अॅक्सिस लाँग टर्म इक्विटी फंड..
‘इवलेसे रोप लावियले द्वारी तयाचा वेलू गेला गगनावरी’ या ओवीचे वित्तीय क्षेत्रातील उदाहरण कोणाला जाणून घ्यायचे असेल तर आजच्या अॅक्सिस लाँग टर्म इक्विटी फंडाकडे पाहावे लागेल. २९ डिसेंबर २००९ रोजी फंडाची पहिली ‘एनएव्ही’ जाहीर झाली तेव्हा जेमतेम १ कोटीची मालमत्ता असलेल्या या फंडांची ३० जून २०१६ रोजीची मालमत्ता ९,२९१ कोटी झाली आहे. कर नियोजनासाठी ‘ईएलएसएस’ हा प्रकार अर्थसाक्षर गुंतवणूकदरांमध्ये करबचतीचे लोकप्रिय साधन असून या फंडातील गुंतवणूक आयकराच्या कलम ८० सीखाली कर वजावटीस पात्र आहे. ‘इक्विटी लिंक्ड सेव्हिंग्ज स्कीम’ अर्थात ‘ईएलएसएस’ या फंडाइतका परताव्याच्या दरात सातत्य राखणारा दुसरा फंड नसल्याने कर नियोजनासाठी गुंतवणूकदारांची सर्वाधिक पसंती या फंडास लाभली आहे. कर वजावटपात्र कमाल मर्यादा १.५० लाख असल्याने या फंडात १.५० लाख गुंतवणूक केल्यास १५,००० रुपयांपर्यंत कर वाचविता येऊ शकतो.
हा फंड समभाग गुंतवणूक करणारा असल्याने गुंतवणुकीवरील परतावा बाजार संलग्न जोखमीच्या अधीन असतो. कर नियोजनाकरिता केल्या जाणाऱ्या मुदत ठेवी, पीपीएफ, पारंपरिक विमा योजना या व अन्य गुंतवणुका स्थिर उत्पन्न देणाऱ्या असल्याने त्यांच्या परताव्याचा दर स्थिर असतो; परंतु महागाईच्या दराहून कमी असल्याने या गुंतवणुका बचतीची क्रयशक्ती टिकवून ठेवण्यास बिनकामाच्या ठरतात. कर वाचविण्यासाठी या फंडात गुंतवणूक करण्यापूर्वी या गोष्टीची दाखल घेणे आवश्यक आहे.
अॅक्सिस म्युच्युअल फंड घराण्याकडे गुंतवणुकीचे काम पाहणारे आठ विश्लेषक व तीन निधी व्यवस्थापक असे मनुष्यबळ आहे. फंडाच्या गुंतवणूकविश्वात ३०० समभाग असून हे तज्ज्ञ या ३०० समभागांचा आवर्ती मागोवा घेत असतात. या ३०० समभागांपैकी निधी व्यवस्थापकांनी फंडाच्या गुंतवणुकीत ३० मेच्या गुंतवणुकीच्या यादीनुसार ३९ समभागांचा समावेश केला आहे.
यापैकी पहिल्या पाच गुंतवणुकांचे प्रमाण ३४%, तर पहिल्या दहा गुंतवणुकांचे प्रमाण ५५.५३% आहे. फंडाच्या गुंतवणुकांत प्रामुख्याने लार्ज कॅप समभागांचा समावेश असून मिड कॅपचे प्रमाण ५५%, तर स्मॉल कॅपचे प्रमाण ४५% आहे. निधी व्यवस्थापक त्या त्या व्यवसायाचे नेतृत्व
या फंडाचा ‘बीएसई एस अँड पी २००’ हा संदर्भ निर्देशांक असून मागील पाच वर्षांत फंडाने संदर्भ निर्देशांकापेक्षा १०% सरस कामगिरी (अल्फा) केली आहे. फंडाचे मागील पाच वर्षांचे दर महिन्याचे सरासरी प्रमाणित विचलन १६.५६% आहे. अन्य ‘ईएलएसएस’ फंडांच्या प्रमाणित विचलनाची सरासरी १८.३५% असल्याने हा फंड कमी जोखमीत अधिक परतावा मिळवीत असल्याने निधी व्यवस्थापकाचे कौशल्य सिद्ध होते. फंडाच्या पहिल्या विक्रीत २९ डिसेंबर २००९ रोजी ज्या गुंतवणूकदारांनी १००,००० गुंतविले असतील त्यांचे १५ जुलै २०१६च्या रेग्युलर ग्रोथ एनएव्हीप्रमाणे ३,२१,७६२ रुपये
झाले असून परताव्याचा दर १९.६८% आहे. चार वर्षांपूर्वी एसआयपी सुरूकरणाऱ्या गुंतवणूकदारांना या फंडाने २०% हून अधिक परतावा दिला आहे. केवळ एसआयपीच नव्हे तर वर्षांतून एकदा १,५०,००० गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना फंडाने भरघोस परतावा दिला असून ‘ईएलएसएस’ फंड गटात मागील सात वर्षांत हा फंड सर्वाधिक परतावा देणारा फंड ठरला आहे. अशा फंडाला ‘क्रिसिल’ने सर्वोत्तम अशी ‘Very Good- Rank 1’ पत बहाल केली आहे.
shreeyachebaba@gmail.com