प्रश्न: मी एप्रिल २००१ मध्ये १२,५०,००० रुपयांना वाणिज्यिक जागा (दुकान) विकत घेतले होते. ते मी भाडय़ाने दिले होते. मी ही जागा आता ५४ लाख रुपयांना विकत आहे. मला या व्यवहारावर किती कर भरावा लागेल? हा कर मला वाचवता येईल का?
– अथर्व साने
उत्तर: या व्यवहारावर झालेला नफा हा दीर्घ मुदतीचा आहे. त्यावर महागाई निर्देशांकानुसार खरेदी मूल्य विचारात घेऊन नफा काढावा लागेल. त्यावर २०.६% (शैक्षणिक अधिभारासहित) इतका कर भरावा लागेल. हा कर खालीलप्रमाणे :
दुकान जागा विक्री किंमत : रु. ५४,००,०००
खरेदी मूल्य : रु. १२,५०,०००
महागाई निर्देशांकानुसार खरेदी मूल्य: रु. ३०,०४,६९५
(२००१-०२चा महागाई निर्देशांक ४२६
२०१४-१५ चा महागाई निर्देशांक १,०२४)
——————————————————–
एकूण नफा : रु. २३,९५,३०५
——————————————————–
कर २०% : रु. ४,७९,०६१
शैक्षणिक अधिभार ३% : रु. १४,३७२
——————————————————–
एकूण कर : रु. ४,९३,४३३
——————————————————–
हा कर वाचवायचा असेल तर कलम ५४ ईसीप्रमाणे नफ्याइतकी रक्कम रोख्यांमध्ये गुंतविल्यास कर भरावा लागणार नाही. किंवा मिळालेल्या विक्री किमती एवढे किंवा त्यापेक्षा जास्त किमतीचे घर दोन वर्षांत विकत घेतले तर किंवा तीन वर्षांत बांधले तर कर भरावा लागणार नाही. परंतु त्यासाठी काही अटींची पूर्तता करावी लागते. जसे आपल्या नावाने या नवीन घराच्या व्यतिरिक्त एकच घर असले पाहिजे. जर घर त्या वर्षी विकत घेऊ शकला नाही, तर त्या वर्षीच्या विवरणपत्र भरण्याच्या मुदतीपूर्वी उअढकळअछ रउऌएटए मध्ये पसे ठेवावे लागतात. आणि वर दिलेल्या मुदतीपूर्वी घर विकत घेतले पाहिजे.
शेतीचे उत्पन्न करमुक्त आहे; परंतु..
आपलेही करविषयक प्रश्न असतील तर ते आपण pravin3966@rediffmail.com या ई-मेलवर अथवा लोकसत्ता कार्यालय, ‘अर्थ वृत्तान्त’, एक्स्प्रेस टॉवर्स, पहिला मजला, नरिमन पॉइंट, मुंबई- ४०००२१ या पत्त्यावर पाठवू शकता. अथवा ई-मेल: arthmanas@expressindia.com
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 25-08-2014 at 07:18 IST
मराठीतील सर्व अर्थवृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Agriculture income is exempt from tax but