राजा विक्रमादित्याने आपला हट्ट सोडला नाही. तलवार उपसून पुन्हा तो झाडावर चढला अन् फांदीवर लटकणाऱ्या प्रेताला खांद्यवर घेऊन मौनात चालू लागला. त्यासरशी प्रेतामधला वेताळाने प्रश्न विचारु लागला. ‘राजा तुझे ऐकून ज्यांनी डीमार्टच्या खुल्या भाग विक्रीला अर्ज केला व ज्यांना हे शेअर मिळाले त्यांनी तुला शतश: धन्यवाद दिले आहेत. तुझ्या म्हणण्याप्रमाणे खरोखर या गुंतवणुकीतून ‘क्विक बग’ची प्राप्ती झाली आहे. आता मागील वर्षांच्या चौथ्या तिमाहीच्या निकाल जाहीर होण्यास प्रारंभ झाला असून मागील आठवडय़ात इन्फोसिसचे निकाल जाहीर झाले. इन्फोसिसचे निकाल बाजाराला फारसे पसंत पडले नाहीत. उद्या टीसीएस व या आठवडय़ात येस बँक, एचडीएफसी बँक यांच्या निकाल जाहीर होतील. या निकालांबाबत तुझा काय अंदाज आहे? या प्रश्नाचे उत्तर तू दिले नाहीस तर तुझ्या डोक्याची शंभर शकले होऊन तुझ्याच पायावर लोळू लागतील.’ वेताळाने राजाला सांगितले. ‘बाजाराला इन्फोसिसचे निकाल पसंत पडले नाहीत. इन्फोसिसने येत्या वर्षांच्या वाटचालीसमंधी जे संकेत दिले आहेत ते गुंतवणूकदारांची चिंता वाढविणारे आहेत. हे खरे असले तरी इन्फोसिस आपल्या भविष्यातील वाटचालीचे चित्र नेहमीच सावधपणे रंगवत असते. डॉलरच्या तुलनेत सुदृढ होत असलेला रुपया ही सर्वच निर्यातदरांची समस्या आहे. तशी ही समस्या इन्फोसिसचीसुद्धा आहे. परकीय गुंतवणूकदाराकडून भारतीय रोखे व समभागांची होत असलेली खरेदी व सरकारने नियंत्रणात ठेवलेली वित्तीय तुट यामुळे रुपया सुदृढ होत असल्याची लक्षणे दिसत आहेत. रिझव्‍‌र्ह बँकेच्या वार्षिक पतधोरणात गव्हर्नर या विषयावर काही भाष्य करतील असे वाटले होते. परंतु त्यांनी  या बाबत काही ठोस संकेतदेणारे वक्तव्य करणे टाळल्याने एकूणच समंधीतांच्या मनात संदेह निर्माण झाला. ही तिमाही संपेपर्यंत म्हणजे ३० जूनपर्यंत रुपयाचा विनिमय दर ६२च्या जवळपास असण्याची शक्यता आहे. म्हणून इन्फोसिसचे निकाल काही जणांच्या चिंतेचा विषय ठरले आहेत. या पाश्र्वभूमीवर इन्फोसिसच्या निकाल तपासले तर निकालाचे चित्र जितके वाईट रंगवले तितके निकाल वाईट मुळीच नाहीत. ज्यांची फारसे धाडस करण्याची इच्छा नाही परंतु या गुंतवणुकीतून थोडी बहुत अर्थप्राप्ती व्हावी अशी इच्छा आहे त्यांनी या भावात इन्फोसिस ९ ते १२ महिन्यांसाठी घेण्यास काहीच हरकत नाही’, राजा म्हणाला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

‘मी मागीला आठवडय़ात म्युच्युअल फंडांच्या व विदेशी गुंतवणुकीचे व्यवस्थापन करणाऱ्या निधी व्यवस्थापकांशी संवाद साधला. या सर्वांच्या मते निफ्टीतील कंपन्यांचे निकाल चांगले असतील. त्यांच्या मते, बँकांचे एनपीए या तिमाहीतसुद्धा दिसले तरी एनपीएमध्ये किती घट होते हे जाणून घेणे महत्वाचे ठरेल. बँकांच्या कर्जातील वाढ ४.३६ टक्के सर्वांनाच चिंतीत करणारी असली तरी वृद्धी दरात वाढ होण्याची अपेक्षा आहे. स्टेट बँकेच्या जोडीला बँक ऑफ इंडिया व बँक ऑफ बडोदा यांचे समभाग घेऊन ठेवणे फायद्याचे ठरेल. एका निधी व्यवस्थापकाने सांगितल्याप्रमाणे निफ्टी कंपन्यांची विRी चौथ्या तिमाहीत ११ टक्कय़ांनी वाढणे अपेक्षित असून पुढील वर्षांत विक्रीतील वाढ १४ टक्के गृहीत धरली आहे. तिसरी तिमाही एफएमसीजी सेक्टरसाठी सर्वात खराब ठरली. निश्चलनीकरणाचा या क्षेत्रातील कंपन्यांना किती तडाखा बसला ते चौथ्या तिमाहीत अधिक दिसून येईल. म्हणून हिंदुस्थान युनिलिव्हर, नेस्ले, आयटीसीचे निकाल महत्त्वाचे आहेत. पोलाद निर्मिती कंपन्यांना प्रतीक्षा असलेली ‘स्टील पॉलिसी’ सरकार येत्या आठवडय़ात जाहीर करेल. मागील वर्षी निफ्टीतील एकमेव तोटय़ात असलेली टाटा स्टील चौथ्या तिमाहीत किती कमी तोटा होतो यावर गुंतवणूकदार कंपनीच्या शेअरची खरेदी करण्याचा विचार करू शकतील.

येत्या तिमाहीत निफ्टी ८८००-९३०० दरम्यान राहण्याची शक्यता असून निफ्टीच्या उत्सर्जनात १२ टक्के वाढ अपेक्षित आहे. निफ्टीचे उत्सर्जन ५०५ ते ५०७ दरम्यान असेल. एचडीएफसी बँक, इन्फोसिस, इंडियन ऑईल, मारुती सुझुकी, कोटक बँक, लार्सन, ब्रिटानिया, एल अँड टी होल्डिंग्ज यांचा गुंतवणुकीसाठी नव्याने विचार करावयास हरकत नाही तर संभव इंजिनियरिंग, थायरोकेयर, डी मार्ट, नवनीत एज्युकेशन, हेग्झावेअर टेक्नोलॉजी हे मिड कॅप आकर्षक वाटतात. अशा तऱ्हेने राजाचे मौन भंगल्यामुळे वेताळ शवासहित गायब झाला आणि झाडावर जाऊन बसला.

पुंगीवाला gajrachipungi@gmail.com