एल अ‍ॅण्ड टी इमर्जिग बिझनेसेस फंड
भारतीय लोकसंख्येचे सरासरी वय २७ वर्षे आहे व भारताचे ३८ टक्के शहरीकरण झाले आहे. वाढत्या तरुण लोकसंख्येला सामावून घेण्यासाठी वेगाने शहरीकरण होत आहे. भारताचा २०१० ते २०१५ या कालावधीत शहरीकरणाचा वेग २.४७ टक्के होता. स्वातंत्र्यानंतर जन्मलेल्या तरुण लोकसंख्येमुळे न कमावत्या व्यक्तींचे प्रमाण घटण्याची किमया गेल्या शतकात घडली. हा फंड वाढत्या तरुण लोकसंख्येच्या लाभार्थी कंपन्यांतून गुंतवणूक करणारा फंड आहे. जगातील कमावत्या वयातील दुसऱ्या क्रमांकाची लोकसंख्या असलेल्या आपल्या देशाच्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आजची शिफारस..
भारताला स्वातंत्र्य मिळून आज ७० वर्षे पूर्ण झाली. जगातील सर्वात मोठी लोकशाही हे बिरुद मिरवत आज आपण ७१वा स्वातंत्र्य दिन साजरा करीत आहोत. ‘गोविंदाग्रज’ (राम गणेश गडकरी) आज जर अवतरले तर आजच्या मंगलदिवशी या देशाला त्यांनी ‘राकट देशा कणखर देशा’च्या जोडीला ‘तरुणांच्या देशा’ असे संबोधले असते. २०१४च्या शासकीय आकडेवारीनुसार, एकूण लोकसंख्येच्या ५९ टक्के लोकसंख्या ही शून्य ते २४ या वयातील आहे. एकूण लोकसंख्येच्या शून्य ते १४ वर्षे वयाच्या आणि ६५ वर्षांहून अधिक वयाच्या लोकसंख्येच्या बेरजेचे एकूण लोकसंख्येशी असलेल्या प्रमाणास लोकसंख्याशास्त्रात ‘Dependency Ratio’ असे संबोधले जाते. या दोन गटांतील लोकसंख्या अर्थार्जनक्षम नसल्याने व त्यामुळे अन्य कोणाच्या तरी कमाईवर (किंवा स्वत:च्या बचतीवर) अवलंबून असल्याने ‘Dependant Population’ अशी संज्ञा तिच्यासाठी वापरली जाते.
arth06
भारतातील कमावत्या लोकसंख्येचे एकूण लोकसंख्येशी असलेले हे प्रमाण २०१४ साली ५८.८ टक्के होते. जगातील अन्य देशांच्या तुलनेत हे प्रमाण सर्वाधिक असल्याचे जागतिक बँकेच्या Population and Vital Statistics Report या अहवालाने नमूद केले आहे. गमतीचा भाग असा की, १९६० साली हे प्रमाण ७२ टक्के होते. २०१४ मध्ये हे प्रमाण ५८ टक्क्यावर आले. स्वातंत्र्यानंतर जन्मलेल्या तरुण लोकसंख्येमुळे न कमावत्या व्यक्तींचे प्रमाण घटण्याची किमया गेल्या शतकात केवळ भारत, चीन व ऑस्ट्रिया या तीन देशांत घडली व त्यापैकी लोकसंख्येच्या ढाच्यात २००० नंतर सर्वात सकारात्मक बदल घडलेला भारत हा एकमेव देश आहे.
arth08
चीननंतरचा जगातील दुसऱ्या क्रमांकाची लोकसंख्या असलेला व एकूण लोकसंख्येच्या कमावत्या व्यक्तींचे सर्वाधिक प्रमाण असलेला आपला देश १५ ऑगस्ट २०४७ला स्वातंत्र्याचे सवंत्सर साजरे करेल. त्या वेळी आपल्या लोकसंख्येच्या रचनेमुळे आजचे लार्ज कॅप मेगा कॅप झालेले दिसतील. आजच्या मिड कॅप कंपन्या या लार्ज कॅप व आजच्या स्मॉल कॅप या २०४७ मध्ये मिड कॅप झालेल्या असतील. म्हणूनच तरुणाच्या देशातील बाल्यावस्थेतील व तरुण कंपन्यांत अर्थात मिड व स्मॉलकॅप कंपन्यात गुंतवणूक करणाऱ्या एलअ‍ॅण्डटी इमर्जिग बिझनेसेस फंडाची ही आजची शिफारस.
arth09
भारतीय लोकसंख्येचे सरासरी वय २७ वर्षे आहे. आजची ही तरुण मंडळी पुढील तीस वर्षे कमावती राहणार असल्याने त्यांच्या पैसे कमावण्याच्या व खर्च करण्याच्या क्षमतेमुळे भारतीय अर्थव्यवस्थेला गती मिळणार आहे. आज भारताचे ३८ टक्के शहरीकरण झाले आहे. भारतातील सर्वाधिक शहरीकरण झालेल्या राज्यांत महाराष्ट्राचा वरचा क्रमांक लागतो. महाराष्ट्राचे जागतिक बँकेच्या निकषानुसार ४८ टक्के शहरीकरण झाले आहे. भारताचा २०१० ते २०१५ या कालावधीत शहरीकरणाचा वेग २.४७ टक्के होता. या व अशा संधीच्या लाभार्थी असणाऱ्या कंपन्यांच्या समभागात गुंतवणूक करणारा हा फंड आहे. सरकारचे २०२२ पर्यंत सर्वाना पक्के परवडणारे घर घेण्याची योजना आहे. ही तरुण मंडळी घर घेतील. ही घरे घेण्यासाठी कर्ज देणाऱ्या स्टेट बँक ऑफ बिकानेर अ‍ॅण्ड जयपूर, डीसीबी बँक, इंडियन बँक या बँका व रेप्को होम फायनान्स ही तरुण मंडळी वाहन खरेदी करतात. वाहन उत्पादकांची शिखर संघटना असलेल्या ‘सियाम’च्या आकडेवारीनुसार या वर्षीच्या जुलै महिन्यात मागील वर्षीच्या जुलै महिन्याच्या तुलनेत विक्री झालेल्या वाहनांच्या संख्येत १६.७८ टक्के वाढ झाली असून मागील ओळीने १३ महिन्यांत विक्रीचे आकडे वाढत आहेत. या वाढत्या विक्रीचे लाभार्थी असणारे वॅबको व टीव्हीएस श्रीचक्र या कंपन्यांचा समावेश निधी व्यवस्थापकांनी गुंतवणुकीत केला आहे. या सारख्याच भारताच्या तरुण वयाच्या लोकसंख्येच्या लाभार्थी असणाऱ्या अनेक कंपन्यांचा समावेश निधी व्यवस्थापकांनी फंडाच्या गुंतवणुकीत केला आहे.
arth07
या फंडाची पहिली एनएव्ही १२ मे २०१४ रोजी जाहीर झाली. सौमेंद्रनाथ लाहिरी हे या फंडाचे निधी व्यवस्थापक आहेत. लाहिरी हे एलअ‍ॅण्डटी अ‍ॅसेट मॅनेजमेंट कंपनीचे मुख्य गुंतवणूक अधिकारी (समभाग) आहेत. एलअ‍ॅण्डटी अ‍ॅसेट मॅनेजमेंट कंपनीत दाखल होण्याआधी त्यांनी कॅनरा रोबेको म्युच्युअल फंड, डीएसपी ब्लॅकरॉक म्युच्युअल फंड, दौलत कॅपिटल इत्यादी ठिकाणी समभाग गुंतवणूकविषयक जबाबदाऱ्या पार पडल्या आहेत. अभियांत्रिकी पदवीधर असलेल्या लाहिरी यांनी आयआयएम बंगळुरू या संस्थेतून पदव्युत्तर पदविका प्राप्त केली आहे. त्यांना २० वर्षांचा समभाग गुंतवणुकीचा अनुभव आहे. म्युच्युअल फंड वर्तुळात एक बुद्धिमान परंतु पाय कायम जमिनीवर असणारे गुंतवणूक अधिकारी अशी त्यांची ओळख आहे.
arth05
आजच्या फंडाला तीन वर्षांहून अधिक कालावधीची पाश्र्वभूमी नसल्याने ‘मॉर्निग स्टार’ अथवा ‘व्हॅल्यू रिसर्च’ यांनी या फंडाला तारांकित दर्जा (रेटिंग) दिलेला नाही. पात्रताधारक आर्थिक नियोजनकार अथवा सेबीद्वारा नोंदणीकृत गुंतवणूक सल्लागारांच्या मते इतिहास नसलेल्या फंडात गुंतवणूक करणे हे गोहत्या करण्याइतके पाप आहे. नवीन शिकण्याची क्षमता गमावलेले ‘सेबी’द्वारा नोंदणीकृत गुंतवणूक सल्लागार मोजक्या फंडांच्या गुंत्यातून अद्याप बाहेर पडत नाहीत. इतिहासात डोकावून पाहिले तर ज्यांना इतिहास नाही त्यांनीच इतिहास घडविला आहे. याचे उत्तम उदाहरण म्हणजे पहिल्यांदाच लोकसभा निवडणूक लढवून पक्षाला सत्ता प्राप्त करून देणारे आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी. २००४च्या अ‍ॅथेन्स ऑलिम्पिकमध्ये मायकेल फेल्प्सला सुद्धा इतिहास नव्हता. आताच आलेल्या ताज्या बातमीनुसार जोसेफ स्कूलिंगने तब्बल २२ सुवर्णपदकांचा वेध घेणाऱ्या मायकेल फेल्प्सला १०० मीटर्स बटरफ्लाय या स्पर्धेत हरविले. आजचा अव्वल मायक्रो कॅप फंड असलेल्या डीएसपी ब्लकरॉक मायक्रो कॅप फंडाला सुद्धा २०१२ पूर्वी इतिहास नव्हता, ही वस्तुस्थिती दृष्टीआड करून चालणार नाही. नवीन फंडाची गुंतवणुकीसाठी शिफारस करण्यापूर्वी त्या फंडाविषयी स्वत:ला शिक्षित करून घेणे आवश्यक असते. वयपरत्वे बुद्धीला आलेल्या जडत्वामुळे नवीन शिकण्याची क्षमता गमावून बसलेले जठर बुद्धीचे आर्थिक नियोजनकार मोजक्या फंडाच्या पलीकडे जात नाहीत. प्रत्येक गुंतवणूकदाराला आपली गुंतवणूक वेगाने वाढावी अशी अपेक्षा असते. त्यासाठी प्रतीक्षा असते ती ‘मल्टिबॅगर’ची. ही अपेक्षा हा फंड नक्कीच पुरी करेल. जोखीम स्वीकारून परताव्याची अपेक्षा बाळगणाऱ्या गुंतवणूकदारांनी आपल्या जोखीमेनुसार योग्य प्रमाणात या फंडाचा समावेश दीर्घकाळ ‘एसआयपी’ (सिप)च्या माध्यमातून केल्यास हा फंड परताव्याचे भरघोस माप गुंतवणूकदारांच्या पदरात टाकेल अशी अपेक्षा ठेवून पत निश्चित नसलेल्या फंडाची शिफारस केली.
वसंत माधव कुलकर्णी – shreeyachebaba@gmail.com
(अस्वीकृती: लेखात वापरलेली माहिती व आकडेवारी ही उपलब्ध माहिती स्रोतांपासून घेतली आहे. या लेखाचा उद्देश या योजनेची वाचकांना ओळख व्हावी इतपतच मर्यादित आहे. वाचकांनी गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे अभिप्रेत आहे.)

loksatta editorial no interest rate cut by rbi retail inflation surges in october
अग्रलेख : म्हाताऱ्या शब्दांचा आरसा…
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
public banks profit increase by 26 percent in first half fy 25
सरकारी बँकांच्या नफ्यात सहामाहीत २६ टक्के वाढ
young adults prefer to invest in stocks directly rather than mfs report by fin one
म्युच्युअल फंडापेक्षा तरुणाईचा कल थेट समभागांत गुंतवणुकीकडे; ९३ टक्के कमावत्या तरुणांत मासिक बचतीची सवय
ageing population increasing in india
वृध्दांच्या लोकसंख्येचा दर वाढता, काय आहेत आव्हानं?
rbi digital awareness loksatta
जनजागृतीवर ५९ कोटींचा खर्च, तरीही सर्वसामान्यांच्या २,८८० कोटींवर डल्ला…बँकेत तुमचे पैसे…
Chief Minister of Telangana, Himachal and Deputy Chief Minister of Karnataka reply to BJP on the scheme Print politics
गरिबांचे पैसे गरिबांना ही काँग्रेसची हमी; तेलंगणा, हिमाचलचे मुख्यमंत्री तर कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांचे भाजपला प्रत्युत्तर
Redevelopment is essential for safety middle class citizen Lands freehold
सुरक्षिततेसाठी पुनर्विकास अपरिहार्य