सुमारे ५० वर्षांपूर्वी इंडियन रेयॉन कॉर्पोरेशनपासून सुरुवात झालेली ‘आदित्य बिर्ला नुवो लि.’ ही कंपनी आज बिर्ला समूहाची सर्वात मोठी कंपनी गणली जाते. केवळ वस्त्रोद्योगच नव्हे तर सीमेंट, इन्श्युरन्स, कार्बन ब्लॅक इ. अनेक वेगवेगळ्या व्यवसायांत कंपनीने आपला विस्तार केला आहे. फॉच्र्युन ५०० मधील या कंपनीमध्ये २५ देशांतील १३०,००० कर्मचारी कार्यरत आहेत. आदित्य बिर्ला समूहातील ही कंपनी आणि तिच्या सहयोगी कंपन्या सुमारे २५ देशांत विस्तारल्या आहेत. सध्या या समूहात इंडियन रेयॉन, मदुरा गारमेंट्स, जयश्री टेक्स्टाइल्स्, हाय टेक कार्बन्स, इंडो गल्फ फर्टलिायजर्स आणि आदित्य बिर्ला इन्सुलेटर्स इ. अनेक उत्तम कंपन्यांचा समावेश आहे. या खेरीज आयडिया सेल्युलर, बिर्ला सनलाइफ इन्शुरन्स (बाजारपेठेत ६.७% हिस्सा), बिर्ला सन लाइफ अॅसेट मॅनेजमेंट कंपनी, आदित्य बिर्ला मनी आणि नुकतीच निर्गुतवणूक प्रक्रिया पूर्ण करण्यात आलेली आदित्य बिर्ला मिनक्स वर्ल्डवाइड (बीपीओ), अशा यशस्वी सहयोगी कंपन्या या समूहात आहेत.
सातत्याने उत्तम कामगिरी करून दाखवणाऱ्या कंपन्यांमध्ये या कंपनीचा समावेश करायला हवा. डिसेंबर २०१३ अखेर संपलेल्या सहामाहीसाठी कंपनीने नक्त नफ्यात २२% वाढ दाखवली होती. मंदीच्या काळातदेखील विस्तारित उद्योगांमुळे कंपनीच्या कामगिरीवर विपरीत परिणाम झालेला नाही. लवकरच २०१३-१४ चे आíथक निकाल जाहीर होतील. सध्या ११२०च्या आसपास असलेला हा शेअर तुमच्या पोर्टफोलिओत कायम ठेवण्याजोगा आहे.
मध्यंतरी काही वाचकांनी निवडणुकांचा विपरीत परिणाम न होणाऱ्या कंपन्या सुचवायला सांगितल्य्ोा होत्या. मला वाटते एफएमसीजी, औषध आणि अशा डायव्हर्सिफाइड कंपन्यांचा विचार या काळात करावा. शेअर बाजारातील एक सुरक्षित गुंतवणूक म्हणून या कंपनीचा विचार जरूर व्हावा.

Story img Loader