टाटा कॉर्पोरेट बाँड फंड
गुंतवणुकीची मुबलक रोकड सुलभता आणि निर्गमन शुल्क शून्य आहे. फंडात कधीही गुंतवणूक करता येते व कधीही काढून घेता येईल. बचत खात्याची रोकड सुलभता आणि मुदत ठेवींचा परतावा देणारा हा फंड ठरतो तो यामुळेच. त्यातच पुरेसा परताव्याचाही मिलाफ साधणारा हा फंड व्याजदर वाढण्याची शक्यता असताना गुंतवणुकीचा घटक असायलाच हवा..
फेब्रुवारी २०१७ च्या पतधोरणात रिझव्र्ह बँकेने ऋणनीतीचा रोख समावेशकतेऐवजी तटस्थता राखणारे असेल याचा सर्वप्रथमच उच्चार केला. या दिशाबदलानंतर उद्योग- व्यवसायाच्या अपेक्षा व्याजदर कपातीकडून स्थिर किंवा प्रसंगी व्याजदर वाढविणाऱ्या व्यक्त होऊ लागल्या. म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांनी सुद्धा रोखे गुंतवणूक करणाऱ्या फंडात ‘डय़ुरेशन’ फंडांकडून ‘अक्रुअल’ फंडांकडे वळणे गरजेचे आहे. गुंतवणुकीच्याधोरणात हा दिशाबदल करताना टाटा कॉर्पोरेट बाँड फंडाचा प्राधान्याने विचार करावा यासाठी आजची ही शिफारस आहे.
रिझव्र्ह बँकेच्या पतधोरणात ‘तटस्थते’च्या कल बदलाच्या घोषणेआधी केंद्र सरकारच्या रोख्यांच्या परताव्याचा आलेख पायाकडे झुकणारा होता तो आता बदलून आलेखाची दिशा वरच्या बाजूला प्रवास करती झाली आहे. (सोबतचा आलेख पाहावा.) याचा अर्थ बाजाराला नजीकच्या काळात व्याजदर कपात अपेक्षित नाही. तरीसुद्धा जानेवारीपासून विदेशी गुंतवणूकदारांनी ताज्या उपलब्ध माहिती स्रोतानुसार ५६ हजार कोटींची गुंतवणूक केंद्र सरकारच्या रोख्यांमध्ये केली आहे. याचा परिणाम १० वर्षे मुदतीच्या रोख्यांच्या परताव्याचा दर ६.७५ ते ७.०० दरम्यान राहणे अपेक्षित आहे. याचे मुख्य कारण अर्थसंकल्पात केंद्र सरकारने वित्तीय तूट ३.१ टक्के राखण्याला दिलेले प्राधान्य म्हणता येईल. तुटीवर नियंत्रणाला काटेकोर प्राधान्य असल्याने केंद्र सरकारची कर्ज उभारणी ३ लाख कोटींदरम्यान राहील, असे दिसते. निश्चलनीकरणानंतर बँकांकडे मोठय़ा प्रमाणावर रोकड सुलभता असणे हे दुसरे कारण आहे. तिसरी महत्त्वाची गोष्ट अशी की रिझव्र्ह बँकेला अपेक्षित असलेला किरकोळ किमतींवर आधारित महागाईचा दर ४ ते ५ टक्क्य़ांदरम्यान राहील असा अंदाज आहे.
या फंडाचा उद्देश एका वर्षांच्या गुंतवणुकीवर स्टेट बँकेच्या एक वर्षांच्या मुदत ठेवीवर करपूर्व मिळणाऱ्या व्याजाइतका परतावा गुंतवणूकदारांना मिळावा अशी असून फंडाच्या रोख्यांची मुदतपूर्ती व्याजदर बदलामुळे रोख्यांच्या किंमतीत होणाऱ्या बदलाचा कमीत कमी परिणाम व्हावा या पद्धतीने जोखीम व परतावा यांचा समतोल साधण्याचा निधी व्यवस्थापक प्रयत्न करेल. हा फंड अल्प मुदतीच्या दर्जेदार रोख्यात गुंतवणूक करणारा फंड आहे. अर्थव्यवस्थेचा वेग मंदावल्यामुळे सध्या प्रत्येक दोन रोख्यांची पत कमी होताना एका रोख्याची पत उंचावली जात आहे. अशा वेळी गुंतवणुकीचा दर्जा राखणे हा महत्त्वाचा मुद्दा आहे. फंडाच्या गुंतवणुकीत ‘डबल ए मायनस’पेक्षा कमी पत असलेले रोखे नसल्याने फंडाने गुंतवणूक केलेल्या रोख्यांची पत समाधानकारक आहे. फंडाची ७० टक्के गुंतवणूक ‘ट्रिपल ए’ ही सर्वोच्च पत धारण करणाऱ्या रोख्यांत असून १५ टक्के गुंतवणूक ‘डबल ए’, ७ टक्के गुंतवणूक ‘डबल ए मायनस’ ही पत धारण करणाऱ्या रोख्यांत असून उर्वरित गुंतवणूक रोकड सममूल्य गुंतवणूक आहे. पोर्टफोलिओ यील्ड ७.८५ टक्के असल्याने मालमत्ता व्यवस्थापन खर्च वजा जाता फंडाच्या गुंतवणुकीवर ६.१५ टक्के परतावा सहज मिळू शकेल. या फंडाचे निर्गमन शुल्क शून्य आहे. त्यामुळे गुंतवणुकीची मुबलक रोकड सुलभता आहे. या फंडात कधीही गुंतवणूक करता येते व कधीही काढून घेता येईल. हा फंड बचत खात्याची रोकड सुलभता आणि मुदत ठेवींचा परतावा देणारा ठरतो तो यामुळेच.
केवळ वैयक्तिक गुंतवणूकदारच नव्हे तर लघु व मध्यम उद्योगसुद्धा अल्प मुदतीसाठी बँकांच्या मुदत ठेवींची निवड करतात. बँकांच्या अल्प मुदतीच्या ठेवींवरील व्याजदरात निश्चलनीकरणानंतर मोठी घसरण झाली. या घसरणीचा फटका अल्प मुदतीसाठी मुदत ठेव करणाऱ्यांना बसला. यावर उपाय म्हणून असे ठेवीदार या किंवा अन्य फंड घराण्याच्या या प्रकारच्या फंडाचा नव्याने विचार करू शकतील. मुदत ठेवीत मुदतपूर्व पैसे काढल्यास अतिरिक्त शुल्क आकारले जाते, त्यामुळे एक तर रोकडसुलभतेशी तडजोड करावी लागते किंवा मुदत ठेवीपेक्षा कमी व्याजदरात ठेव पावती मोडावी लागते. या फंडाला निर्गमन शुल्क नसल्याने एका दिवसापासून अनेक दिवासांपर्यंत पैसे गुंतविण्याचा हा उत्तम पर्याय आहे. व्याजदर वाढण्याची शक्यता असताना शून्य शुल्क आकारणीमुळे उत्तम रोकड सुलभता व पुरेसा परतावा यांचा मिलाफ साधणारा हा फंड म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांच्या गुंतवणुकीचा भाग असायला हवा.
(अस्वीकृती: लेखाचा उद्देश या योजनेची वाचकांना ओळख व्हावी इतपतच मर्यादित आहे. स्तंभातील आकडेवारी व माहिती ही उपलब्ध स्रोतांपासून घेतली आहे. वाचकांनी गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे अभिप्रेत आहे.)
वसंत माधव कुलकर्णी shreeyachebaba@gmail.com