कुठलेही कर्ज नसलेली आणि जवळपास ६०० कोटी रुपयांची गुंतवणूक असलेली ही कंपनी इतर प्रतिस्पर्धी रंग कंपन्यांच्या तुलनेत गुंतवणुकीसाठी आकर्षक वाटते.
अक्झो नोबेल इंडिया लि. म्हणजे पूर्वाश्रमीची आयसीआय. खरं तर १९२६ पासून कंपनी भारतात कार्यरत आहे. रसायने, खते तसेच पिकांच्या रक्षणासाठी कीटकनाशके आणि अर्थातच रंग अशी विविध उत्पादने ही कंपनी इम्पिरियल केमिकल्स कंपनी या नावाने घेत होती. नंतर १९८७ मध्ये अमेरिकेतील नॅलको केमिकल्स आणि आयसीआय या दोघांनी मिळून नॅलको केमिकल्स इंडियाची स्थापना केली आणि नंतर अनेक जागतिक घडामोडीप्रमाणे सध्याच्या कंपनीकडे रंग आणि स्पेशालिटी केमिकल्स ही प्रमुख उत्पादने राहिली. डय़ुलक्स, डय़ुको या नावाने रंग तर डायनाकोट या ब्रॅण्ड नावाखाली मोटर गाडय़ांचे रंगांचे उत्पादन कंपनी करते. कुठलेही कर्ज नसलेली आणि जवळपास ६०० कोटी रुपयांची गुंतवणूक असलेली ही कंपनी इतर प्रतिस्पर्धी रंग कंपन्यांच्या तुलनेत गुंतवणुकीसाठी आकर्षक वाटते. सध्या परदेशी प्रवर्तकांचा भागभांडवलातील हिस्सा सुमारे ७३% असून तो ते ७५% पर्यंत वाढवतील असे वाटते. गेल्या वर्षी इतर गुंतवणूक कमी करून भागधारकांना ८००% लाभांश देणारी अक्झो नोबेल तुम्हाला १२-१८ महिन्यांत २०-२५% परतावा देऊ शकेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा