नुकताच १५ सप्टेंबर म्हणजे अग्रिम कर भरण्याचा पहिल्या हप्त्याचा अंतिम दिवस येऊन गेला आणि आपल्या लक्षात आले असेल की, कमाईतील चांगलाच हिस्सा कर भरण्यातच गेला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

जेव्हा आपण गुंतवणूक करायचे ठरवतो तेव्हा आपल्यापैकी बहुतेक जणांची सुरुवात आणि शेवट बँकेतील ठेवींपासूनच होते. जसजसे आपल्याकडे पैसे जमा होतात ते लगेच आपण बँक ठेवींमध्ये ठेवतो. कारण आपल्याला तेच सोपे वाटते. बँकेत जायचे आणि एफडी रीसिट बनवायची. आता तर इंटरनेट बँकिंगमुळे हे आणखीन सोपे झाले आहे. फक्त की-बोर्डवर बटने दाबण्याची खोटी एफडी लगेच बनतेही!

बँकेतील मुदत ठेवींवरचा परतावा निश्चित आणि खात्रीशीर असतो. रिझव्‍‌र्ह बँक जी बँकेच्या व्यवहारांवर लक्ष ठेवते ती बँक बुडून देणार नाही, यावर आपला ठाम विश्वास असतो आणि जर काही झालेच तर सरकार बँकेला मदत देईल आणि आपले पैसे बुडणार नाहीत. म्हणून बहुतांशी लोक बँक एफडी सोडून विचारच करत नाहीत.

पण जसजसे आपले उत्पन्न वाढत जाते आणि बँक एफडीचा परतावा मुळातच कमी आणि त्यावरही कर (टीडीएस) कापून जातो. म्हणजे हाती जेमतेमच लागते. तेव्हा मग आपण विचार करायला लागतो की, असा काही पर्याय आहे का की ज्यामध्ये गुंतवणूक केल्याने माझा कर वाचेल आणि माझी एकंदर गुंतवणूकही वाढेल?

‘म्हणजेच मी काय केले म्हणजे माझी गुंतवणूक कर कार्यक्षम होईल?’ हा प्रत्येकाने लक्षात घ्यावयाचा लाखमोलाचा प्रश्न आहे.

तर मग बघू या की कर कार्यक्षम गुंतवणूक कशी करायची :

आपल्यापुढे असणाऱ्या गुंतवणूक पर्यायांचा विचार करताना, पहिले प्राधान्य हे अर्थात अशा पर्यायांना दिले पाहिजे जे कर भरल्यानंतर आपल्या हातात चांगला परतावा देतील.

उदाहरणार्थ : जर आपण जर आपण असा पर्याय निवडला की ज्याचा परतावा ८ टक्के आहे आणि जो संपूर्ण करपात्र आहे (जसे, बँक एफडी) आणि जर तुम्ही वरच्या कर दराच्या टप्प्यात (स्लॅबमध्ये) असाल तर त्यावर ३० टक्के कर + अधिभार + शैक्षणिक उपकर मिळून तुम्हाला त्या परताव्यातील जवळ जवळ २.७२ टक्के हे कर म्हणूनच द्यावे लागतील. म्हणजे तुमच्या हातात फक्त ५.२८ टक्के परतावा उरेल. पण मग जर आपल्याला असा काही पर्याय शोधता आला ज्याचा परतावा कर पात्र नाही आणि जो ५.२८ टक्क्यांपेक्षा जास्त आहे तर नक्कीच आपले एकूण उत्पन्न वाढू शकेल.

मग असे गुंतवणूक पर्याय उपलब्ध आहेत का? तर नक्कीच आहेत.

असे पर्याय म्युच्युअल फंडांकडे उपलब्ध आहेत. जिथे आपल्याला चांगला परतावा तर मिळेलच, पण करदेखील कमी अथवा काहीच द्यावा लागणार नाही. असे या पर्यायाचे दुहेरी फायदे आहेत.

यावरून आपल्या लक्षात येईल की, असे किती तरी पर्याय आहेत की ज्याचा उपयोग करून आपण आपला कर वाचवू शकतो आणि आपले उत्पन्न वाढवू शकतो. म्हणजेच इंग्रजीमध्ये म्हणतात त्याप्रमाणे- ” you can have a cake and eat it too.”

पण हेही लक्षात ठेवणे गरजेचे आहे की, असे पर्याय निवडताना आपल्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे मात्र आवश्यक आहे.

इक्विटी फंड :

हे फंड शेअर बाजारात म्हणजेच कंपन्यांच्या समभागांत गुंतवणूक करतात. या फंडातील गुंतवणूकदारांना परतावा म्हणून लाभांश मिळतो किंवा ते लाभांश न घेता वाढीचा पर्याय निवडू शकतात. जर लाभांश घेतला तर त्यावर काहीच कर द्यावा लागत नाही. जर वाढीचा पर्याय निवडला आणि तुम्ही एक वर्षांपेक्षा जास्त वेळ गुंतवणूक ठेवलीत तर तुम्हाला काहीच कर द्यावा लागत नाही. पण जर एक वर्षांपेक्षा कमी वेळ ठेवलीत तर १५ टक्के कर भरावा लागतो.

ईएलएसएस फंड :

समभागसंलग्न बचत योजना (इक्विटी लिंक्ड सेव्हिंग्ज स्कीम्स- ईएलएसएस) हेदेखील समभागांत गुंतवणूक करणारे (इक्विटी) म्युच्युअल फंड आहेत. ज्यामध्ये गुंतवणूक केल्यास ‘कलम ८० सी’द्वारे १.५० लाखापर्यंतच्या गुंतवणुकीवर कर वजावट मिळविता येते. म्हणजे इतकी रक्कम तुमच्या करपात्र उत्पन्नातून कमी करता येते. परंतु हा फायदा घेण्यासाठी गुंतवणूकदाराला किमान तीन वर्षे ही गुंतवणूक ठेवणे आवश्यक आहे (यासारखे इतर पर्याय म्हणजे पीपीएफ, एनएससी, पाच वर्षे मुदतीच्या बँक ठेवी, यामध्ये अर्थात तीन वर्षांपेक्षा जास्त काळ गुंतवणूक ठेवावी लागते).

डेट फंड :

हे असे म्युच्युअल फंड आहेत जे स्थिर परतावा देणाऱ्या पर्यायांमध्ये गुंतवणूक करतात. यांना डेट अथवा रोखे म्युच्युअल फंड असे म्हणतात. यामध्ये गुंतवणूक केल्यास आपल्याला १२.५ टक्के कर द्यावा लागतो. पण जर गुंतवणूक दीर्घकालीन असेल तर इंडेक्सेशन लाभासहित केवळ फायद्याच्या रकमेवर २० टक्के कर द्यावा लागतो. इंडेक्सेशनमुळे म्युच्युअल फंडातील गुंतवणूक खर्च (कॉस्ट) वाढतो, मात्र कमी कर द्यावा लागतो.

लिक्विड फंड :

हे मनी मार्केट पर्याय, शॉर्ट टर्म ट्रेझरी डिपॉझिट इत्यादीमध्ये गुंतवणूक करतात व त्यामधून मिळणारा परतावा हा बँकेतील बचत खात्यामधून मिळणाऱ्या परताव्यापेक्षा जास्त असतो.

cashevade.swati@gmail.com

(लेखिका सनदी लेखपाल असून त्या पोर्टफोलिओ मॅनेजर म्हणूनही कार्यरत होत्या.)

म्युच्युअल फंडामुळे कर बचत कशी होते