बाजारात गेल्या काही दिवसांत दिसलेला तीव्र स्वरूपाचा चढ हा निर्देशांकांना २०१६ मधील उच्चांकापर्यंत घेऊन गेला. हा उच्चांक आणखी किती विस्तारणार, की तेजीची दौड यापुढे अडखळणार? घोडदौडीला खीळ बसली तर ती निर्देशांकांना कोणत्या तळाला नेऊन विश्रांती घेईल? नजीकच्या दिवसांतील बाजाराच्या दृष्टीने संवेदनशील देशी-विदेशी घडामोडी पाहता, गुंतवणूकदारांपुढील कळीच्या प्रश्नांचे हे मुद्देसूद समाधान करणारे तांत्रिक विश्लेषण..
फेब्रुवारी २०१६ मध्ये अर्थसंकल्पाच्या दिवशीच ‘आजचा अर्थसंकल्प निर्देशांकाला कलाटणी देईल काय?’ असा लेख ‘अर्थवृत्तान्त’मध्ये येऊन गेला. या लेखात चालू असलेल्या निरंतर तेजीबद्दल स्पष्ट कल्पना देण्यात आलेली होती.
यंदाच्या अर्थसंकल्पाकडे ‘वाईट बातमी नसणं हीच चांगली बातमी’ याच दृष्टिकोनातून बाजार पाहात होता. या धर्तीवर अर्थसंकल्पापूर्वी ज्या वावडय़ा उठत होत्या- जसे या वर्षी अल्पकालीन गुंतवणुकीवर भांडवली नफा आकारण्यात येणार (शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स) हे वृत्त प्रत्यक्ष सादर झालेल्या अर्थसंकल्पातून निराधार ठरलं. सरकार ‘अच्छे दिना’च्या प्रतीक्षेत न ठेवता विकास मार्गावरची वाटचाल कायम राखणार आहे हे खालील घटनांवरून दिसतं.
वित्तीय तूट कमी करण्याबाबत सरकारची वचनबद्धता दिसून आली. सकल राष्ट्रीय उत्पादन (जीडीपी) दर आठ टक्के राखण्यास व तो वाढण्यासाठी आíथक सुधारणांची गती वाढवणार. तसेच त्या वेळेला काळाची गरज असलेले सुखद भाकीत ऑस्ट्रेलियन वेधशाळेने केले. भारतात या वर्षी समाधानकारक पाऊस पडणार या भाकितामुळे दोन र्वष अवर्षण, दुष्काळाशी झुंजत असलेली ग्रामीण अर्थव्यवस्था सावरण्याची आशा निर्माण झाली. अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने तर त्या वेळी मांडलेल्या तांत्रिक विश्लेषणाला खालील घटनांची सकारात्मक जोड मिळाली.
१. ‘डो’ आलेख रचनेप्रमाणे मंदीच्या आवर्तनाला एक वर्ष पूर्ण होत आलं. (४ मार्च २०१५ चा उच्चांक निफ्टी निर्देशांकावर ९,११९ व मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्स निर्देशांकावर ३०,०२४ उच्चांकावरून २९ फेब्रुवारी २०१६ ला ६,८२५/ २२,४९४चा नीचांक मारला). जे एक वर्ष चाललेल्या मंदीची समाप्ती दर्शवत होते.
२. २००८ नंतर प्रथमच निर्देशांकात २५ टक्क्यांची विक्रमी वार्षिक घट झाली.
३. प्रतिथयश (ब्ल्यूचीप) कंपन्यांचे समभाग मातीमोल किमतीत उपलब्ध झाले.
४. तांत्रिक विश्लेषणातील परिमाण (ऑसिलेटर्स) ‘आरएसआय विलियम आर’नी तळ गाठला (ओवर सोल्ड) जी मंदीची समाप्ती दर्शवत होते. या सर्व कारणांमुळे मंदीची समाप्ती होऊन तेजीचा वारू निष्कर्ष मांडण्यात आला. सामान्य गुंतवणूकदाराला त्यावर स्वार न होण्याची संधी देताच चौखूर उधळला व अवघ्या तीन महिन्यांत निर्देशांक ६,८००/ २२,४९४ वरून ८,०००/ २६,००० च्याही पुढे गेला.
परंतु ही तेजीची संधी हुकलेल्या गुंतवणूकदारांसाठी परत एकदा जुलमध्ये खरेदीची संधी मिळेल. त्यासाठी आपण तांत्रिक विश्लेषणातील ‘गॅन अँगल’ व ‘गॅन टाइम सायकल’चा आधार घेऊ या.
तांत्रिक विश्लेषणात एक सुभाषित आहे- ‘टारगेट शुड बी अचीव्ड टाइम वाइज अ‍ॅण्ड प्राइस वाइज!’
आता ‘गॅन अँगल’ हे निर्देशांकाची संभाव्य उच्चांक काय असेल ते सांगेल व ‘गॅन टाइम सायकल’ ही त्यासंबंधाने तारीख सांगेल.
निर्देशांकाचा संभाव्य उच्चांक काढण्याकरिता आपण ४ मार्च २०१५चा उच्चांक बिंदू आणि २९ फेब्रुवारी २०१६चा नीचांक बिंदू घेऊ या.
४ मार्च २०१५ च्या उच्चांक बिंदूवरून काढलेल्या गॅन अँगलची या आठवडय़ातील निर्देशांकाची किंमत ही निफ्टी निर्देशांकावर ८,३५० ते ८,६०० आणि मुंबई शेअर बाजार निर्देशांकावर २७,००० ते २७,७०० येत आहे.
दुसरा बिंदू २९ फेब्रुवारी २०१६च्या नीचांकापासून गॅन अँगलचा या आठवडय़ातील संभाव्य निर्देशांकांचा उच्चांक ८,५००/ २७,६०० असण्याची शक्यता आहे. तेव्हा येणाऱ्या दिवसांत निर्देशांकाचा संभाव्य उच्चांक हा ८,३५० ते ८,६००/ २७,००० ते २७,६०० असण्याची शक्यता आहे. हे ‘प्राइस वाइज टारगेट’ झालं. आता ‘गॅन टाइम सायकल’कडे वळू या.
या ठिकाणी २९ फेब्रुवारी २०१६ चा नीचांक पकडून ३४ दिवसांचं चक्र (सायकल) हे १३ ते १७ जून या आठवडय़ात उच्चांक होण्याचे संकेत देत आहे.
तेव्हा या आठवडय़ात १३ ते १७ जूनमध्ये टाइम वाइज उच्चांक ८,३५० ते ८,६०० हा प्राइस वाइज उच्चांकही ठरण्याची शक्यता आहे.
तथापि त्यापल्याड खालील घटनांमुळे तेजीच्या वारूला खीळ बसू शकते.
१. आता जी निर्देशांकात वाढ झाली आहे ती ‘भूमितीय श्रेणीतील वाढ’ (जॉमेट्रिकल प्रोग्रेशन- जीपी) आहे. ज्यात पायाभरणी न होताच कळस रचला गेला. त्यामुळे निर्देशांकात एक घसरण अपेक्षित आहे.
२. जागतिक अर्थव्यवस्थेची जननी असलेली अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेची रोजगारनिर्मितीची क्षमता (जॉब डेटा) ही या वेळेला दीड लाख रोजगारनिर्मितीची अपेक्षा होती. पण प्रत्यक्षात अर्थव्यवस्थेने अवघी ३८,०००ची रोजगारनिर्मिती झाली, जी चिंताजनक परिस्थिती आहे.
३. आताच्या घडीला निर्देशांक मापदर्शक/ कलदर्शक – ऑसिलेटर्समधील सर्व ऑसिलेटर्स हे उच्चतम (ओवरबॉट) पातळीवर आहेत, जे मंदी येण्याची शक्यता वर्तवीत आहेत.
४. तेजीच्या उधाणवाऱ्यात निर्देशांक ८,४०० ते ८,६०० गाठेल, पण वरील सर्व स्थर/ पातळ्या या गुंतवणूकदारांसाठी तेजीचे सापळे (बुल ट्रॅप) असतील.
वरील सर्व गोष्टी खऱ्या ठरल्या तर जुलमध्ये एक मंदी अपेक्षित आहे. अल्प मुदतीच्या गुंतवणूकदारांसाठी येणारी मंदी समभाग खरेदी करण्यासाठी सुवर्णसंधी असेल. तेव्हा आता नफ्यातील समभाग विकून रोकड सुलभता निर्माण करावी.
सरतेशेवटी गुंतवणूकदाराच्या मानसिकतेकडे वळू या. मार्चपासून जून महिन्यापर्यंत जी तेजी आली त्यात पसे असूनही समभागाची भरभरून, मनासारखी खरेदी करता आली नाही हे एक शल्य आहे. आता मात्र सर्वत्र प्रसन्न, मनाला उल्हसित करणारं असं आनंदी वातावरण आहे. पण बाजारात प्रचलित सुभाषिताप्रमाणे, ‘ऑन युफोरिया मार्केट फॉर्म टॉप’ एकंदर कल हे सुचवितो की, या पातळ्यांवर खरेदी करणं धोक्याचं आहे.
‘शांत बसण्याची एक किंमत असते व ती शांत बसूनच द्यावी लागते’ अन्यथा पशाच्या स्वरूपात तिचे मोल मोजावे लागते.
आशीष अरिवद ठाकूर – nashishthakur1966@gmail.com
सूचना : निर्देशांकाची आगामी वाटचाल कशी असेल याचा आढावा घेणाऱ्या प्रस्तुत लेखातील अनुमानाच्या आधारे खरेदी व विक्री यांपकी कोणताही व्यवहार तज्ज्ञ सल्लागाराच्या मार्गदर्शनाने घेणे उचित ठरेल व त्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित वाचकाची असेल.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
eknath shinde
Eknath Shinde: एकनाथ शिंदे विरोधी पक्ष नेते? ‘दाल…
What is NOTA in Elections and What Happens When NOTA gets Most Votes
NOTA in Elections : NOTA खरंच महत्त्वाचे आहे का? सर्वाधिक मते नोटाला मिळाले तर काय होईल?
Story img Loader