• एचडीएफसी प्रुडन्स फंड

एचडीएफसी प्रुडन्स या बॅलन्स्ड फंडाची समभाग गुंतवणूक प्रशांत जैन या कुशल निधी व्यवस्थापकाकडे असल्याने बॅलन्स्ड फंडांच्या परतावा दराच्या क्रमवारीत हा फंड अव्वल स्थानी आहे. अनेक गुंतवणूकदार भांडवली वृद्धी व परताव्याच्या दरात सातत्य राखणाऱ्या फंडाच्या शोधात असतात. जुन्याजाणत्या गुंतवणूकदारांच्या पसंतीस उतरलेल्या या फंडाची नवगुंतवणूकदारांसाठी आज ही नव्याने शिफारस..  

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

गुंतवणुकीच्या भांडवली वृद्धीत सातत्य म्हणजे काय हे अनुभवायचे असेल तर एचडीएफसी प्रुडन्सचे उदाहरण देता येईल. मुलांचे शिक्षण व सेवानिवृत्तीपश्चातचा उदरनिर्वाह या सारख्या वित्तीय ध्येयांसाठी हा फंड आदर्श पर्याय आहे. डिसेंबर १९९३ मध्ये सुरुवात झालेल्या या फंडाची ३१ मार्च रोजी मालमत्ता १९ हजार कोटींपेक्षा जास्त होती. २००३ मध्ये या फंडाच्या समभाग गुंतवणुकीची धुरा प्रशांत जैन यांच्याकडे आली. राकेश व्यास हे जैन यांना २०१२ पासून निधी व्यवस्थापनात साहाय्य करतात. भविष्याचा वेध घेत आकर्षक मूल्यांकन असलेल्या समभागांचा गुंतवणुकीत ३ ते ५ वर्षांसाठी समावेश करण्यात या कुशल व्यवस्थापकांचा हातखंडा आहे. भांडवली वृद्धीसोबत १ जानेवारी २०१६ पासून या फंडाने मासिक लाभांश जाहीर करण्यास सुरुवात केली आहे. जानेवारी २०१६ मध्ये १ लाखाच्या गुंतवणुकीवर गुंतवणूकदारांना मार्च २०१७ पर्यंत फंडाने २१५०२ कोटी रुपये करमुक्त लाभांशाचे वाटप केले आहे. गुंतवणुकीवर मिळणाऱ्या मासिक लाभांशाचा तपशील सोबतच्या चौकटीत दिला आहे.

क्रिसिल बॅलन्स्ड फंड (अ‍ॅग्रेसिव्ह) हा या फंडाचा संदर्भ निर्देशांक आहे. फंडाच्या गुंतवणुकीत सध्या ७५ टक्के समभाग २२ टक्के रोखे व उर्वरित रोकड सममूल्य असलेल्या गुंतवणुकीचा समावेश आहे. फंडाने सर्वाधिक गुंतवणूक अनुक्रमे स्टेट बँक, लार्सन अ‍ॅण्ड टुब्रो, आयसीआयसीआय बँक, इन्फोसिस आणि रिलायन्स इंडस्ट्रीज या समभागात केली असून अनुक्रमे बँकिंग व वित्तीय सेवा, संकीर्ण उद्योग, माहिती तंत्रज्ञान, पायाभूत सुविधा विकास ही या फंडाची सर्वाधिक गुंतवणूक असलेली उद्योग क्षेत्रे आहेत. रोखे गुंतवणुकीत केंद्र सरकारच्या २०१६ व २०४५ मध्ये मुदतपूर्ती असलेले रोखे आणि स्टेट बँक, कॅनरा बँक, युनियन बँकेच्या रोख्यांचा समावेश आहे. गुंतवणुकीच्या सक्रिय व्यवस्थापनामुळे बॅलन्स्ड फंड गटात एचडीएफसी प्रुडन्स अव्वलस्थानी आहे. मागील ५ वर्षांत फंडाची समभाग गुंतवणूक ७१ ते ७५ टक्के दरम्यान आहे. अन्य बॅलन्स्ड फंडांच्या तुलनेत या फंडाचे समभाग गुंतवणुकीचे प्रमाण १० टक्कय़ांनी अधिक आहे.

मध्यंतरी प्रशांत जैन यांची समभाग निवडीची पद्धत विशिष्ट वर्तुळात टीकेची लक्ष्य झाली होती. प्रशांत जैन यांच्यासाठी ही टीका नवीन नाही. १९९८-९९ सुमारास माहिती तंत्रज्ञान उद्योगातील कंपन्यांचे समभाग प्रशांत जैन व चंद्रेश निगम (अ‍ॅक्सिस म्युच्युअल फंडाचे विद्यमान मुख्य कार्यकारी अधिकारी व व्यवस्थापकीय संचालक) यांनी विकले होते. तेव्हा देखील त्यांना टीकेला सामोरे जावे लागले होते. २००७ मध्ये स्थावर मालमत्ता विकासकाचा एकही समभाग त्यांच्या गुंतवणुकीत नसणे, २०१३ च्या सुमारास हिंदुस्थान युनिलिव्हरसारख्या एफएमसीजी  कंपनीचा समावेश आघाडीच्या गुंतवणुकीत केल्याने त्यांच्यावर टीका झाली होती. २०१५ मध्ये अन्य फंड स्टेट बँकेचे समभाग विकत असताना प्रशांत जैन यांनी आपल्या फंडाची स्टेट बँकेच्या घसरलेल्या भावात गुंतवणूक वाढविणे पसंत केले. ही गुंतवणूक करण्यामागची कारणे त्यांनी वेळोवेळी सांगितलीसुद्धा आहेत. सरकारचा भर विकासावर असल्याने पायाभूत सुविधा व भांडवली वस्तू उद्योगात प्रशांत जैन यांनी आपल्या फंडाची गुंतवणूक केली आहे. या गुंतवणुकीची फळे दिसत असल्याने हा फंड परताव्याच्या अव्वल स्थानी आहे. मागील वर्षभरात स्टेट बँकेने ४४ टक्के, टाटा स्टीलने ८५ टक्के, लार्सन अँड टुब्रोने ३१ टक्के भांडवली वृद्धी दिली आहे. इन्फोसिस, आरबिंदो फार्मा यांनी नकारात्मक परतावा दिला आहे. ‘लोकसत्ता’च्या ९ फेब्रुवारी २०१६च्या अंकात प्रकाशित झालेल्या त्यांच्या मुलाखतीत त्यांनी म्हटल्याप्रमाणे गुंतवणूकदारांना परतावा लार्ज कॅप गुंतवणुकीतून दिला असून अन्य फंडाप्रमाणे मिड कॅप गुंतवणुकीतून मिळविलेला नाही याची दखल घेणे गरजेचे ठरते.

डिसेंबर २०१८ मध्ये एचडीएफसी प्रुडन्स गुंतवणूकदारांच्या सेवेतील पंचवीस वर्षे पूर्ण करेल. भविष्यात भारतीय म्युच्युअल फंडांचा इतिहास लिहिला गेला तर हा इतिहास एचडीएफसी प्रुडन्सचा उल्लेख केल्याशिवाय पूर्ण होणार नाही. दरमहा नियोजनबद्ध गुंतवणूक असो किंवा एकदाच केलेली गुंतवणूक असो, या फंडाने गुंतवणूकदारांना निराश केले नाही. मागील दोन वर्षांपासून हा फंड भांडवली वृद्धीच्या जोडीला मासिक लाभांशसुद्धा देत आहे. बँकांच्या मुदत ठेवींचे व्याजदर कमी होत असताना ज्यांना नियमित उत्पन्नाची गरज आहे अशांसाठी तर हा एक पर्याय आहे. म्युच्युअल फंडातील गुंतवणूक मुदत ठेवींच्या इतकी जोखीमरहित नसते हे लक्षात ठेवून ज्यांना नियमित उत्पन्न हवे आहे; फंड मालमत्तेच्या किमतीत कमी चढ उतार गृहीत धरून भांडवली वृद्धी हवी आहे अशांसाठी हा आदर्श पर्याय आहे.

गुंतवणुकीत मिड कॅप समभागांचे प्रमाण मर्यादित राखूनही त्या फंड गटात हा एचडीएफसी प्रुडन्स फंड सर्वोत्तम परतावा देत असल्यामुळे हा फंड विलोभनीय आहे. नियमित करमुक्त उत्पन्नासोबत भांडवली वृद्धी देणारा फंड असल्याने म्युच्युअल फंड गुंतवणुकीचा हिस्सा असावा यासाठी ही शिफारस.

shreeyachebaba@gmail.com

(अस्वीकृती: या स्तंभात वापरलेली माहिती व आकडेवारी ही उपलब्ध माहिती स्रोतांपासून घेतली आहे. या लेखाचा उद्देश या योजनेची वाचकांना ओळख व्हावी इतपतच मर्यादित आहे. वाचकांनी गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे अभिप्रेत आहे.)