जगातील मोजक्या कंपन्या धेत असलेल्या अनोख्या उत्पादनापैकी एक, लक्षणीय बौद्ध्रिक संपदा आणि स्वामित्व शुल्काचे भरीव उत्पन्न आणि कुठलेही कर्ज नसलेल्या या कंपनीचा शेअर पोर्टफोलियोत दीर्घकाळाच्या गुंतवणुकीसाठी असायलाच हवा..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वर्ष १९९२ मध्ये अ‍ॅरो कोटेड प्रॉडक्ट्स या नावाने सुरू झालेली ही कंपनी आता अ‍ॅरो ग्रीनटेक या नावाने ओळखली जाते. वॉटर सोल्युबल फिल्म्स हे कंपनीचे प्रमुख उत्पादन असून हे उत्पादन करणारी अ‍ॅरो ग्रीनटेक ही भारतातील एकमेव कंपनी आहे. आपल्या अंकलेश्वर येथील अत्याधुनिक कारखान्यातून कंपनी एम्ब्रॉयडरीसाठी लागणारे एम्बॉस्ड वॉटर सोल्युबल फिल्म्स, डिर्टजटसाठी आवश्यक असणारे सर्कल टॉयलेट ब्लॉक पॅकेजिंग, वॉटर सोल्युबल सोप स्ट्रिप्स, खाद्यपदार्थासाठी लागणारी फिल्म, र्निजतुक लॉण्ड्री बॅग, कॅप्सूल पॅक, मेडिकेटेड फिल्म अशा विविध प्रकारची उत्पादनांची ती निर्मिती करते. गुणवत्तेसाठी तसेच नवनवीन विविध श्रेणींच्या उत्पादनासाठी कंपनीने फ्रान्स, यूके, स्वित्र्झलड, थायलंड, श्रीलंका इ. देशांतील कंपन्यांशी करार केले आहेत. अवेरी बायोटेक ही उपकंपनी औषधी कंपन्यांसाठी लागणारी ओरल स्ट्रिप्सचे उत्पादन करते तर नग्रा आयडी अ‍ॅरो सिक्युअर्ड कार्ड्स लिमिटेड (एनएएससी) ही दुसरी उपकंपनी स्वित्र्झलडच्या नग्रा आयडी या कंपनीच्या साहाय्याने आरएफआयडी, बायोमेट्रिक, स्मार्ट कार्ड इ. साठी लागणारी उत्पादन करते. अवेरी बायोटेकचा लवकरच यूएस एफडीएला अनुरूप उत्पादने सुरू करण्याच्या प्रयत्न आहे.
कुठलेही कर्ज नसलेल्या या कंपनीचे जून २०१६ अखेर समाप्त तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर झाले आहेत. कंपनीने ७.२ कोटी रुपयांच्या उलाढालीवर ३.८ कोटी रुपयांचा नक्त नफा कमावला आहे. गेल्या वर्षीच्या तिमाहीच्या तुलनेत तो १०४ टक्क्यांनी अधिक आहे. अशा प्रकारचे उत्पादन करणाऱ्या जगात केवळ तीनच कंपन्या असल्याने अ‍ॅरोचे नफ्याचे मार्जिन चांगले आहे. कंपनीकडे सध्या ३० पेटंट असून कंपनी ही पेटंट विकण्याऐवजी त्यातील प्रोसेस वापरायला देऊन त्याचे स्वामित्व शुल्क (रॉयल्टी) घेते. तिच्या एकू ण उत्पन्नापैकी जवळपास ९० टक्के उत्पन्न हे स्वामित्व शुल्कापोटी कमावलेले उत्पन्न आहे. कंपनी अजून काही पेटंट मिळविण्याच्या प्रयत्न करीत आहे. कंपनीने नुकतेच २५ कोटी रुपये खर्चून आपली उत्पादनक्षमता १,००० टन केली आहे. सध्या ४२० रुपयांच्या आसपास उपलब्ध असलेला हा शेअर दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी योग्य वाटतो.
सूचना: लेखकाची वा त्याच्या जवळच्या नातेवाईकांची (उपलब्ध माहितीप्रमाणे) लेखात सुचविलेल्या कंपनीच्या शेअर्समध्ये कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती १% पेक्षा कमी आहे. तसेच सुचविलेल्या कंपनीशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून त्याने कंपनीकडून कुठलेही मानधन अथवा भेटवस्तू घेतलेली नाही.

अजय वाळिंबे – stocksandwealth@gmail.com

मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Arrow greentech company portfolio
Show comments