डीएसपी ब्लॅकरॉक बॅलंस्ड फंड
भांडवली वृद्धी व नियमित उत्पन्न या निकषांचा विचार करता डीएसपी ब्लॅकरॉक बॅलंस्ड फंड हा एक आदर्श पर्याय आहे. या फंडाची पहिली एनएव्ही २७ मे १९९९ रोजी जाहीर झाली. फंडाच्या स्थापनेपासून दरमहा ५,००० रु. या प्रमाणे २११ महिने गुंतवीत आलेल्यांच्या १०.५५ लाख गुंतवणुकीचे आज ५२.८२ लाख रुपये झाले असून परताव्याचा दर १६.८१ टक्के आहे. १ जून १९९९ पासून या फंडात रोज १,००० गुंतविलेल्या (मासिक २० ते २२ हजार) ४१.५१ लाखाचे ५ जानेवारीच्या ‘रेग्युलर ग्रोथ’ नुसार २.०१ कोटी झाले असून परताव्याचा वार्षिक दर १६.५२ टक्के आहे. मागील दीड दोन वर्षांत या फंडाची कामगिरी त्याच्या पूर्वलौकिकाला साजेशी झाली नसली तरी या फंडाच्या समभाग गुंतवणुकीची धुरा मे २०१६ पासून अतुल भोळे हे सांभाळत असल्याने या फंडाची भविष्यातील कामगिरी (फंडाच्या व निधी व्यवस्थापकाच्या) पूर्वलौकिकाला साजेशी असेल अशी आशा बाळगण्यास वाव आहे. अतुल भोळे यांचे पदवीपर्यंतचे शिक्षण मुलुंड कॉलेज ऑफ कॉमर्स या ख्यातनाम महाविद्यालयात झाले. ते सनदी लेखपाल असून मुबई विद्यापीठाचे वित्तीय व्यवस्थापनातील पदव्युत्तर पदवीधारक आहेत. डीएसपी ब्लॅकरॉक या फंड घराण्यात दाखल होण्याआधी ते टाटा म्युच्युअल फंडात निधी व्यवस्थापक होते. टाटा फंड घराण्यात त्यांच्याकडे टाटा बॅलंस्ड फंडाची धुरा होती.
फंडाची गुंतवणूक लार्ज कॅप केंद्रित असून मिड कॅप व स्मॉल कॅप समभागांचा अंतर्भाव योग्य प्रमाणात असल्याने जोखीम व परतावा यांचा समतोल साधण्यात निधी व्यवस्थापक यशस्वी झाले आहेत. सध्या फंडाची ७० टक्के गुंतवणूक समभागात असून उर्वरित गुंतवणूक रोखे व रोकड संलग्न आहे. निधी व्यवस्थापक अतुल भोळे हे अव्वल व्यवस्थापन कौशल्य असलेल्या कंपनीच्या समभागात गुंतवणूक करतात. नफ्यात वृद्धी असण्याची शाश्वतता कंपन्यांच्या व्यवसाय करण्याच्या पद्धती यांना व्यवस्थापनाचा उच्च दर्जा या निकषाने प्राथमिकता देत निवडक समभागात त्यांनी गुंतवणूक केली आहे. नोव्हेंबर महिन्यात फंडाने सीएट तसेच एचडीएफसी आणि एलआयसी हौसिंग फायनान्स या गृह वित्तपुरवठा करणाऱ्या कंपन्या व डीसीबी बँक यांना आपल्या गुंतवणुकीतून वगळले असून धातू उद्योगात असलेल्या हिंदाल्को, वस्त्रोद्योगातील हिम्मत सिंग का सैद व तेल व वायू उद्योगातील गेल व पायाभूत सुविधा विकास क्षेत्रातील सद्भाव इंजिनीअरिंग यांचा गुंतवणुकीत नव्याने अंतर्भाव केला आहे. रोखे गुंतवणुकीत फंडाची सर्वाधिक ९.४२ टक्के गुंतवणूक अल्प मुदतीच्या रोकड समतुल्य गुंतवणूक प्रकारात केली आहे.
मे १९९९ मध्ये स्थापन झालेल्या या फंडाची मालमत्ता २०१४ मध्ये ५०० कोटींच्या आसपास होती. गुंतवणूकदारांनी पसंतीची मोहर उमटविल्यामुळे २,५०० कोटींचा टप्पा पार करण्याच्या बेतात आहे. क्रिसिल बॅलंस्ड फंड इंडेक्स हा या फंडाचा निर्देशांक आहे. फंडाची कार्यक्षमता मोजण्यासाठी चलत् परतावा हे चांगले मोजमाप आहे. फंडाचा दैनिक, साप्ताहिक, मासिक, तिमाही, वार्षिक, पंचवार्षिक व दशवार्षिक चलत् परतावा फंडाच्या संदर्भ निर्देशांकाच्या त्याच काळातील चलत् परताव्यापेक्षा नेहमीच अधिक राहिला आहे.
‘एसडब्लूपी’ अर्थात सिस्टेमॅटिक विथड्रावल प्लान हा एक पर्याय आहे. फारच कमी गुंतवणूक सल्लागार या पद्धतीचा आपल्या अशिलाच्या नियोजनात वापर करतात. या पद्धतीत गुंतविलेली रक्कम दरमहा नियमित स्वरूपात काढून घेता येते. म्युच्युअल फंडातील आपल्या युनिट्सपैकी विशिष्ट रकमेइतकी युनिट्स विकू न ही रक्कम गुंतवणूकदाराच्या बँक खात्यात जमा होते. सर्वसाधारणपणे एका वर्षांनंतर रक्कम काढण्यास सुरुवात करता येते. गुंतवणुकीनंतर एका वर्षांनंतर काढलेल्या या रकमेवर प्राप्तिकर भरावा लागत नाही.
सेवानिवृत्तीनंतर पेन्शन प्रकारचे नियमित उत्पन्न मिळविण्यासाठी विविध पर्याय उपलब्ध आहेत. सर्वात लोकप्रिय पर्याय म्हणजे बँकांच्या किंवा कंपन्यांच्या मुदत ठेवी. विमा कंपन्यांचे पेन्शन प्लान व सर्वात अव्वल असलेली पेन्शन नियमन व विकास प्राधिकरण पुरस्कृत नवीन पेन्शन योजना हे अन्य पर्याय आहेत. तहहयात पेन्शन मिळणे हे कोणत्याही चाकरमान्याचे स्वप्न असते. याच स्वप्नाने भारावले गेल्याने नोव्हेबर २०१६ पर्यंत गुंतवणूक केलेल्यांना ७.५० टक्के परतावा देणाऱ्या जीवन अक्षय (आता ७%) या लोकप्रिय योजनेत २,५०० कोटीचा हप्ता शेवटच्या दिवशी जमा झाला. रोकडसुलभता नसलेल्या व गुंतवणुकीची जोखीम नको असलेल्या गुंतवणूकदारांनी हा पर्याय पसंत केला. गुंतवणूकदारांनी हे लक्षात घेणे जरुरीचे आहे की विमा कंपन्यांच्या पेन्शन प्लानमध्ये करात सूट मिळाली तरी त्यात ना रोकड सुलभता ना भांडवली वृद्धी. यापेक्षा म्युच्युअल फंड गुंतवणुकीतून दरमहा नियमित रक्कम काढून घेण्याचा ‘एसडब्लूपी’ हा पर्याय रोकडसुलभ व भांडवली वृद्धी देणारा आहे. निश्चित परतावा देणाऱ्या व रोकडसुलभतेचा अभाव असणाऱ्या विमा योजनेपेक्षा भांडवली वृद्धी असलेला व वार्षिक परताव्याचा दर अधिक असलेला ‘एसडब्लूपी’ हा पर्याय निश्चितच उजवा आहे.
दिवसांत दोनवेळा संधिप्रकाश असतो. सूर्योदयाच्या वेळी व सूर्यास्ताच्या वेळी. अर्थोत्पादनाला सुरुवात करतेवेळी व अर्थार्जन संपल्यावर दोन्ही वेळेला बॅलंस्ड फंडातील गुंतवणूक फायद्याची ठरते. डीएसपी ब्लॅकरॉक बॅलंस्ड फंड लाभांशात मागील १६ वर्षे सातत्य राखलेला फंड आहे. भांडवली वृद्धी समाधानकारक असल्याने हा फंड सेवा निवृत्तीपश्चात करावयाच्या गुंतवणुकीसाठी आदर्श फंड ठरतो. कमावते असताना केलेली ‘एसआयपी’ व निवृत्तीनंतर केलेला ‘एसडब्यूपी’चा वापर गुंतवणूकदारांना निवृत्तीपश्चात आर्थिक चिंतामुक्त सुखाचा आनंद देऊ शकेल.
(अस्वीकृती: या स्तंभात वापरलेली माहिती व आकडेवारी ही उपलब्ध माहिती स्रोतांपासून घेतली आहे. या लेखाचा उद्देश या योजनेची वाचकांना ओळख व्हावी इतपतच मर्यादित आहे. वाचकांनी गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे अभिप्रेत आहे.)
वसंत माधव कुलकर्णी shreeyachebaba@gmail.com