आयडीएफसी बॅलन्स्ड फंड
सेवानिवृत्तीनंतरच्या उदरनिर्वाहासाठी निधी जमविण्यास बॅलन्स्ड फंड हा उपयुक्त पर्याय आहे या विषयावर या स्तंभातून ३० मे व ६ जून रोजी दोन लेख प्रसिद्ध झाले होते. अनुक्रमे बिर्ला सनलाइफ बॅलन्स्ड ९५ फंड व टाटा बॅलन्स्ड फंड या फंडाच्या विश्लेषणाच्या निमित्ताने प्रसिद्ध झालेल्या या दोन लेखांवर आलेल्या ईमेलमधून काही वाचकांनी कमी एनएएव्ही असलेले चांगले बॅलन्स्ड फंड कोणते, असा प्रश्न विचारला होता. मागील सोमवारी गुंतवणुकीसाठी खुल्या झालेल्या व सोमवार २६ डिसेंबपर्यंत खुल्या असलेल्या आयडीएफसी बॅलन्स्ड फंडाच्या खुल्या विक्रीच्या निमित्ताने गुंतवणूकदारांना एक चांगला बॅलन्स्ड फंड १० रुपये एनएव्ही असताना गुंतवणुकीसाठी उपलब्ध खुला झाला आहे.
मागील एका वर्षांत गुंतवणूकदारांनी २५ हजार कोटी बॅलन्स्ड फंडांत गुंतवून बॅलन्स्ड फंडावर आपल्या पसंतीची मोहोर उमटविली आहे. विकसित आर्थिक बाजारपेठांत बॅलन्स्ड फंड ५० टक्के समभाग व ५० टक्के रोखे अशी गुंतवणूक करतात. परंतु आयकर कायदा १९६१ नुसार एखाद्या बॅलन्स्ड फंडांचा दीर्घकालीन भांडवली नफा करमुक्त असण्यासाठी त्या बॅलन्स्ड फंडांत समभाग गुंतवणूक ६५ टक्के असणे गरजेचे असते. या कारणामुळे भारतातील समभाग केंद्रित बॅलन्स्ड फंड समभाग गुंतवणूक ६५ टक्क्यांपेक्षा कमी ठेवत नाहीत. हा बॅलन्स्ड फंड ६५ टक्क्याची किमान मर्यादा राखण्यासाठी ६० टक्के समभाग ३५ टक्के रोखे व ५ टक्के समभाग डेरिव्हेटिव्ह अशी गुंतवणूक रचना ठेवणार आहे. यामुळे गुंतवणूकदारांना मालमत्ता प्रकारात वैविध्य मिळविता येणार आहे. आयडीएफसी ही भारतातील एक मान्यवर अर्थसंस्था आहे. रिझव्र्ह बँकेने ज्या दोन संस्थांना बँक सुरू करण्याचा परवाना दिला त्यापैकी आयडीएफसी ही एक संस्था आहे. याच अर्थसंस्थेचा मालमत्ता व्यवस्थापन व्यवसाय आयडीएफसी म्युच्युअल फंडामार्फत चालतो. हे फंड घराणे म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांना परिचित फंड घराणे असून या फंड घराण्याचा आयडीएफसी प्रीमियर इक्विटी हा फंड जाणत्या गुंतवणूकदारांच्या गुंतवणुकीचा भाग असतो. आयडीएफसी या फंड घराण्याकडे चांगले अनुभवी निधी व्यवस्थापक असून यापैकी अनुप भास्कर हे समभाग गुंतवणूक तर सुयश चौधरी हे रोखे गुंतवणूक पाहणार आहेत.
अनुप भास्कर यांना २५ वर्षांचा गुंतवणूक व्यवस्थापनाचा अनुभव असून या आधी त्यांनी कोठारी पायोनीयर, सुंदरम व यूटीआय या म्युच्युअल फंडातून निधी व्यवस्थापक म्हणून जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. या फंडातील स्थिर उत्पन्न गुंतवणुकीची जबाबदारी पार पडणारे सुयश चौधरी हे या आधी एचएसबीसी व स्टॅण्डर्ड चार्टर्ड म्युच्युअल फंड या फंड घराण्यात कार्यरत होते. या फंडाची समभाग गुंतवणूक आयडीएफसी क्लासिक या लार्ज कॅप केंद्रित फंडाप्रमाणे राहणार आहे. समभाग गुंतवणुकीपैकी ७० टक्के गुंतवणूक लार्ज कॅप व उर्वरित मिड कॅप समभागांत असेल. रोखे गुंतवणूक सक्रिय पद्धतीने गुंतवणूक केले जाईल. अर्थव्यवस्थेत व्याजाचे दर रोकड सुलभता, यांच्यातील बदलांचा विचार करून वेगाने योग्य ते बदल केले जातील. क्रिसिल बॅलन्स्ड फंड इंडेक्स हा या फंडाचा संदर्भ निर्देशांक आहे. २६ डिसेंबपर्यंत गुंतविलेल्या रकमेपैकी १० टक्के रक्कम निर्गमन शुल्क दिल्याशिवाय काढता येईल.
बॅलन्स्ड फंड गटात अन्य पर्याय असताना या फंडाची शिफारस करण्याची कारणे पुढीलप्रमाणे आहेत. ज्यांची जोखीम सहन करण्याची क्षमता कमी आहे अशा गुंतवणूकदारांसाठी बॅलन्स्ड फंड हा आदर्श गुंतवणूक प्रकार आहे. हा फंड आपली समभाग गुंतवणूक ६०+५ टक्के इतपतच सीमित ठेवणार आहे. अन्य फंड समभाग गुंतवणुकीचे प्रमाण ८०-९० टक्क्यांपर्यंतसुद्धा ठेवतात. यामुळे फंडाच्या परताव्याचा दर वाढला तरी जोखीमसुद्धा अधिक असते. ही जोखीम सीमित ठेवणारा हा फंड असेल. अनेक गुंतवणूकदारांचा असा आक्षेप असतो की, मोठी एनएव्ही असलेला फंड खरेदी केल्याने कमी युनिट्स जमा होतात. हा आक्षेप खरा नव्हे कारण ‘एसडब्ल्यूपी’च्या माध्यमातून ही युनिट्स विकतात तेव्हा कमी युनिट्स विकावी लागतात. जे तरुण व कमी जोखीम स्वीकारणारे गुंतवणूकदार आहेत त्यांनी निवृत्तीपश्चातच्या निधी संकलानासाठी या फंडाचा जरूर विचार करावा.
सेवानिवृत्तीपश्चात रोजच्या खर्चाची तजवीज करण्यासाठी दरमहा नियमित रक्कम काढण्यासाठी सिस्टेमॅटिक विथड्रॉवल प्लान (एसडब्लूपी) हा कर कार्यक्षम नियमित उत्पन्न मिळविण्याचा आदर्श पर्याय आहे. परंतु आक्रमक विपणन तंत्रामुळे व गुंतवणूकदारांच्या अर्थनिरक्षरतेमुळे अनेक सेवानिवृत्तांनी मासिक लाभांश देणाऱ्या बॅलन्स्ड फंडात गुंतवणूक केली आहे.
आयसीआयसीआय प्रुडेन्शियल बॅलन्स्ड अॅडव्हान्टेज फंडाने मासिक लाभांश जाहीर करण्यास सुरुवात केल्यापासून या फंडाची एकूण मालमत्ता ऑक्टोबरअखेर १६,२५२ कोटी रुपयांवर गेली असून, देशातील तो सर्वात मोठा समभागसंलग्न (इक्विटी) म्युच्युअल फंड बनला आहे. या फंडाने मासिक लाभांश सुरू करताना जे सादरीकरण विक्रेत्यांना पाठविले, त्या सादरीकरणात २०१० ते २०१५ दरम्यान एकही महिन्यात लाभांश चुकल्याची नोंद नाही. प्रत्यक्षात जून २०१३, ऑगस्ट २०१३, फेब्रुवारी २०१६ व मार्च २०१५ या महिन्यात या फंडास लाभांश जाहीर करता आला नाही, तर जून २०१६ मध्ये तीन वेळा लाभांश जाहीर केला.
मासिक उत्पन्न म्हणून महिन्यातून एकदा लाभांश जाहीर करणे अपेक्षित असते. परंतु या फंडाने लाभांशात सातत्य राखले नाही. यासाठी लाभांशापेक्षा एसडब्लूपी हा पर्याय उजवा ठरतो.
वसंत माधव कुलकर्णी shreeyachebaba@gmail.com
(अस्वीकृती: या स्तंभात वापरलेली माहिती व आकडेवारी ही उपलब्ध माहिती स्रोतांपासून घेतली आहे. या लेखाचा उद्देश या योजनेची वाचकांना ओळख व्हावी इतपतच मर्यादित आहे. वाचकांनी गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे अभिप्रेत आहे.)