस्थापनानुसार २०३० पर्यंत अदानी पोर्ट्स आणि स्पेशल इकॉनॉमिक झोन ही भारतातील सर्वात मोठी बंदर संचालन आणि विकसन करणारी कंपनी असेल. एक दीर्घकालीन गुंतवणूक म्हणून अदानी
पोर्ट्सचा तुमच्या पोर्टफोलियोसाठी नक्की विचार करा.
अदानी पोर्ट्स अँड सेझ लि.
(बीएसई कोड – ५३२९२१)
शुक्रवारचा बंद भाव : रु. ७२२/-
वर्षांतील उच्चांक/ नीचांक : रु. ९०१/४२७
बाजार भांडवल :
रु. १,४७,४९६ कोटी
भरणा झालेले भागभांडवल : रु. ४०८.३५ कोटी
शेअर होल्डिंग पॅटर्न (%)
प्रवर्तक ६३.८३
परदेशी गुंतवणूकदार १५.२९
बँक/ म्यु. फंड/ सरकार १५.८६
इतर/ जनता ५.०२
संक्षिप्त विवरण
* शेअर गट : लार्ज कॅप
* प्रवर्तक : अदानी समूह
* व्यवसाय क्षेत्र :बंदर सेवा/ पायाभूत सुविधा
* पुस्तकी मूल्य : रु. १५२
* दर्शनी मूल्य : रु. २/-
* गतवर्षीचा लाभांश : २५० %
शेअर शिफारशीचे निकष
* प्रति समभाग उत्पन्न : रु. २५.०८
* पी/ई गुणोत्तर : २८.८
* समग्र पी/ई गुणोत्तर : ८८
* डेट इक्विटी गुणोत्तर : १.४८
* इंटरेस्ट कव्हरेज गुणोत्तर : ३.८७
* रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉईड : १४.१
* बीटा : १.३
सूचना : १. प्रस्तुत लेखामध्ये सुचविलेल्या कंपनीच्या शेअर्समध्ये लेखकाची वा त्याच्या जवळच्या नातेवाईकांची (उपलब्ध माहितीप्रमाणे) कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती कंपनीच्या भरणा झालेल्या भाग भांडवलाच्या एक टक्क्यांपेक्षा कमी आहे. तसेच सुचविलेल्या कंपनीशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून त्याने कंपनीकडून कुठलेही मानधन अथवा भेटवस्तू घेतलेली नाही. २. लेखात सुचविलेल्या कंपनीचे संशोधन हे वाचकांच्या महितीसाठी असून, प्रत्यक्ष कंपनीच्या शेअरमधील गुंतवणूक वाचकांनी स्वत:च्या जोखमीवर वा सल्लागाराच्या सल्ल्याने करावी.