निव्वळ नफा ५६.९% तर वार्षकि तत्वावर परतावा १२५.९३%
‘माझा पोर्टफोलियो’ मध्ये २०१४ वर्षांत बहुतांशी स्मॉल कॅप आणि काही मिड कॅप शेअर्स सुचवले होते. गेल्या दोन वर्षांप्रमानेच यंदाही वाचकांना जर गुंतवणूक केली असेल तर भरपूर फायदा झाला असेल. अर्थात काही मोजक्या शेअर्समध्ये नुकसानही आहेच. परंतु एकंदर सुचविलेल्या ४३ शेअर्सपकी ३५ म्हणजेच जवळपास ८१% कंपन्यांचे शेअर्स फायद्यात आहेत.
हा हा म्हणता वर्ष २०१४ संपले सुद्धा. या वर्षांत गुंतवणूकदारांना खरंच ‘अच्छे दिन’ आले असं म्हणायला हरकत नाही. नवीन सरकार सत्तेवर येण्याआधीपासूनच त्याची चाहूल लागली होती. काही चाणाक्ष गुंतवणूकदारांनी त्यामुळे त्याच वेळी म्हणजे साधारण मार्च-एप्रिल मध्ये शेअर बाजारात प्रवेश घेऊन गुंतवणूक करायला सुरुवात केली आणि थोड्याच कालावधीत भरपूर फायदा कमावून घेतला.
१ जानेवारी २०१४ रोजी शेअर बाजार निर्देशांक २०,८८८ आणि निफ्टी ६,२२१ होता. वर्षभरात निर्देशांक आणि निफ्टी दोघांनीही नवीन उच्चांकाचे स्तर गाठले आणि एकाच वर्षांत ४०% रिटर्न्स दिले. त्यामुळेच सोन्या-चांदीपेक्षा यंदा तरी शेअर बाजाराने गुंतवणूकदारांना भरभरून दिले असं म्हणता येईल. बँकेतील किंवा कंपनीतील मुदत ठेवी, पोस्टातील बचत इ. पारंपरिक गुंतवणूक तुम्हाला श्रीमंत करू शकत नाहीत हे एव्हाना कळून चुकले असेलच. अर्थात शेअर बाजारातील प्रत्येक गुंतवणूक तुम्हाला फायदा देत नाही ते शेरॉन बायोसारख्या शेअर्सने तुम्हाला दाखवले आणि काहींनी अनुभवले देखील.

या सदराचा हेतू मराठी वाचकाला शेअर बाजारात रस निर्माण करणे आणि अर्थात जाणकार गुंतवणूकदार बनविणे हा असल्याने वाचकांनी स्वत:हून अभ्यास आणि रिसर्च करणे हे ओघाने आलेच. नवीन गुंतवणूकदारांनी शक्य असल्यास बीएसई अथवा एनएसईचा बेसिक कोर्स केल्यास अधिक फायदा होईल. ‘माझा पोर्टफोलियो’सारखी सदरे किंवा इतरही माध्यमातून अनेक टिप्स मिळत असतात. परंतु शेवटी कष्टाने मिळविलेले स्वतचे पसे गुंतवताना निर्णय तुम्हाला घ्यायचा असतो. कारण फायदा किंवा तोटा होणार आहे तो तुमचा, सल्लागार किंवा लेखकाचा नव्हे.  
‘माझा पोर्टफोलियो’ मध्ये २०१४च्या वर्षांत मी बहुतांशी स्मॉल कॅप आणि काही मिड कॅप शेअर्स सुचवले होते. सुदैवाने गेल्या दोन वर्षांप्रमानेच यंदाही आपल्या वाचकांना (ज्यांनी सुचवलेल्या शेअर्समध्ये गुंतवणूक केली असेल त्यांना) भरपूर फायदा झालेला आहे. अर्थात काही मोजक्या शेअर्समध्ये नुकसानही आहेच. परंतु एकंदर सुचविलेल्या ४३ शेअर्सपकी ३५ म्हणजेच जवळपास ८१% कंपन्यांचे शेअर्स फायद्यात आहेत. सरळ साध्या गणिताने आपल्या पोर्टफोलियोचा निव्वळ नफा ५६.९% तर वार्षकि तत्वावर (आयआरआर) १२५.९३% असा दणदणीत आहे. उल्लेखनीय म्हणजे याच वर्षभराच्या कालावधीत मुंबई शेअर बाजाराचा आयआरआर २५.५२% आहे. हा फायदा पदरात पडून घ्यायचा की हे शेअर्स्ो अजून ठेवायचे किंवा या शेअर्सचे आता काय करायचे याचाही सल्ला मी दिलेला नाही. कारण प्रत्येक गुंतवणूकदारांनी हा निर्णय वर सांगितल्याप्रमाणे स्वत घ्यायचा आहे. ज्या गुंतवणूकदारांनी हे शेअर्स सुचविल्यानंतर घेऊन उच्चांकाला विकले असतील ते सर्वात हुशार किंवा भाग्यवान गुंतवणूकदार.
गेली तीन वष्रे ‘माझा पोर्टफोलियो’ हे सदर नियमितपणे प्रसिद्ध होत आहे आणि त्याला सजग वाचकांचा तसेच नवीन व अनुभवी गुंतवणूकदारांचा उदंड प्रतिसाद मिळत आला आहे. वाचकांनी दिलेल्या प्रतिक्रिया आणि सूचना शक्य तितक्या अवलंबण्याचा प्रयत्न आम्ही केला आणि पुढे देखील करूच. नवीन वर्षांत थोडी अधिक उपयुक्त माहिती घेऊन तुमचा ‘माझा पोर्टफोलियो’ नेहमीप्रमाणे दर सोमवारी भेटीला येईल.  
av-02 av-03

Story img Loader