arth04मे आणि जून हे महिने गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाचे असतात कारण याच वेळी सर्व कंपन्या आपले संपूर्ण वर्षांचे आर्थिक निष्कर्ष जाहीर करीत असतात. कंपन्यांच्या वार्षिक अहवालांची तयारी याच काळात सुरू असते. हे आर्थिक निष्कर्ष व्यवस्थित अभ्यासायचे असतील तर त्या कंपनीच्या वेबस्थळावर जाऊन तो निकाल बारकाईने पाहावा लागतो. कारण आता बहुतांशी कंपन्या नवीन कंपनी कायद्याच्या तरतुदींनुसार आपला आर्थिक निष्कर्ष संक्षिप्त स्वरूपात सादर करतात.
आज विचारात घेतलेली मोदीसन मेटल्स ही स्विचगीअरसाठी इलेक्ट्रिकल कॉन्टॅक्टचे उत्पादन करणारी ५० वर्षे जुनी आघाडीची कंपनी आहे. कंपनीचे आर्थिक निष्कर्ष नुकतेच जाहीर झाले आहेत आणि ते अपेक्षेनुसार उत्तम आहेत. कंपनीने गेल्या आर्थिक वर्षांकरिता १६७.३३ कोटी रुपयांच्या उलाढालीवर १०.८८ कोटी रुपयांचा नक्त नफा कमावला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत तो १३८ टक्क्य़ांनी जास्त आहे. वापी आणि सिल्वासा येथे उत्पादन प्रकल्प असलेल्या मोदीसन मेटल्सने सुरुवातीला म्हणजे १९८३ ते १९९६ पर्यंत डोडूको या जर्मन कंपनीच्या तांत्रिक सहकार्याने उत्पादन केले आणि आयातीला पर्याय दिला. आजही आपल्या गुणवत्तेच्या जोरावर कंपनीकडे भारतातील बाजारपेठेत जवळपास ८०% पुरवठय़ाचा हिस्सा असून जवळपास सर्व बहुराष्ट्रीय आणि मोठय़ा भारतीय कंपन्या मोदीसनच्या ग्राहक आहेत. एल अँड टी, अरेवा तसेच अरेवा चीन हे कंपनीचे काही महत्त्वाचे ग्राहक आहेत. आगामी काळातील उत्पादनांची मागणी पाहता येत्या दोन वर्षांत कंपनी आपली नवीन उत्पादने आणि विस्तारीकरणाच्या योजना यशस्वीपणे राबवून उलाढाल ५०० कोटी रुपयांवर नेईल अशी आशा आहे. आपल्या गुणवत्तेच्या जोरावर कंपनीने परदेशातही आपला ठसा उमटवला आहे. एझकॉम या रशियन कंपनीने तिच्या उत्पादनांचे भारतात आणि तुर्कस्तान येथे विपणन आणि विक्री करण्याकरिता मोदीसन मेटल्सला आपला प्रतिनिधी म्हणून नेमले आहे.
सध्या ५० रुपयांच्या आसपास उपलब्ध असलेला आणि केवळ ३.२५ कोटी रुपये भागभांडवल असलेला हा शेअर मध्यम ते दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी योग्य वाटतो.

सूचना: लेखकाची वा त्याच्या जवळच्या नातेवाईकांची (उपलब्ध माहितीप्रमाणे) लेखात सुचविलेल्या कंपनीच्या शेअर्समध्ये कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती १% पेक्षा कमी आहे. तसेच सुचविलेल्या कंपनीशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून त्याने कंपनीकडून कुठलेही मानधन अथवा भेटवस्तू घेतलेली नाही.

BYD offers discounts on Electric Vehicles
BYD Seal offers : ‘या’ कंपनीच्या इलेक्ट्रिक कारवर तीन वर्षांची सर्व्हिस, मेन्टेनन्स पॅकेज फ्री! वाचा सिंगल चार्जिंगमध्ये किती देते रेंज
24th October 2024 Horoscopes In Marathi
24 October Horoscope : गुरुपुष्यामृत योग कोणत्या राशींसाठी…
Established 40 years ago Bliss GVS Pharma Limited is emerging pharmaceutical manufacturing company
माझा पोर्टफोलियो, घसरणीच्या काळातील आरोग्यवर्धन: ब्लिस जीव्हीएस फार्मा लिमिटेड
Danish Power largest share sale in the SME sector since October 22
डॅनिश पॉवरची २२ ऑक्टोबरपासून ‘एसएमई’ क्षेत्रातील सर्वात मोठी भागविक्री
PNC Infratech Limited, My Portfolio, loksatta news,
माझा पोर्टफोलियो – उज्ज्वल भवितव्य, अंगभूत मूल्य : पीएनसी इन्फ्राटेक लिमिटेड
opportunities in new india assurance company ltd
शिक्षणाची संधी : न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी लि. मधील संधी
flood of ipos 13 companies file draft papers with sebi for ipo
‘आयपीओं’चा महापूर; एका दिवसात १३ कंपन्यांकडून ‘सेबी’कडे अर्ज
Top Trending Auto Vehicle in Google trending
Trending Auto Vehicle : १९५८ ची हिंदुस्थान ॲम्बेसेडर कार आता सर्वाधिक चर्चेत का? मारुतीपासून स्कोडापर्यंत; जाणून घ्या ऑटोमोबाइल क्षेत्रातील पाच टॉप ट्रेंडिंग विषय

अजय वाळिंबे  stocksandwealth @gmail.com