मागील वर्षी या स्तंभातून संवाद साधताना, जास्तीत जास्त प्रश्न हे घर किंवा इतर मालमत्ता विक्रीतून झालेल्या भांडवली नफ्यावर विचारण्यात आले होते. प्राप्तिकर कायद्यातील तरतुदी या समजण्यास सर्वसामान्यांना थोडा त्रास होतो. असे व्यवहार इतर व्यवहारांपेक्षा कमी असतात. त्यामुळे कोणतीही भांडवली संपत्ती विकली तर पुढे काय करावयाचे? हा प्रश्न सर्वाना पडतो. सर्व प्रथम भांडवली संपत्ती कोणती आहे ते पाहावे. भांडवली संपत्तीच्या व्याख्येत सर्व भांडवली संपत्तीच्या व्याख्येत सर्व प्रकारच्या संपत्ती येतात; परंतु या व्याख्येत न बसणाऱ्या संपत्ती सोबतच्या चौकटीत दिल्या आहेत.

– एखाद्या संपत्तीमधील ‘राइट’ (हक्क) हासुद्धा भांडवली संपत्तीचा भाग आहे. म्हणूनच भाडे किंवा पागडी तत्त्वावर असलेली जागा हीसुद्धा भांडवली संपत्ती आहे. ती मिळवण्यासाठी काही खर्च केला नसला तरी. जर आपण विक्री केलेली संपत्ती (चौकटीत दिलेल्या संपत्तीपेक्षा वेगळी) भांडवली संपत्तीच्या व्याखेत बसत  असेल तर त्यावर होणारा भांडवली नफा हा करपात्र असतो.

maharashtra vidhan sabha elections 2024, Rajura,
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर थेट आंदोलन न करणाऱ्या ॲड. चटप यांना मतदार स्वीकारणार का?
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
investors of DSK, Maval-Mulshi sub-divisional magistrate, Court, DSK,
‘डीएसके’ यांच्या गुंतवणूकदारांची यादी सादर करण्याचे मावळ-मुळशी उपविभागीय दंडाधिकाऱ्यांना न्यायालयाचे आदेश
carbon border tax
‘कार्बन बॉर्डर’ टॅक्स काय आहे? भारतासह चीन याचा विरोध का करत आहे?
loksatta editorial no interest rate cut by rbi retail inflation surges in october
अग्रलेख : म्हाताऱ्या शब्दांचा आरसा…
young woman arrested for stealing, shopping,
सराफी पेढीत खरेदीच्या बहाण्याने चोरी करणाऱ्या तरुणीसह साथीदार गजाआड; पुणे, मुंबई, ठाण्यात चोरीचे गुन्हे
supreme court rejects sebi penalty on mukesh ambani In rpl shares case
सर्वोच्च न्यायालयाचा मुकेश अंबानींना दिलासा; ‘आरपीएल शेअर्स’प्रकरणी ‘सॅट’च्या आदेशाला सेबीचे आव्हान फेटाळले!
devendra fadnavis assured to farmers if rate is less than guaranteed price government will pay difference
“हमीभावापेक्षा कमी दर मिळाल्यास फरकाची रक्कम सरकार देणार,” उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्‍वासन

यानंतर भांडवली संपत्ती आपण किती काळासाठी धारण केली आहे ते तपासावे. या धारण काळानुसार भांडवली संपत्ती ही अल्पमुदतीची आहे किंवा दीर्घ मुदतीची आहे हे ठरविता येते. साधारणत: ३६ महिन्यांपेक्षा जास्त काळ संपत्ती धारण केल्यास तशा संपत्तीची मालकी दीर्घमुदतीची असते. परंतु खाली दर्शविलेल्या संपत्तीसाठी हा काळ वेगळा आहे :

*  शेअर बाजारातील नोंदणीकृत कंपन्यांचे शेअर्स  १२ महिने

*  शेअर बाजारातील नोंदणीकृत नसलेल्या कंपन्यांचे शेअर्स  २४ महिने (१ एप्रिल     २०१६ पूर्वी ३६ महिने)

* ‘यूटीआय’चे युनिट्स (नोंदणीकृत किंवा बिगर नोंदणीकृत) १२ महिने

*  इक्विटी ओरिएन्टेड म्युचुअल फंड (नोंदणीकृत वा बिगर नोंदणीकृत)  १२ महिने

*  डेट ओरिएन्टेड म्युचुअल फंड (नोंदणीकृत वा बिगर नोंदणीकृत)  ३६ महिने (१० जुल  २०१४ पूर्वी १२ महिने)

*  झीरो कुपन बाँड (नोंदणीकृत वा बिगर नोंदणीकृत)  १२ महिने

भांडवली संपत्तीच्या विक्रीवर होणाऱ्या नफ्यावरील करपात्रता या धारण काळावर अवलंबून असते. अल्प मुदतीच्या भांडवली संपत्तीच्या विक्रीवर होणाऱ्या भांडवली नफ्यावर आपापल्या कर टप्प्यांच्या दराप्रमाणे (स्लॅब) कर भरावा लागतो. अल्प मुदतीच्या भांडवली नफ्यावर कर वाचविण्याच्या सवलती नाहीत. शेअर बाजारातील नोंदणीकृत शेअर्सच्या विक्रीतून किंवा इक्विटी ओरिन्टेड म्युचुअल फंडाच्या विक्रीतून (ज्यावर एसटीटी- शेअर उलाढाल कर भरला आहे) होणाऱ्या अल्प मुदतीच्या भांडवली नफ्यावर सवलतीच्या दरात कर म्हणजेच १५% इतका कर भरावा लागतो, जरी आपले उत्पन्न ३०% स्लॅबमध्ये असले तरी दीर्घ मुदतीच्या भांडवली नफ्यावर मात्र अनेक सवलती मिळू शकतात या थोडक्यात खालील प्रमाणे :

१. शेअर बाजारातील नोंदणीकृत शेअर्सच्या विक्रीतून (ज्यावर एसटीटी- शेअर उलाढाल कर भरला आहे) किंवा इक्विटी म्युचुअल फंडाच्या विक्रीतून  होणारा दीर्घ मुदतीचा भांडवली नफा हा करमुक्त आहे.

२. शेअर बाजारातील नोंदणीकृत नसलेल्या शेअर्सच्या विक्रीतून किंवा डेट ओरिएन्टेड म्युचुअल फंडाच्या विक्रीतून होणारा दीर्घ मुदतीचा भांडवली नफा हा महागाई निर्देशांकानुसार गणल्या जाणाऱ्या (इंडेक्सेशन) खरेदी मूल्यानुसार काढता येतो जेणेकरून करदायीत्व कमी होण्यास मदत होते.

३. घर विक्रीतून होणारा दीर्घ मुदतीचा भांडवली नफा दुसऱ्या घरात (फक्त एक घरात) ठरावीक काळात गुंतविला तर कलम ५४ नुसार कर वाचविता येतो.

४. घराव्यतिरिक्त भांडवली संपत्ती विक्रीतून होणारा भांडवली नफा वाचवायचा असेल तर विक्री किमतीएवढी (विक्री खर्च वजा जाता) गुंतवणूक कलम ५४ एफनुसार घरामध्ये केल्यास कर वाचविता येतो. यासाठी तुमच्याकडे नवीन घराव्यतिरिक्त दोनपेक्षा जास्त घरे नसली पाहिजेत.

५. कोणतीही दीर्घ मुदतीची भांडवली संपत्ती विकली तर कलम ५४ ईसीनुसार कॅपिटल गेन बाँडमध्ये सहा महिन्यांच्या आत ५० लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करता येते. दीर्घ मुदतीचा भांडवली नफा ५० लाख रुपयांपेक्षा जास्त असेल तर योग्य प्रमाणात वजावट मिळते.

६. शेत जमीन (शहरातील) विक्रीतून होणाऱ्या दीर्घ किंवा अल्प मुदतीच्या नफ्यावर कर वाचवायचा असेल तर दुसरी शेत जमीन ठरावीक काळात विकत घेतल्यास कलम ५४ बीनुसार कर वाचविता येतो.

७. १ एप्रिल २०१६ पासून नवीन कलमानुसार (कलम ५४ ईई) कोणतीही दीर्घ मुदतीची भांडवली संपत्ती विकली तर या कलमानुसार ‘दीर्घ मुदतीच्या निर्देशित अ‍ॅसेट्स’मध्ये सहा महिन्यांच्या आत ५० लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करता येते. दीर्घ मुदतीचा भांडवली नफा ५० लाख रुपयांपेक्षा जास्त असेल तर योग्य प्रमाणात वजावट मिळते.

* प्रश्न : माझा मुलगा एप्रिल २०१४ पासून परदेशात राहातो. त्याचे २०१५-१६ या आíथक वर्षांत भारतात उत्पन्न नाही. त्याला विवरणपत्र भरणे बंधनकारक आहे का?

– सुधीर निमकर : ईमेलईद्वारे

उत्तर :  भारतातील उत्पन्न हे कमाल करमुक्त उत्पन्नाच्या मर्यादेपेक्षा जास्त असेल तर विवरणपत्र भरणे बंधनकारक आहे. आपल्या मुलाचे उत्पन्न या मर्यादेपेक्षा कमी असेल तर विवरणपत्र भरावे लागणार नाही. 

* प्रश्न : माझ्या नावावर माझे स्वत:चे राहते घर आहे. मला हे घर विकून आता दुसरे घर घ्यावयाचे आहे. माझे राहते घर विकण्यास विलंब होत आहे. म्हणून मी नवीन घर घेण्यासाठी गृहकर्ज घेणार आहे. हे नवीन घर घेतल्यानंतर मी जुने घर विकले आणि त्याचे मिळालेले पसे मी गृहकर्ज परतफेडीसाठी वापरले तर मला राहत्या घरावर झालेल्या भांडवली नफ्यातून सूट मिळू शकेल का?

-विश्राम वैद्य, पुणे .

उत्तर : भांडवली नफ्यावर कर वाचवायचा असेल तर काही अटींची पूर्तता करावी लागते. एक अट म्हणजे भांडवली नफा हा दीर्घ मुदतीचा असला पाहिजे. म्हणजेच आपण आपले राहते घर ३ वर्षांपेक्षा जास्त काळापूर्वी खरेदी केले असले पाहिजे आणि त्याचा ताबासुद्धा ३ वर्षांपेक्षा जास्त काळापूर्वी घेतला असला पाहिजे. कलम ५४ नुसार नवीन घरात गुंतवणूक ही घरविक्री पूर्वी एक वर्ष आणि घरविक्रीनंतर दोन वर्षांत (बांधले तर तीन वर्षांत) करावी लागते. आपल्या बाबतीत आपण राहत्या घराच्या विक्रीतून झालेल्या दीर्घ मुदतीच्या भांडवली नफ्याएवढी गुंतवणूक नवीन घरात वरील मुदतीत केल्यास कलम ५४ नुसार वजावट मिळू शकते.

खालील संपत्तींचा समावेश भांडवली संपत्तीत होत नाही :

* घरात वैयक्तिक कारणासाठी वापरल्या जाणाऱ्या वस्तू, ज्यामध्ये दागिने, पुरातन शिल्पे, चित्रे, वगरे. घरातील फíनचर, भांडी, कपडे, टीव्ही, फ्रीज वगरे विकल्यास होणारा भांडवली नफा हा करपात्र नसतो. जर का दागिने किंवा चित्रे, शिल्पे वगरे विकले तर त्यावर होणारा नफा हा करपात्र असतो. सोन्या-चांदीची भांडी, सोने, हिरे लावलेली घडय़ाळे, कपडे यांच्या विक्रीतून होणारा भांडवली नफा करपात्र असतो.

* शेत जमीन, शहराबाहेर असलेली (शहराची व्याख्या प्राप्तिकर कायद्यात दिलेली आहे.)

*  व्यापारी-व्यावसायिकांकडे विक्रीसाठी असलेला माल

*  १९७७ आणि १९९९ मध्ये जारी केलेले सुवर्ण रोखे

भांडवली नफा हा विषय खूप मोठा आहे. बाकी माहिती पुढील लेखात.

आपलेही कर आणि त्या संबंधी नियोजनाविषयक काही प्रश्न असतील त्याचे समाधान करून घेण्यासाठी प्रश्न पाठवा : pravin3966@rediffmail.com