योग्य समभागांची किंवा समभाग गुंतवणूक करणाऱ्या फंडाची निवड करण्यासाठी गुंतवणूकदाराकडे वेळ, गुंतवणुकीचे ज्ञान असणे आवश्यक असते, हे नसेल तर ‘फंड्स ऑफ फंड’ योजनेचा पर्याय म्हणून विचार करावा हे सुचविणारी आजची शिफारस.
क्वांटम इक्विटी फंड्स ऑफ फंड
क्वांटम इक्विटी फंड्स ऑफ फंड ही गुंतवणुकीसाठी कायम खुली असलेली योजना आहे. या योजनेत जमा झालेला निधी अन्य समभाग गुंतवणूक करणाऱ्या ७ म्युच्युअल फंडातून गुंतविला जातो. या सातही योजना गुंतवणुकीसाठी कायम खुल्या असलेल्या योजना आहेत. दीर्घकालीन गुंतवणुकीतून भांडवली वृद्धी हे या योजनांचे ध्येय आहे.
योग्य समभागांची किंवा समभाग गुंतवणूक करणाऱ्या फंडाची निवड करण्यासाठी गुंतवणूकदाराकडे वेळ, गुंतवणुकीचे ज्ञान हे नसेल तर विश्वासू सल्लागार असणे गरजेचे असते. अनेक गुंतवणूकदारांकडे तीनही गोष्टींचा अभाव असण्याची शक्यता जास्त असते. ज्यांच्याकडे बचतीसाठी तुटपुंजी रक्कम असल्याने गुंतवणुकीत विविधता आणणे शक्य होत नाही. या प्रकारच्या गुंतवणूकदारांसाठी आजची योजना पर्यायी ठरावी.
या फंडाने संदर्भ निर्देशांक म्हणून ‘एस अॅण्ड पी बीएसई २००’ हा निर्देशांक निवडला आहे. फंडाच्या गुंतवणुकीच्या परिघात असलेल्या फंडांपैकी पाच ते १० फंडांची निवड करून फंडात जमा होणारा निधी या निवडलेल्या फंडांतून गुंतविला जातो. गुंतवणुकीसाठी फंडांची निवड करण्याचे काम क्वांटम इन्फर्मेशन सव्र्हिसेस प्रा. लिमिटेड ही समभाग संधोधन व गुंतवणुकीशी संलग्न असलेली कंपनी करते. संशोधन व गुंतवणूक असलेल्या फंडाचा आढावा घेण्याची एक विशिष्ट पद्धत निर्धारित केली असून या पद्धतीनुसार गुंतवणुकीचा कालबद्ध आढावा घेतला जातो. या गुणात्मक व संख्यात्मक आढावा पद्धतीत मानवी हस्तक्षेप नसल्याने फंडाची निवड कुणी एक फंड घराणे अथवा फंड व्यवस्थापक यांच्याकडे कललेली नसते. कमीत कमी तीन वर्षे अस्तित्वात असणाऱ्या फंडाचा समावेश गुंतवणुकीच्या परिघात केला जातो. ही निवड करताना फंडाने तेजीचे व मंदीचे निदान एक आवर्तन पूर्ण केलेले असणे गरजेचे असते. जोखीम व परताव्याचा दर यांचा समतोल साधणारी गुंतवणूक असायला हवी व समभाग केंद्रित गुंतवणुकीऐवजी वैविध्य साधणारा पोर्टफोलिओ असणाऱ्या योजना गुंतवणुकीसाठी ग्राह्य़ धरल्या जातात. या संख्यात्मक निकषांच्या जोडीला गुंतवणुकीपूर्वी अन्य गुणात्मक तपशिलाकडे लक्ष पुरविले जाते. तो तपशील याप्रमाणे, गुंतवणूक योजनेच्या उद्दिष्टांशी साधम्र्य राखणारी हवी. गुंतवणूक धोरण व प्रक्रिया ही व्यक्तिसापेक्ष नसावी. फंड व्यवस्थापन व संशोधन विभागातील कर्मचाऱ्याची संख्या यावरून एखाद्या योजनेचा समावेश गुंतवणुकीच्या परिघात केला जातो.
१ नोव्हेंबर २०१३ पासून या फंडाचे निधी व्यवस्थापन चिराग मेहता पाहात आहेत. २० जुलै २००९ पासून म्हणजे फंडाची पहिली एनएव्ही जाहीर झाल्यापासून बिर्ला सनलाइफ फ्रंटलाइन इक्विटी हा केवळ एकच फंडाचा समावेश अखंड गुंतवणुकीत राहिलेला आहे. एचडीएफसी टॉप २०० सारख्या फंडातून परतावा घसरल्याने गुंतवणूक काढून घेणे हा निर्णय संस्थात्मक गुंतवणूकदाचा न वाटता एखाद्या वैयक्तिक गुंतवणूकदाराची मानसिकता दर्शवणारा वाटतो. तसेच अनेक अव्वल फंडाचा समावेश का नाही व सध्या गुंतवणुकीत असलेले फंडच का गुंतवणुकीत आहेत याचा थेट खुलासा फंड व्यवस्थापकांनी त्यांच्याशी झालेल्या चर्चेत केलेला नाही. फंडाची गुंतवणूक ‘डायरेक्ट’ प्रकारात केलेली असून क्वांटम म्युच्युअल फंड अर्धा टक्के व्यवस्थापन शुल्क आकारते. आयकर आकारण्याच्या दृष्टीने हा समभाग गुंतवणूक करणारा फंड असला तरी ‘फंडस् ऑफ फंड’ या प्रकारच्या फंडाची कर आकारणी रोखे गुंतवणूक करणाऱ्या फंडाप्रमाणे होते. रोखे गुंतवणूक करणाऱ्या फंडातून मिळणारा भांडवली नफा तीन वर्षे गुंतवणूक कालावधी किंवा अधिक असेल तरच ‘इंडेक्सेशन’चा लाभ मिळतो हे गुंतवणूक करण्याआधी लक्षात घेणे आवश्यक आहे. वर उल्लेख केल्याप्रमाणे गुंतवणुकीसाठी लागणारा वेळ व ज्ञान यांची कमतरता असल्यास गुंतवणूकदरांनी या फंडाचा विचार करावा. हा फंड विक्रेत्यांमार्फत विकला जात नसल्याने इच्छुक गुंतवणूकदारांनी थेट फंड घराण्याशी (०२२) ६१४४७८७६ या क्रमांकावर संपर्क करावा.
वसंत माधव कुलकर्णी – shreeyachebaba@gmail.com