मुंबई शेअर बाजार निर्देशांक (सेन्सेक्स) नवनवीन शिखर पादाक्रांत करीत आहे. पण इतके दिवस ढेपाळलेल्या, उच्चांकापासून वंचित असलेल्या निफ्टी निर्देशांकाने २३ मार्चच्या नीचांकापासून उभारी घेत, गुरूपौर्णिमेच्या दिवशी  भाकीत केलेल्या ११,२५० च्या उच्चांकाला साद घालून वातावरणात चतन्य निर्माण केले.

अशा या प्रसन्न वातावरणाला चतुरत्र कवयित्री शांताताई शेळके यांच्या ‘दिसते मजला सुखचित्र नवे’ या काव्यपंक्ती चपखल बसतात.

Changes in gold prices What are today gold rates
सोन्याच्या दरात मोठे बदल… हे आहेत आजचे दर…
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Loksatta Chatura How to plan a New Year 2024 party at home
चतुरा: घरीच करा न्यू ईयर पार्टीची धम्माल
Entry to Vasota Fort banned for three days Forest Department decision satara
वासोटा किल्ला प्रवेशावर तीन दिवस बंदी; वनविभागाचा निर्णय
Monopole erection to keep power system running smoothly
वीजयंत्रणा सुरळीत ठेवण्यासाठी मोनोपोल
rupee continues to depreciate, US dollar, rupee ,
रुपयाचे मूल्य आणखी खोलात!
chhatrapati Sambhajinagar sports complex scam
१३ हजार पगार असलेल्या कर्मचाऱ्याने घातला २१ कोटींचा गंडा; प्रेयसीला दिला ४ बीएचकेचा फ्लॅट, स्वतः घेतल्या आलिशान गाड्या
Pune railway station, Pune railway station waiting time,
पुणे : रेल्वे प्रवाशांचा स्थानकावरील प्रतिक्षाकाळ कमी होणार, आराखडा अंतिम टप्प्यात

या पाश्र्वभूमीवर या आठवडय़ाच्या वाटचालीकडे वळूया.

शुक्रवारचा बंद भाव –

’  सेन्सेक्स  :  ३७,३३६.८५

’  निफ्टी     : ११,२७८.४०

जसा धावपटू दीर्घपल्ल्याची शर्यत जिंकल्यावर अंमल थोडी विश्रांती घेतो, तसेच काहीसे आता निर्देशांकांबाबत अपेक्षित आहे. या घडीला ३७,५०० / ११,३००-३५० वरून सेन्सेक्सवर ३०० अंशांची आणि निफ्टीवर १५० अंशांची संक्षिप्त घसरण अपेक्षित आहे. त्यानंतर पुन्हा निर्देशांक ३८,००० / ११,३५० ते ११,५०० चा नवीन उच्चांक दृष्टिपथात येईल.

सोन्याचा किंमत-वेध

गेल्या दोन लेखात नमूद केलेली ३०,००० रुपयांची ही ‘महत्त्वाची कल निर्धारण पातळी’ होती आणि या पातळी खालीच सोन्याचे व्यवहार चालू आहेत. सोने सातत्याने ३०,००० रुपयांखाली टिकल्यास सोन्याचे भाव पुन्हा २९,७०० रुपये आणि त्यानंतर २९,४०० रुपयांपर्यंत सोन्याचे भाव खाली घसरू शकतात. सोन्यावर शाश्वत तेजी ही ३०,२०० रुपयांच्या स्तरावरच सुरू होईल. (सोन्याचे भाव ‘एमसीक्स’ वरील व्यवहारावर आधारित)

लक्षणीय समभाग

ल्युपिन लिमिटेड

(बीएसई कोड – ५००२५७)

शुक्रवारचा बंद भाव – रु. ८१५.२५

* ल्युपिन ही क्षयरोग, हृदयरोग, श्वसनाचे रोग या व्यांधीवर औषधे बनविणारी कपंनी आहे. ल्युपिनच्या समभागाचा सामान्य मार्गक्रमण पट्टा (बॅण्ड) हा रू. ७५०  ते रू. ८५० असा आहे. शाश्वत तेजी ही रू. ८६० वर सुरू होऊन अत्यल्प मुदतीचे प्रथम उद्दिष्ट हे रू. ९०० असेल. आणि द्वितीय उद्दिष्ट हे रू. ९५० असेल आणि दीर्घ मुदतीचे उद्दिष्ट हे रू. १,१०० असेल या दीर्घमुदतीच्या गुंतवणुकीला ७०० रुपयांचा ‘स्टॉप लॉस’ ठेवावा.

ashishthakur1966@gmail.com

अस्वीकृती :  शेअर बाजारातील व्यवहार हे बाजारातील जोखमीच्या अधीन आहेत. अंदाज चुकल्यास मुद्दल गमावण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी ‘स्टॉप लॉस’ आणि इच्छित उद्दिष्ट या संकल्पनाचे पालन करणे आवश्यक आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

Story img Loader