एसबीआय मॅग्नम मल्टि-कॅप फंड
म्युच्युअल फंड ही संकल्पना इतकी विस्तृत आहे की ज्याच्या त्याच्या गरजेनुसार आणि जोखिमेला साजेसे गुंतवणूकसाधन निवडता येते. मल्टिकॅप फंड ही संकल्पना अशाच लवचीक गुंतवणूक प्रकाराचे वास्तव आहे. सर्वसाधारणपणे मल्टिकॅप फंड ३०-४० टक्क्यादरम्यान मिड कॅप व प्रसंगी स्मॉल कॅप प्रकारच्या समभागातून गुंतवणूक करणारा फंड प्रकार आहे. तत्कालीन मूल्यांकनानुसार लार्ज कॅप प्रकारातील समभागांचा समावेश उर्वरित गुंतवणुकीत होत असतो. एकूण गुंतवणुकीचा मोठा हिस्सा मिड कॅप समभागांनी व्यापलेला असल्याने साहजिकच मल्टिकॅप फंडांचा परताव्याचा दर अन्य फंडांपेक्षा कांकणभर सरस असतो. मल्टिकॅप फंड प्रकारात लार्ज कॅप, मिड कॅप यांचे प्रमाण किती राखावे यावर बंधन नसल्याने समभागाचा गुंतवणुकीत समावेश केवळ मूल्यांकन याच निकषावर होतो. परंतु भविष्यात चांगली कामगिरी करेल असा मल्टिकॅप फंड हुडकणे कठीण असते. म्युच्युअल फंड गुंतवणूकसंबंधी असणाऱ्या संकेतस्थळांचे एखाद्या फंडाल मल्टिकॅप फंड ठरविण्याचे निकष वेगवेगळे आहेत. त्यामुळे ‘व्हॅल्यू रिसर्च ऑनलाइन’ या संकेतस्थळाने मल्टिकॅप ठरविलेल्या फंडाचा उल्लेख ‘मॉर्निगस्टार’ डाव्हर्सिफाइड इक्विटी फंड म्हणून करते. प्रत्येक फंडात लार्ज कॅप व मिड कॅपचे प्रमाण वेगवेगळे असते. प्रत्येक फंडाचा संदर्भ निर्देशांक वेगवेगळा असल्याने फंडांची उद्योग क्षेत्रातील गुंतवणूक त्या त्या निर्देशांकानुसार असते. या दोन कारणांनी दोन मल्टिकॅप फंडांचा परतावा सारखा असला तरी जोखीम विचारात घेतल्यास परताव्याचा दर (रिस्क अॅडजस्टटेड रिटर्न्स) भिन्न असतो.
सप्टेंबर २००५ मध्ये पहिली एनएव्ही जाहीर झालेल्या एसबीआय मॅग्नम मल्टिकॅप फंडाने मागील वर्षी १,००० कोटींच्या मालमत्तेचा टप्पा पार केला. बीएसई ५०० हा या फंडाच्या संदर्भ निर्देशांक आहे. सुरुवातीपासून या फंडाने कामगिरीत सातत्य राखले असून डायव्हर्सिफाइड इक्विटी (मल्टिकॅप) फंड गटात मागील सहा महिन्यांपासून (दोन तिमाहीत) हा फंड अव्वलस्थानी आहे. फंडाच्या कामगिरीची दखल घेऊन मॉर्निगस्टारने या फंडास ‘फाइव्ह स्टार’ तर व्हॅल्यू रिसर्च ऑनलाइनने ‘फोर स्टार’ मानांकन बहाल केले आहे. साधारणपणे २०११ पर्यंत या फंडाची सुमार कामगिरी होती. २०११ नंतर फंडाच्या कामगिरीत सुधारणा होत गेली. कॅलेंडर वर्ष २०१५ चा परतावा दखल घेण्यायोग्य नक्कीच होता. आज हा फंड अव्वल परतावा असणाऱ्या फंडांपैकी एक फंड समजला जातो. एसबीआय मॅग्नम मल्टिकॅप फंड भांडवलीवृद्धीसाठी दीर्घकालीन गुंतवणूक करणारा फंड आहे.
फंडाची गुंतवणूक असलेल्या पहिल्या पाच उद्योग क्षेत्रांपैकी बँकिंग, वाहन उद्योग व अभियांत्रिकी ही तीन उद्योग क्षेत्रे आर्थिक आवर्तनाच्या दिशाबदलामुळे लाभार्थी ठरलेली उद्योग क्षेत्रे आहेत. पहिल्या पाच समभाग गुंतवणुकीपैकी स्टेट बँक व मारुती यांच्या बाजारभावात वर्षभरात १०० टक्क्यांहून अधिक वृद्धी झाली आहे. तर पहिल्या पाचमध्ये समावेश असलेल्या इन्फोसिसचा भाव ब्रेग्झिटनंतर २० टक्क्यांनी गडगडला. फंडाच्या ऑक्टोबर २०१६च्या गुंतवणूक पत्रकानुसार फंडाच्या एकूण गुंतवणुकांपैकी ६७ टक्के गुंतवणुका लार्ज कॅप समभागांत आहेत. फंडाच्या गुंतवणुकीत प्रामुख्याने आर्थिक आवर्तनांशी संबंधित असणाऱ्या समभागांचा अंतर्भाव आहे. याव्यतिरिक्त औषधनिर्मिती, ग्राहक उपयुक्तता उद्योगातील समभागांचा समावेश आहे. आघाडीच्या १० गुंतवणुकांची एकत्रित टक्केवारी ३४ टक्के आहे. पहिल्या १० समभागांपैकी इक्विटास होल्डिंग्जचा अपवाद वगळता अन्य नऊ समभाग मागील वर्षभरापासून फंडाच्या गुंतवणुकीत आहेत. इक्विटास होल्डिंग्जचा समावेश या कंपनीच्या प्राथमिक भागविक्री अर्थात आयपीओच्या वेळी केला गेला.
(अस्वीकृती: या स्तंभात वापरलेली माहिती व आकडेवारी ही उपलब्ध माहिती स्रोतांपासून घेतली आहे. या लेखाचा उद्देश या योजनेची वाचकांना ओळख व्हावी इतपतच मर्यादित आहे. वाचकांनी गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे अभिप्रेत आहे.)
वसंत माधव कुलकर्णी shreeyachebaba@gmail.com