तांत्रिक विश्लेषणाच्या दृष्टिकोनातून येत्या आठवडय़ातील निर्देशांकांची आणि सोन्यासह, लक्षणीय समभागाच्या संभाव्य वाटचालीचा वेध घेणारे साप्ताहिक सदर..
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
गेल्या लेखात नमूद केल्याप्रमाणे निर्देशांकाला तेजीची नवनवीन शिखरे गाठण्याआड येणारे किंतु-परंतुंचा उल्लेख आला होता. त्यासाठी नमूद कारणे आता प्रत्यक्षात येत असली तरी निर्देशांकांची घोडदौड कायम आहे.
तेजीला खीळ घालणारी कारणे-
१. कच्चे तेल पिंपामागे ६८ डॉलरवर झेपावले आहे.
२. अर्थव्यवस्थेची गती २०१६-१७ मध्ये मंदावल्याची सरकारकडून कबुली.
या पाश्र्वभूमीवर गेल्या लेखात उल्लेख केलेल्या किंतु-परंतुंना न जुमानता निर्देशांक ३४,४००/ १०,५७५च्या उच्चांकासमीप पोहोचला. या अनुषंगाने हा आठवडा कसा असेल त्याचा आढावा घेऊ या.
शुक्रवारचा बंद भाव –
’ सेन्सेक्स : ३४,१५३.८५
’ निफ्टी : १०,५५८.९०
या आठवडय़ात निर्देशांक ३३,९५० / १०,५१५ च्या स्तरावर सातत्याने टिकत असल्यास (वस्तुत: शुक्रवारचा बंद भाव या पातळीपुढेच आहे. पण या आठवडय़ात या पातळीवर सातत्य हवे!) प्रथम वरचे उद्दिष्ट ३४,३५०/ १०,६२० ते १०,६५० असेल आणि द्वितीय उद्दिष्ट ३४,७०० / १०,८०० असे असेल. निर्देशांक जोपर्यंत ३३,७०० / १०,४०० ची पातळी राखण्यात यशस्वी ठरत आहे. तोपर्यंत तेजीची पालवी कायम आहे असे गृहीत धरावे.
सोन्याचा किंमत-वेध
* गेल्या आठवडय़ात सोन्याच्या भावाने रु. २९,००० चा स्तर राखत आपले पहिले वरचे उद्दिष्ट रु. २९,३०० गाठले आणि रु. २९,३०० चा स्तर कायम राखला, तर द्वितीय उद्दिष्ट रु. २९,६०० असेल. आताच्या घडीला सोन्याच्या भावाला रु. २८,७०० चा भरभक्कम आधार असेल. (सोन्याचे भाव ‘एमसीक्स’ वरील व्यवहारावर आधारित).
लक्षणीय समभाग
भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड (भेल)
(बीएसई कोड – ५००१०३)
शुक्रवारचा बंद भाव : रु. १०२.३५
* अवजड, पायाभूत क्षेत्रातील प्रतिथयश कंपनी (ब्ल्यू चीप) पण सध्या मंदीच्या गत्रेत अडकलेला समभाग कुठला? असे विचारले – तर ‘भेल’चा असे उत्तर आवर्जून येईल. अडगळीत फेकल्या गेलेल्या समभागांमध्ये भेलचा उल्लेख करावा लागेल. समभागाचा आजचा बाजारभाव हा २०० (९६), १०० (८९), ५० (९३), २० (९२) अशा सर्व दिवसांच्या चलत् सरासरीवर (मूव्हिंग अॅव्हरेज) वर बेतलेला आहे. समभागाचा सामान्य मार्गक्रमण पट्टा (बॅण्ड) हा रु. ८५ ते १०० आहे.
रु. १०० च्या वर भाव सातत्याने दहा दिवस टिकल्यास शाश्वत तेजी सुरू होऊन प्रथम वरचे उद्दिष्ट रु. ११० असेल. त्यानंतर रु. १२५-१३० असेल. दीर्घ मुदतीचे उद्दिष्ट हे रु. १८० ते रु. २०० असेल. या दीर्घ मुदतीच्या गुंतवणुकीला रु. ८० चा ‘स्टॉप लॉस’ ठेवावा.
आशीष अरविंद ठाकूर ashishthakur1966@gmail.com
अस्वीकृती : शेअर बाजारातील व्यवहार हे बाजारातील जोखमीच्या अधीन आहेत. अंदाज चुकल्यास मुद्दल गमावण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी ‘स्टॉप लॉस’ आणि इच्छित उद्दिष्ट या संकल्पनाचे पालन करणे आवश्यक आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.