निव्वळ नफा ५६.९% तर वार्षकि तत्वावर परतावा १२५.९३%
‘माझा पोर्टफोलियो’ मध्ये २०१४ वर्षांत बहुतांशी स्मॉल कॅप आणि काही मिड कॅप शेअर्स सुचवले होते. गेल्या दोन वर्षांप्रमानेच यंदाही वाचकांना जर गुंतवणूक केली असेल तर भरपूर फायदा झाला असेल. अर्थात काही मोजक्या शेअर्समध्ये नुकसानही आहेच. परंतु एकंदर सुचविलेल्या ४३ शेअर्सपकी ३५ म्हणजेच जवळपास ८१% कंपन्यांचे शेअर्स फायद्यात आहेत.
हा हा म्हणता वर्ष २०१४ संपले सुद्धा. या वर्षांत गुंतवणूकदारांना खरंच ‘अच्छे दिन’ आले असं म्हणायला हरकत नाही. नवीन सरकार सत्तेवर येण्याआधीपासूनच त्याची चाहूल लागली होती. काही चाणाक्ष गुंतवणूकदारांनी त्यामुळे त्याच वेळी म्हणजे साधारण मार्च-एप्रिल मध्ये शेअर बाजारात प्रवेश घेऊन गुंतवणूक करायला सुरुवात केली आणि थोड्याच कालावधीत भरपूर फायदा कमावून घेतला.
१ जानेवारी २०१४ रोजी शेअर बाजार निर्देशांक २०,८८८ आणि निफ्टी ६,२२१ होता. वर्षभरात निर्देशांक आणि निफ्टी दोघांनीही नवीन उच्चांकाचे स्तर गाठले आणि एकाच वर्षांत ४०% रिटर्न्स दिले. त्यामुळेच सोन्या-चांदीपेक्षा यंदा तरी शेअर बाजाराने गुंतवणूकदारांना भरभरून दिले असं म्हणता येईल. बँकेतील किंवा कंपनीतील मुदत ठेवी, पोस्टातील बचत इ. पारंपरिक गुंतवणूक तुम्हाला श्रीमंत करू शकत नाहीत हे एव्हाना कळून चुकले असेलच. अर्थात शेअर बाजारातील प्रत्येक गुंतवणूक तुम्हाला फायदा देत नाही ते शेरॉन बायोसारख्या शेअर्सने तुम्हाला दाखवले आणि काहींनी अनुभवले देखील.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा