वारकरी संप्रदायात आजच्या दिवसाला, आषाढी एकादशीला अनन्यसाधारण महत्त्व असते. आजच्या दिवसाकरता पालख्यांबरोबर शेकडो मल पायी प्रवास करीत, मध्ये मुक्कामात रिंगण सोहळा करीत आजच्या दिवसात प्रथम कळस दर्शन आणि नंतर साक्षात विठूमाऊलीचे दर्शन घेऊन धन्य व्हायचे असा आषाढीचा कार्यक्रम असतो. असेच काहीसे आपल्या बाजाराचे आहे. मार्चपासून निफ्टीने २०० गुणांचे रिंगण करीत – ९,९५० + २०० = १०,१५० + २०० = १०,३५० + २०० = १०,५५० + २०० = १०,७५० + २०० = १०,९५० + २०० = ११,१५० आणि आता ११,१५० + २०० = ११,३५०च्या कळस दर्शनासाठी बाजार सज्ज होत आहे. या पाश्र्वभूमीवर आजच्या आठवडय़ाच्या वाटचालीकडे वळू या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

शुक्रवारचा बंद भाव –

*  सेन्सेक्स  : ३६,४९६.३७
*  निफ्टी     :       ११,०१०.२०

गेल्या लेखात नमूद केल्याप्रमाणे निफ्टीवर ११,०८०चा अवघड टप्पा ठरत आहे. तिथून बरोबर १५० गुणांची घसरण देत (एअरोबिक्सचा १५० गुणांची लयबद्ध हालचाल) निफ्टीने बरोबर १०,९२६चा आधार घेतला. या आठवडय़ात निर्देशांकावर ३६,२६० / १०,९२५ आणि त्या नंतर ३५,८०० / १०,८०० चा भरभक्कम आधार आहे. या स्तरावर बाजाराची पायाभरणी होऊन निर्देशांक प्रथम ३६,८०० / ११,१५० आणि त्यानंतर ३७,००० / ११,२५० ते ११,३५०चे कळस दर्शन होईल.

सोन्याचा किंमत-वेध

गेल्या महिन्याभरापासून सोन्याचे आलेख मंदी दर्शवत होते.  त्यासाठी ३०,५०० रुपये ही ‘महत्त्वाची कल निर्धारण पातळी’ म्हणून उल्लेख केलेला आणि या स्तरावरच शाश्वत तेजी सुरू होईल; अन्यथा ३०,००० रुपयांच्या स्तराखाली सोने २९,७०० पर्यंत खाली घसरू शकते, याचा प्रत्यय सोन्याने गेल्या बुधवारी २९,६३८ चा नीचांक मारून दिला. २९,७०० रुपयांच्या स्तराखाली सोने २९,४०० पर्यंत खाली घसरू शकते. ही पडझड थांबण्यासाठी सोने सातत्याने ३०,००० रुपयांच्या वर टिकणे नितांत गरजेचे आहे. तरच ३०,३०० ते ३०,५०० रुपयांचा स्तर दृष्टिपथात येईल.  (सोन्याचे भाव ‘एमसीक्स’ वरील व्यवहारावर आधारित)

लक्षणीय समभाग : एचडीएफसी स्टँडर्ड लाइफ कंपनी लिमिटेड

(बीएसई कोड – ५४०७७७)

शुक्रवारचा बंद भाव – रु. ४८९.६०

गृहकर्ज क्षेत्रातील अग्रगण्य एचडीएफसी लिमिटेडने प्रवर्तित केलेली विमा क्षेत्रातील एचडीएफसी स्टँडर्ड लाईफ ही आघाडीची कंपनी होय. या समभागाचा सामान्य मार्गक्रमण पट्टा (बॅण्ड) हा ४५० ते ४८० रुपये आहे. समभागाची किंमत सातत्याने ४८० रुपयांच्या वर टिकल्यास (शुक्रवारचा बंद भाव या स्तरावरच आहे, पण या आठवडय़ात समभागाचा भाव सातत्याने ४८०च्या वर टिकणे नितांत गरजेचे आहे.) तरच शाश्वत तेजी सुरू होऊन अत्यल्प मुदतीचे उद्दिष्ट हे ५१० ते ५४० रुपये असेल आणि दीर्घ मुदतीचे उद्दिष्ट ६०० रुपये असेल. गुंतवणूकयोग्य रकमेला २५ टक्क्य़ांच्या चार तुकडय़ांत विभागून प्रत्येक घसरणीत हा समभाग घेण्याचा विचार करावा. या दीर्घ मुदतीच्या गुंतवणुकीला ४१५ रु. ‘स्टॉप लॉस’ ठेवावा.

अस्वीकृती :  शेअर बाजारातील व्यवहार हे बाजारातील जोखमीच्या अधीन आहेत. अंदाज चुकल्यास मुद्दल गमावण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी ‘स्टॉप लॉस’ आणि इच्छित उद्दिष्ट या संकल्पनाचे पालन करणे आवश्यक आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

ashishthakur1966@gmail.com