arth6दोन वर्षांपूर्वी म्हणजे साधारण जून २०१३ मध्ये हा शेअर याच स्तंभातून सुचवला होता. तेव्हा ४६३ रुपयांना सुचवलेला हा शेअर नंतर दिलेल्या १:१ बोनसपश्चात आज ७०० रुपयांच्या आसपास उपलब्ध आहे. म्हणजेच गुंतवणूकदारांना अडीच वर्षांत तिपटीहून जास्त फायदा झाला आहे.
व्हीए टेक वाबाग ही जगातील सर्वात मोठी पाण्याचे नियोजन, निस्सारण आणि व्यवस्थापन (वॉटर ट्रीटमेंट) करणारी बहुराष्ट्रीय कंपनी आहे. १९२४ साली स्थापन झालेल्या या कंपनीची मुख्य कार्यालये भारतातील चेन्नई आणि ऑस्ट्रियातील व्हिएन्ना येथे आहेत. भारतात कंपनीने काही मोठे आणि महत्त्वाकांक्षी प्रकल्प कार्यान्वित करून यशस्वीरीत्या राबवले आहेत. यामध्ये मुंबईतील महानगरपालिकेच्या प्रकल्पाखेरीज प्रामुख्याने दिल्लीतील कॉमनवेल्थ गेम्स संकुल, चेन्नईतील चेन्नई मेट्रोपोलिटियन वॉटर सप्लाय, कोलकात्यातील वेस्ट वॉटर ट्रीटमेंट प्लान्ट, रिलायन्सच्या जामनगर फॅक्टरीमधील कार्यान्वित केलेला आशियातील सर्वात मोठा वेस्ट वॉटर ट्रीटमेंट प्लान्ट इ. अनेक प्रकल्पांचा समावेश करावा लागेल. कंपनीने आपल्या व्यवसायाचे ईपीसी, म्युनिसिपल बिझनेस ग्रुप (टइॅ), इंटरनॅशनल बिझनेस ग्रुप (कइॅ), ऑपरेशन बिझनेस ग्रुप (डइॅ), इंडस्ट्रियल वॉटर ग्रुप (कहॅ) असे वेगवेगळ्या विभागांत विकेंद्रीकरण केले आहे. जागतिक मंदीचा कंपनीच्या कामगिरीवर विशेष परिणाम झालेला दिसत नाही. गेल्या तिमाहीत कंपनीने ३२४.५४ कोटी रुपयांच्या उलाढालीवर २३.८७ कोटी रुपयांचा नक्त नफा कमावला आहे. गत वर्षीच्या तुलनेत तो १०५ टक्के जास्त आहे. कंपनीकडे आजच्या घडीला ७,०७५कोटी रुपयांच्या ऑर्डर्स असून वाबागकडे यंदाही ऑर्डर्सचा ओघ चालूच राहील, अशी अपेक्षा आहे. बोनस दिल्यानंतर केवळ १०.९० कोटी रुपयांच्या भागभांडवलावर कंपनीने गेल्या आíथक वर्षांत २,२३९ कोटी रुपयांची उलाढाल आणि १०७ कोटी रुपयांहून अधिक नफा कमावला आहे. पाण्याचे महत्त्व ओळखून यंदाच्या आíथक वर्षांत कंपनीला भारतातील अनेक मोठय़ा नगरपालिकांकडून तसेच काही राज्यांकडून मोठय़ा ऑर्डर्सची अपेक्षा आहे. सुमितोमोच्या सहकार्यानेदेखील काही प्रकल्प सुरू होण्याची शक्यता आहे. जगभरातील पाण्याचे वाढते महत्त्व पाहता आपल्या देशातही अंदाजे १३.६ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित आहे. त्यामुळेच व्हीए टेक वाबागसारख्या कंपनीची खरेदी गुंतवणूकदारांना फायद्याचीच ठरेल यात शंका नाही.

arth7