आयसीआयसीआय प्रुडेन्शियल फोकस्ड ब्लूचीप फंड

‘हाय अल्फा’ मिळविण्यासाठी पोर्टफोलिओ व्यवस्थापन सक्रिय असावे लागते. लार्ज कॅप गटात सक्रिय व्यवस्थापन असणारे फंड अभावानेच आढळतात. तथापि समभाग केंद्रित जोखीम पत्करून दीर्घकालीन भांडवली नफा कमावण्यावर भर असणारा हा एक फंड ..

बुधवारच्या ‘लोकसत्तात अर्थसत्ता’ पानावर ‘सेन्सेक्स तिमाही तळात!’ या मथळ्याची बातमी होती. बुधवारी बाजाराच्या कामकाजाच्या सत्रात सेन्सेक्सने घेतलेल्या उसळीचे वार्ताकन ‘जीएसटी’ दर अनुकूलतेने सेन्सेक्सची ५२१ अंशांची झेप’ असे वर्णन केले होते. तर तिसऱ्या दिवशी बाजार सेन्सेक्स ६६.५१ अंकांनी ढेपाळला. निर्देशांकांतील या मोठय़ा चढ-उतारांचा गुंतवणूक मूल्योवर होणाऱ्या परिणामांना ‘फकरङ’ ही संज्ञा वापरली जाते. बाजारात गुंतवणूक करण्यात जोखीम वाढल्याने ‘हाय अल्फा’ फंडांच्या मालिकेतील तिसऱ्या फंडासाठी आयसीआयसीआय प्रुडेन्शियल फोकस्ड ब्लूचीप फंड या लार्ज कॅपफंडाची जाणीवपूर्वक निवड केली आहे. ‘फोकस्ड फंड’ हे नेहमीच समभाग केंद्रित जोखीम घेत असल्याने बाजारातील वेगाने होणाऱ्या चढ-उतारांचा सामना करण्यासाठी मध्यम जोखीम असलेल्या गुंतवणूकदारांनी लार्ज कॅपफंडांना पसंती द्यवी हा या मागचा उद्देश. arth04

‘हाय अल्फा’ मिळविण्यासाठी पोर्टफोलिओ व्यवस्थापन सक्रिय असावे लागते. लार्ज कॅप गटात सक्रिय व्यवस्थापन असणारे फंड अभावाने आढळतात. आयसीआयसीआय प्रुडेन्शियल फोकस्ड ब्लूचीप फंड या समभाग केंद्रित जोखीम पत्करून दीर्घकालीन भांडवली नफा कमविण्यावर भर असणारा फंड आहे. या फंडाच्या एनएव्हीतील चढ-उतार, शार्प रेशो, अल्फा तपासले असता, या फंड जोखमीच्या तुलनेत सर्वसाधारण परतावा मिळविणारा फंड आहे. मॉर्निग स्टार व व्हॅल्यू रिसर्च ऑनलाइन यांनी फंडाला ‘फोर स्टार’ रेटिंग दिले असल्याने पोथिनिष्ठ स्वतंत्र गुंतवणूक सल्लगार व सेबी नोंदणीकृत गुंतवणूक सल्लागार या फंडाची शिफारस करीत असल्याने या फंडाचा समावेश अनेकांच्या गुंतवणुकीत आढळतो. बहुतांश ‘हाय अल्फा’ फंड हे मिड कॅप फंड आहेत. मिड कॅप व लार्ज कॅप यांच्या सध्याच्या मूल्यांकनातील फरक तपासाला असता, मागील वर्षभरात मिड कॅप समभागांच्या भावात मोठी वाढ झालेली दिसते. सध्याच्या स्थितीत पारंपरिक गुंतवणूकदरांनी नवीन गुंतवणुकीसाठी लार्ज कॅप फंडाच्या विचार करणे हिताचे आहे. फंडाचा ‘पीई’ २३.५७ असल्याने भविष्यात या फंडाकडून खूप चमकदार कामगिरी अपेक्षित नसली तरी वेगाने चढ-उतारांच्या परिस्थितीत गुंतवणुकीला स्थैर्य देण्याची कामगिरी हा फंड नक्कीच करेल. या फंडाच्या गुंतवणुकीत खासगी बँका, वाहन उद्य्ोग, माहिती तंत्रज्ञान, आरोग्य निगा व सरकारी बँकांना प्राथमिकता दिली आहे. एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक इन्फोसिस बजाज फिन्सव्‍‌र्ह व अभावाने पहिल्या पाचांत स्थान असलेली देना बँक हे सर्वाधिक गुंतवणूक असलेले पहिले पाच समभाग आहेत. फंडाच्या मागील सहा महिन्यांच्या गुंतवणुकीचा अभ्यास केला असता, फंडाच्या गुंतवणुकीत सरासरी ४५ समभाग असून पहिल्या ५ समभागांचा हिस्सा एकूण गुंतवणुकीच्या सरासरी ३०% पहिल्या १० गुंतवणुकांचा हिस्सा सरासरी ४५% असल्याचे आढळते. फंडाच्या गुंतवणुकीत मागील महिन्यात टाटा स्टील, गेल व आयसीआयसीआय लाइफ इन्शुरन्स या कंपन्यांचा नव्याने समावेश झाला. तर युनायटेड स्पिरिट्स व पंजाब नॅशनल बँक यांना वगळण्यात आले. फंडाच्या गुंतवणुकीत एकूण गुंतवणुकीत ९२% समभाग लार्ज कॅप प्रकारचे तर २.१५% समभाग मिड कॅप प्रकारचे आहेत. ३० सप्टेंबर २०१६ रोजी फंडाची एकूण मालमत्ता ११६८३ कोटी आहे. सीएनएक्स निफ्टी हा या फंडाचा संदर्भ निर्देशांक आहे.

arth05

फंडाच्या पाच वर्षांच्या परताव्याची चलत सरसरीच्या तुलनेत हा फंड मागील पाच वर्षांच्या प्रत्येक तिमाहीत लार्ज कॅप फंड गटात पहिल्या पाच क्रमांकात आहे. तीन वर्षे या कालावधीतील फंडाचा अल्फा उणे ३% ते ७% या दरम्यान तर पाच वर्षे या कालावधीतील फंडाचा अल्फा २ % ते ५% यादरम्यान राहिलेला आहे. फंडाने फंडाच्या सुरुवातीपासून १६ ऑक्टोबर २०१६ पर्यंत ४.६७% ‘अल्फा’ गुंतवणूकदारांना दिला आहे. या फंडाची एका वर्षांच्या चलत सरासरीच्या तुलनेत कामगिरी मुळीच भुरळ पाडणारी नाही. समभाग गुंतवणूक दीर्घकालीन असल्याने या मुद्दय़ाचा विचार गुंतवणूकदरांनी आपल्या सल्लागाराच्या मदतीने करावयाचा आहे.

arth03

१८ ऑक्टोबर रोजीचे निफ्टीचे मूल्यांकन (पी/ई) २३ तर मिड कॅप निफ्टी १५० चे मूल्यांकन ४२ व निफ्टी मिड कॅप ५० चे मूल्यांकन ३८ आहे. परंपरेने निफ्टीचे मूल्यांकन निफ्टी मिड कॅपपेक्षा कमी असायला हवे. मिड कॅप व लार्ज कॅप मूल्यांकनातील तफावत पाहता धाडसी गुंतवणूक करण्याचे सध्याचे दिवस नाहीत. नजीकच्या काळात होऊ  घातलेली अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक व ‘फेड’कडून संभाव्य व्याजदर वाढीची शक्यता लक्षात घेता बाजार नजीकच्या काळात माघारी फिरण्याची शक्यता नाकारता येत नाही. या परिस्थितीत आयसीआयसीआय प्रुडेन्शियल फोकस्ड ब्लूचीप फंडात केलेली ‘सिप’ भांडवली वृद्धीच्या बरोबरीने गुंतवणुकीला स्थैर्य देईल असे मानण्यास नक्कीच वाव आहे.

(अस्वीकृती: या स्तंभात वापरलेली माहिती व आकडेवारी ही उपलब्ध माहिती स्रोतांपासून घेतली आहे. या लेखाचा उद्देश या योजनेची वाचकांना ओळख व्हावी इतपतच मर्यादित आहे. वाचकांनी गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे अभिप्रेत आहे.)

वसंत माधव कुलकर्णी shreeyachebaba@gmail.com