रिलायन्स टॉप २०० फंड
निर्देशांक रोज नवीन शिखर गाठत असताना गुंतवणुकीसाठी फंडाची निवड विवेकानेच होणे गरजेचे आहे. म्हणूनच ज्यांची वित्तीय ध्येये किमान पाच वर्षे दूर आहेत अशा गुंतवणूकदारांनी ‘हाय अल्फा’ फंडात गुंतवणूक करावी, अशी शिफारस वित्तीय सल्लागार करीत असतात. अल्फा हे संदर्भ निर्देशांकाहून फंडाने किती अधिक परतावा दिला हे मोजण्याची क्रिया आहे. आणखी दोन महिन्यांनी दहा वर्षे पूर्ण करणारा हा फंड दीर्घकालीन वित्तीय उद्दिष्टांसाठी गुंतवणूक करावा असा हाय अल्फा फंड निश्चितच..
मागील पाच वर्षांत रिलायन्स टॉप २०० फंडाने नियोजनबद्ध गुंतवणुकीवर (एसआयपी) १८.६२ टक्के वार्षिक परतावा दिला आहे. २२ मे २०१२ पासून दरमहा ५,००० रुपये नियोजनबद्ध पद्धतीने गुंतविणाऱ्या गुंतवणूकदारांना ३००,००० रुपयांच्या गुंतवणुकीचे १९ मे २०१७च्या रेग्युलर ग्रोथ एनएव्हीनुसार ४.७६ लाख झाले आहेत. लार्ज कॅप फंड गटात मागील पाच वर्षांत नियोजनबद्ध गुंतवणुकीवर १५ टक्क्यांहून अधिक परतावा देणाऱ्या फंडांत रिलायन्स टॉप २०० फंडाचा समावेश आहे. ‘मॉर्निग स्टार’ने या फंडाच्या ‘फोर स्टार’ रेटिंगवर नुकतेच शिक्कामोर्तब केले आहे.
रिलायन्स म्युच्युअल फंडाचे शैलेश राज भान हे या फंडाचे निधी व्यवस्थापक आहेत. फंडाच्या मालमत्तेने नुकताच ३,००० कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. येत्या ऑगस्ट महिन्यात फंड १० वर्षे पूर्ण करेल. ‘एस अॅण्ड पी २००’ हा या फंडाचा संदर्भ निर्देशांक आहे. फंडाच्या एकूण गुंतवणुकीपैकी ८० टक्के गुंतवणूक संदर्भ निर्देशांकातील कंपन्यांत असते. मागील दहा वर्षांत फंडाने ३८ पैकी ३५ तिमाहीत संदर्भ निर्देशांकापेक्षा किमान ४ टक्के अधिक वार्षिक परतावा दिला आहे. ऑगस्ट २०११ पासून प्रत्येक तिमाहीत फंडाने संदर्भ निर्देशांकाच्या ७५ टक्के अधिक वार्षिक परतावा दिला आहे. ऑगस्ट २००७ पासून पहिले वर्ष वगळता ९ वर्षे हा फंड सातात्याने लाभांश देत असून मागील महिन्यापासून या फंडाने गुंतवणूकदारांना मासिक लाभांश देण्यास सुरुवात केली आहे.
फंडाच्या एकूण गुंतवणुकीत ८० टक्के गुंतवणूक लार्ज कॅप प्रकारची आहे. एकूण गुंतवणुकीच्या ७५ टक्के गुंतवणूक बँकिंग व वित्तीय सेवा (३४.१५%), ग्राहकोपयोगी वस्तू (१८.५८%), वाहन उद्योग (१३.५७%), अभियांत्रिकी (१०.४५%) या चार उद्योगांत असून हा फंड सक्रिय निधी व्यवस्थापन करणारा आहे.
स्टेट बँक, आयटीसी, एचसीएल टेक्नोलॉजी, लार्सन अॅण्ड टुब्रो व इन्फोसिस या समभागांत फंडाची सर्वाधिक गुंतवणूक आहे. फंडाच्या ताज्या गुंतवणुकीच्या बाबतीतील घडामोडीत फंडाने एचडीएफसी व बजाज ऑटो या गुंतवणुका विकून टाकल्या व इंडियन ऑइल व अॅव्हेन्यू सुपरमार्ट या दोन समभागांमध्ये नव्याने गुंतवणूक केली आहे. मागील दोन वर्षे फंडाने स्टेट बँक व लार्सन अॅण्ड टुब्रो या कंपन्यातून गुंतवणूक सातत्याने वाढविली आहे. या कारणामुळे लार्ज कॅप फंड गटातील अन्य फंडाच्या तुलनेत या फंडाचे प्रमाणित विचलन अधिक आहे. अल्फा हे संदर्भ निर्देशांकाहून किती अधिक परतावा मिळविला हे मोजण्याची क्रिया आहे. दीर्घ मुदतीच्या वित्तीय ध्येयांसाठी नेहमीच ‘हाय अल्फा’ फंडात गुंतवणूक करण्याची शिफारस वित्तीय सल्लागार करीत असतात. आणखी दोन महिन्यांनी दहा वर्षे पूर्ण करणारा हा फंड दीर्घकालीन वित्तीय उद्दिष्टांसाठी गुंतवणूक करावा असा हाय अल्फा फंड आहे.
निर्देशांक रोज नव्या शिखरावर स्थिरावत असताना गुंतवणुकीसाठी फंडाची निवड विवेकानेच करणे गरजेचे आहे. ज्यांची वित्तीय ध्येये किमान पाच वर्षे दूर आहेत अशा गुंतवणूकदारांसाठी आजची ही शिफारस आहे. पुढील पाच वर्षांचा विचार केला तर निर्देशांक किमान १० टक्के परतावा देतील असे गृहीत धरले तरी हा फंड संदर्भ निर्देशांकाच्या परताव्यापेक्षा ३ ते ५ टक्के अधिक परतावा देईल. मागील एका वर्षांत निर्देशांकाने २५ टक्के परतावा दिलेला असताना या फंडाने ३० टक्के परतावा दिला आहे. चलत् परतावा (रोलिंग रिटर्न) हे परताव्याच्या दरातील सातत्य मोजण्याचे चांगले साधन आहे. मागील नऊ वर्षांत ३ वर्षे व ५ वर्षे कालावधीतील चलत् परतावा पाहता, ७७ टक्के वेळा निर्देशांकापेक्षा ३ टक्के अधिक परतावा देण्यात तर ७२ टक्के वेळा निर्देशांकापेक्षा ५ टक्के व ६७ टक्के वेळा निर्देशांकाहून ७ टक्के अधिक परतावा फंडाने दिला आहे. सध्या निर्देशांक शिखरावर असताना गुंतवणुकीत योग्य नियोजन करण्याची संधी असते. कामचुकार किंवा सरासरीहून कमी परतावा दिलेल्या गुंतवणुका वजा करून नवीन गुंतवणुका करून पोर्टफोलिओचे संतुलन राखणे आवश्यक असते. सर्वसाधारणपणे अल्प परतावा दिलेले दोन फंड काढून टाकून त्या बदल्यात १ हाय अल्फा फंडाचा नव्याने अंतर्भाव अशा समयी करता येतो. अशा प्रकारचे संतुलन करताना गुंतवणुकीसाठी आवर्जून विचार करावा असा हा फंड आहे.
(अस्वीकृती: या स्तंभात वापरलेली माहिती व आकडेवारी ही उपलब्ध माहिती स्रोतांपासून घेतली आहे. या लेखाचा उद्देश या योजनेची वाचकांना ओळख व्हावी इतपतच मर्यादित आहे. वाचकांनी गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे अभिप्रेत आहे.)
वसंत माधव कुलकर्णी shreeyachebaba@gmail.com