- आयडीएफसी प्रीमियर इक्विटी फंड
प्रत्येक फंड घराण्याची यशस्वी योजना त्या फंड घराण्याची ओळख बनते. आयडीएफसी या फंड घराण्याला अशीच ओळख मिळवून देण्याचे काम आयडीएफसी प्रीमियर इक्विटी फंडाने केले. या फंडाच्या प्रारंभी म्हणजे पहिल्या दिवशी १ लाख गुंतविणाऱ्या गुंतवणूकदाराचे मागील ११ वर्षांत ७.७९ लाख झाले आहेत. २०.५४ टक्के परतावा देणारा हा फंड मागील एका वर्षांत दोन वेळा निधी व्यवस्थापक बदलल्यामुळे गुंतवणूकदाराच्या चिंतेचा विषय झाला आहे..
आयडीएफसी प्रीमियर इक्विटी फंड हा समभाग मिड कॅपकेंद्रित मल्टी कॅप फंड आहे. हा फंड विक्री व मूल्यांकनाचा अव्वल वृद्धीदर असणाऱ्या मिड आणि स्मॉल कॅप प्रकारच्या समभागात गुंतवणूक करणारा फंड आहे. मिड कॅप फंड आकर्षक परतावा देणारे असले तरी बाजार कोसळतो त्या वेळी मनाची परीक्षा घेणारे असतात. सध्या हा फंड क्रमवारीत अग्रभागी नसला तरी चार ते सात वर्षांच्या कालावधीच्या गुंतवणुकीवर बाजाराची साथ मिळाल्यास १५ टक्के परतावा मिळण्याची शक्यता आहे. एक आर्थिक आवर्तन आठ-साडेआठ वर्षांचे मानले जाते. फंडाने ११ वर्षे पूर्ण केलेली असल्याने एक संपूर्ण आवर्तन पूर्ण केले असल्याने सुरुवातीच्या तेजीत आणि त्यानंतरच्या मंदीत व सध्याच्या पुन्हा तेजीत या फंडाने परताव्याचे सातत्य राखले आहे.
हा फंड मल्टी कॅप प्रकारचा फंड असल्याने, विशिष्ट बाजार मूल्याचा निकष गुंतवणुकीस अडचणीचा ठरत नसला तरी या फंडाची ओळख मिड कॅपकेंद्रित अशी आहे. अव्वल व्यवस्थापन दर्जा असलेल्या विविध उद्योग क्षेत्रांतील आघाडीच्या कंपनीत गुंतवणूक करणारा हा फंड आहे. फंडाच्या आघाडीच्या पाच गुंतवणुकांमध्ये मारुती सुझुकी (वाहन उद्योग), भारत फायनान्शियल (सूक्ष्म वित्त पुरवठा), व्होल्टास (अभियांत्रिकी), एशियन पेंट्स (ग्राहकोपयोगी वस्तू) या वेगवेगळ्या उद्योगांचे नेतृत्व करणाऱ्या कंपन्यांचा समावेश आहे. यापैकी एशियन पेंट्समधील गुंतवणुकीत फंडाने वाढ केली आहे. ३० ऑगस्टला फंडाच्या गुंतवणुकीच्या ३.२५ टक्के रोकड सममूल्य साधनांचा अंतर्भाव होता. आघाडीच्या दहा गुंतवणुकांच्या जोडीला एमआरएफ, ब्ल्यू डार्ट, व्हीए टेक वाबाग या इतर फंडांच्या गुंतवणुकीत सहसा न आढळणाऱ्या समभाग गुंतवणुकांनी परताव्याच्या दरात आपापली कामगिरी चोख बजावली आहे.
ऑगस्ट २०१६ अखेरीस ६,३५२ कोटींची मालमत्ता असणारा आयडीएफसी प्रीमियर इक्विटी फंड येत्या शुक्रवारी २८ सप्टेंबर २०१६ रोजी १२ व्या वर्षांत पदार्पण करीत आहे. या फंडाच्या पहिल्या दिवशी म्हणजे २८ सप्टेंबर २००५ रोजी १ लाखाची गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदाराचे २३ सप्टेंबरच्या रेग्युलर ग्रोथ एनएव्हीनुसार ७.७९ लाख झाले आहेत. आयडीएफसी प्रीमियर इक्विटी फंड आणि केनेथ अँड्रय़ू या एकाच नाण्याच्या दोन बाजू होत्या. परताव्याच्या दरात २० टक्क्यांहून अधिक सातत्य राखणाऱ्या फंडाचे निधी व्यवस्थापक म्हणून केनेथ अँड्रय़ू यांचे नि:संशय मोठे योगदान आहे. केनेथ अँडर्य़ू यांच्यानंतर फंडाच्या गुंतवणूक विचारसरणीशी समभाग संशोधनप्रमुख या नात्याने परिचित असणाऱ्या पूनम शर्मा यांच्याकडे फंड घराण्याने निधी व्यवस्थापनाची जबाबदारी दिली. पूनम शर्मा यांच्याकडून ३० एप्रिल २०१६ पासून या फंडाच्या निधी व्यवस्थापनाची सूत्रे अनुप भास्कर यांच्याकडे आली आहेत. सव्वा वर्षांच्या काळात दोन वेळा खांदेपालट झाल्यामुळे गुंतवणूकदरांच्या मनात चलबिचल होणे साहजिक आहे. जेव्हा फंड व्यवस्थापनांत मोठे बदल होतात तेव्हा गुंतवणूकदारांच्या मनात दोन शंका उत्पन्न होतात. पहिली सुरू असलेली ‘सिप’ बंद करावी किंवा कसे व दुसरी गुंतविलेली रक्कम काढून घ्यावी किंवा कसे?
फंड घराण्याशी फारकत घेणारे केनेथ अँड्रय़ू काही पहिले निधी व्यवस्थापक नव्हेत. याआधी डीएसपीचे अपूर्व शहा, अॅक्सिस म्युच्युअल फंडाच्या पंकज मोरारका व स्वत: अनुप भास्कर यांनी दोन वेळा आपआपल्या फंड घराण्यांशी फारकत घेतली आहे. अनुप भास्कर यांनी वेगवेगळ्या आर्थिक आवर्तनात वेगवेगळे बाजार मूल्य असलेले फंड हाताळले आहेत. त्यांच्या पाठीशी गुंतवणूक व्यवस्थापनाचा मोठा अनुभव आहे. आर्थिक आवर्तनाच्या वेगवेगळ्या टप्प्यावर गुंतवणुका हाताळण्याचे कौशल्य त्यांना अवगत आहे. सुंदरम सिलेक्ट मिड कॅप व यूटीआय मिड कॅप हे दोन मिड कॅप फंड यशस्वीरीत्या त्यांनी हाताळले आहेत. एक यशस्वी मिड कॅप फंड व्यवस्थापक अशी त्यांची ओळख आहे.
एखादा फंड गुंतवणुकीतून संपत्तीची निर्मिती करण्यात यशस्वी होतो त्यामागे फंडाची गुंतवणुकीची ढोबळ धोरणे व त्या धोरणांशी तादाम्य राखणारी शिस्त कारणीभूत असते. ही धोरणे व्यक्तीकेंद्रित नसून आखलेल्या शिस्तीच्या चौकटीचे भान ठेवणारी असतात. नवीन फंड व्यवस्थापकांनी घेतलेल्या निर्णयातून ही चौकट अधिक मजबूत केल्याचेच दिसून येते. फंडाच्या गुंतवणुकीच्या ढाच्यात मोठे बदल झाले नसल्याने गुंतवणूकदार व त्याहून अधिक म्युच्युअल फंड विक्रेत्यांना वाटणारी ही भीती निर्थक असल्याचे लवकरच स्पष्ट झाले. नवीन व्यवस्थापक गुंतवणूक करताना फंडाच्या जुन्या धोरणांशी सातत्य राखणारा असेल तर थोडय़ा अधिक फरकाने मागील परताव्याची पुनरावृत्ती झालेली दिसते. मागील दहा वर्षांच्या कालावधीत सर्वाधिक संपत्तीची निर्मिती करणाऱ्या सुंदरम सिलेक्ट मिड कॅपचे निधी व्यवस्थापक तीनदा बदलले असले तरी या बदलांचा फंडाच्या कामगिरीवर मोठा परिणाम झालेला दिसत नाही. तरी हा फंड मागील एका वर्षांच्या परताव्यावर आधाराने केलेल्या तुलनेत पहिल्या ५० फंडातदेखील नाही.
मागील एका वर्षांच्या परताव्याच्या दरामुळे आयडीएफसी प्रीमियर इक्विटी फंड आजच्या अव्वल परतावा देणाऱ्या फंडात नसला तरी क्रिसिलच्या kConsistent Performers – Equity fundsl या यादीतील मोजक्या फंडात या आयडीएफसी प्रीमियर इक्विटी फंडाचा समावेश आहे. परताव्याच्या दरात सातत्य राखणाऱ्या फंडाचा क्रिसिल रँकिंगचा वेगळा गट आहे. ही यादी एखाद्या फंडाचे गुणात्मक व संख्यात्मक विश्लेषण करून तयार होते. दीर्घ कालावधीत परताव्याच्या दरात सातत्य राखणारे फंड एखाद्या वर्षांत अव्वल परतावा देणाऱ्या फंडापेक्षा मोठय़ा संपत्तीची निर्मिती करतात. क्रिसिलची पत ठरविण्याची पद्धत ही गुणात्मक व संख्यात्मक विश्लेषण करणारी असल्याने निधी व्यवस्थापकांत झालेला बदल विश्लेषण करताना नक्कीच दुर्लक्षिला गेला नसेल. नवीन व्यवस्थापनाखाली परताव्याच्या दरात सातत्य राखले गेले म्हणूनच या फंडाचा समावेश या यादीत आहे. तरी जोखीम स्वीकारण्याच्या क्षमतेनुसार या फंडाचा गुंतवणुकीत समावेश करण्याचा अथवा नव्याने विचार करावा असा सल्ला द्यावसा वाटतो.
shreeyachebaba@gmail.com
(अस्वीकृती: लेखात वापरलेली माहिती व आकडेवारी ही उपलब्ध माहिती स्रोतांपासून घेतली आहे. या लेखाचा उद्देश या योजनेची वाचकांना ओळख व्हावी इतपतच मर्यादित आहे. वाचकांनी गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे अभिप्रेत आहे.)