‘सेबी’तील दुसऱ्या क्रमांकाची दीर्घ कारकीर्द लाभलेल्या यू. के. सिन्हा यांच्या कारकीर्दीचे मूल्यमापन ते जाताना करावाचा लागेल. त्यांची कारकीर्द वादग्रस्त नसली तरी या सहा वर्षांच्या कालावधीत सिन्हा यांनी भरीव कामगिरी केली असेही म्हणता येत नाही. म्युच्युअल फंडात कामकाजाची पाश्र्वभूमी असल्याने सिन्हा हे म्युच्युअल फंडाच्या समस्या सोडवतील असे सुरुवातीला वाटत होते; परंतु सर्वाधिक म्युच्युअल फंड कंपन्यांनी सिन्हा यांच्या कारकीर्दीत भारतातील व्यवसायातून गाशा गुंडाळला.

Image of Vice-President Jagdeep Dhankhar or Rajya Sabha proceedings
No Confidence Motion : भारताच्या संसदीय इतिहासातील सर्वात मोठी घटना, राज्यसभा सभापतींच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Uday Samant On Jayant Patil
Uday Samant : “जयंत पाटील महायुतीत येणार असतील तर…”, शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान
Amol Mitkari On Jayant Patil :
Amol Mitkari : “जयंत पाटील योग्य वेळी योग्य निर्णय घेणार”, अजित पवार गटाच्या नेत्याचा मोठा दावा, चर्चांना उधाण
Amit Deshmukh On Nana Patole
Amit Deshmukh : विधानसभेतील अपयशानंतर महाराष्ट्रातील काँग्रेस नेतृत्वात बदल होणार? ‘या’ नेत्याने स्पष्ट सांगितलं
Sadabhau Khot On Maharashtra Cabinet Expansion
Sadabhau Khot : “मोठ्या पक्षांची मंत्रिपदे नंतर निश्चित करा, आधी…”, सदाभाऊ खोत यांनी महायुतीच्या नेत्यांकडे केली ‘ही’ मागणी
CM Devendra Fadnavis IMP Statement About Ladki Bahin Scheme
Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाचं वक्तव्य, “२१०० रुपये…”
Devendra Fadnavis Speech
Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस यांचा उद्धव ठाकरेंना टोला, “२०१९ ला जनतेने जो कौल दिला होता त्याच्याशी बेईमानी…”

राजा विक्रमादित्याने आपला हट्ट सोडला नाही. तलवार उपसून पुन्हा तो झाडावर चढला अन् फांदीवर लटकणाऱ्या प्रेताला खांद्यावर घेऊन मौनात चालू लागला. त्यासरशी प्रेतामधला वेताळ प्रश्न विचारू लागला, ‘‘राजा, येत्या बुधवारी ‘सेबी’चे नवनियुक्त अध्यक्ष अजय त्यागी हे विद्यमान अध्यक्ष यू. के. सिन्हा यांच्याकडून अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारतील. सेबीतील दुसऱ्या क्रमांकाची दीर्घ कारकीर्द लाभलेल्या सिन्हा यांच्या कारकीर्दीचे मूल्यमापन तू कसे करशील? या माझ्या प्रश्नाचे उत्तर तू दिले नाहीस तर तुझ्या डोक्याची शंभर शकले होऊन तुझ्याच पायावर लोळू लागतील,’’ वेताळाने राजाला सांगितले.

‘‘यू. के. सिन्हा हे यूटीआयच्या अध्यक्षपदावरून सेबीच्या अध्यक्षपदी नियुक्त झालेले दुसरे अध्यक्ष होत. याआधी एम. दामोदरन हेदेखील यूटीआयच्या अध्यक्षपदावरून सेबीच्या अध्यक्षपदी नियुक्त झाले होते. दोन वेळा मुदतवाढ मिळाल्यामुळे १८ फेब्रुवारी २०११ ते १ मार्च २०१७ अशी सहा वर्षांहून थोडे अधिक दिवस कारकीर्द लाभलेल्या सिन्हा यांची कारकीर्द वादग्रस्त नसली तरी या सहा वर्षांच्या कालावधीत सिन्हा यांनी भरीव कामगिरी केली असे म्हणता येत नाही. सिन्हा यांची पाश्र्वभूमी म्युच्युअल फंडाची असल्याने सिन्हा म्युच्युअल फंडाच्या समस्या सोडवतील असे त्यांच्या कारकीर्दीच्या सुरुवातीला वाटत होते; परंतु सर्वाधिक म्युच्युअल फंड कंपन्यांनी सिन्हा यांच्या कारकीर्दीत भारतातील व्यवसायातून गाशा गुंडाळला. कोणीही या गाशा गुंडाळण्याचे कारण जाहीरपणे सांगितले नसले तरी आतील गोटाचा अंदाज घेतला असता सेबीच्या न परवडणाऱ्या नियमांमुळे या फंडांनी आपला भारतातील व्यवसाय बंद केला. ‘सेबी’ने एकाच प्रकारे गुंतवणूक पद्धत असणाऱ्या परंतु वेगवेगळी नावे असलेल्या एकाच म्युच्युअल फंड योजनांच्या विलीनीकरणाचा निर्णय तीन वर्षांपूर्वी घेतला; परंतु सिन्हा अजूनपर्यंत या निर्णयाची अंमलबजावणी करू शकले नाहीत,’’ राजा म्हणाला.

‘‘सध्या ‘हाय फ्रिक्वेन्सी ट्रेडिंग’ किंवा ‘अल्गोरिदम ट्रेडिंग’ ही गोष्ट केवळ संस्थात्मक गुंतवणूकदारांपुरती सीमित आहे. ही पद्धत सर्वसामान्य गुंतवणूकदारांना अजून उपलब्ध झालेली नाही. याबाबत सेबीने दोन्ही बाजार मंचांसाठी सामाईक नियम तयार करण्याऐवजी मुंबई शेअर बाजार व राष्ट्रीय शेअर बाजार हे आपापली नियमावली स्वतंत्रपणे बनवत असून या नियमावलीस अद्याप सेबीची मान्यता मिळणे बाकी आहे. सामान्य गुंतवणूकदाराची ताकद असे म्हणणाऱ्या ‘सेबी’ला ही गोष्ट नक्कीच भूषणावह नाही,’’ राजा म्हणाला.

‘‘सेबीने ‘नोंदणीकृत गुंतवणूक सल्लागार २०१३’ या नावाने ओळखला जाणारा एक आदेश काढला. सेबीच्या आदेशानुसार सल्लामसलत व गुंतवणूक प्रक्रिया या दोन गोष्टी वेगळ्या करतानाच म्युच्युअल फंड सल्लागारांना म्युच्युअल फंड विकण्याचा मोबदला किंवा ज्या विक्रेत्यामार्फत फंडात गुंतवणूक केली त्याला त्या विक्रीबद्दल मोबदला यापैकी एकच गोष्ट करावयास परवानगी दिली आहे. हे दोन्ही व्यवसाय एका छपराखाली करण्यास मनाई करताना हा व्यवसाय करणाऱ्या दोन व्यक्ती किंवा संस्था यांच्यात ‘आर्म लेन्थ डिस्टन्स’ ठेवावे, असा हा अध्यादेश म्हणतो. प्रत्यक्षात हा व्यवसाय करणाऱ्या दोन भागीदार व्यक्तींपैकी किंवा बहुतांश ठिकाणी नवरा-बायकोपैकी एक सल्लागार आणि दुसरा विक्रेता अशी पळवाट या आदेशातून काढली गेली आहे. गंमत पाहा, ‘आर्म लेन्थ डिस्टन्स’ याचा शब्दकोशात अर्थ Ê avoid intimacy or familiarity  असा आहे! ‘नवरा-बायकोपैकी एक सल्लागार व दुसरा विक्रेता अशा रचनेत ‘आर्म लेन्थ डिस्टन्स’ कसे ठेवणार, हे सेबीच जाणे. असा भोंगळ अध्यादेश सिन्हा यांच्या कारकीर्दीत निघाला.’’

‘‘सेबी अध्यक्षपदी निवड होण्याआधी सिन्हा भारतीय प्रशासकीय सेवेत होते. यूटीआयच्या अध्यक्षपदी निवड होण्याआधी सिन्हा नवी दिल्लीत अर्थ मंत्रालयात सहसचिव पदावर होते. नोकरशाही अंगात पुरेपूर भिनलेली असल्याने सिन्हा यांचे जनसमुदायाला संबोधताना नियामकाऐवजी त्यांच्यातील नोकरशहाच अधिक जाणवायचा. सिन्हा पहिल्या नियोजित तीन वर्षांच्या कार्यकाळासाठी झालेल्या नियुक्तीनंतर अधिक दोन वर्षे व त्यानंतर एक वर्ष अशी दोन वेळा मुदतवाढ मिळविण्यात यशस्वी ठरले. सिन्हा यांच्या आधीचे सेबीचे अध्यक्ष सी. बी. भावेसुद्धा माजी नोकरशहा असले तरी नियामकाच्या भूमिका त्यांनी व्यवस्थित आत्मसात केल्या होत्या. सिन्हा हे कायम नोकरशहाच राहिले. भावे यांनी भांडवली बाजारात अनेक सुधारणा केल्या. म्युच्युअल फंडाचे डायरेक्ट प्लान ही भावे यांची भांडवली बाजाराला देणगी आहे. रोखे भांडारांना व शेअर बाजारांना त्यांच्या नफ्यातील २५ टक्के तसेच म्युच्युअल फंडांना त्यांच्या सरासरी मालमत्तेच्या ०.०२ टक्के रक्कम गुंतवणूक साक्षरतेवर खर्च करण्याची सक्ती सेबीने सिन्हा यांच्या कारकीर्दीत केली. भारतीय नागरिकांची अर्थसाक्षरतेची पातळी पाहता गुंतवणूकदारांना अर्थसाक्षर करणे गरजेचे होते,’’ राजा म्हणाला. अशा तऱ्हेने राजाचे मौन भंगल्यामुळे वेताळ शवासहित गायब झाला आणि झाडावर जाऊन बसला.

पुंगीवाला gajrachipungi@gmail.com

Story img Loader