अर्थ वृत्तान्त, २६ मार्चच्या लेखाचे शीर्षक होते – ‘भय इथले संपत नाही, भाग – २’ यात निर्देशांकाने नीचांक मारण्याचे भय कायम होते आणि निर्देशांकांनी ३२,४८३ / ९,९५१ चा नीचांक मारून बाजारात सुधारणा झाल्यामुळे मंदीचे भय आता तात्पुरते संपल्यामुळे या आठवडय़ाची वाटचाल कशी असेल त्याचा आढावा घेऊ या.

शुक्रवारचा बंद भाव –

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
eknath shinde
Eknath Shinde: एकनाथ शिंदे विरोधी पक्ष नेते? ‘दाल…
What is NOTA in Elections and What Happens When NOTA gets Most Votes
NOTA in Elections : NOTA खरंच महत्त्वाचे आहे का? सर्वाधिक मते नोटाला मिळाले तर काय होईल?

*  सेन्सेक्स :  ३३,६२६.९७

*  निफ्टी     :       १०,३३१.६०

या आठवडय़ात सेन्सेक्स-निफ्टी निर्देशांकाचा सामान्य मार्गक्रमण पट्टा (बॅण्ड) हा अनुक्रमे ३२,९२३ ते ३४,००० आणि १०,१८० ते १०,४०० असेल या स्तरावर निर्देशांकांची पायाभरणी होऊन वरचे इच्छित उद्दिष्ट हे ३४,४५० / १०,५५० असेल.

जानेवारी ते मार्चच्या कालावधीत निर्देशांकांच्या उच्चांकाचे आणि नीचाकांचे भाकीत अचूक आल्यामुळे (याचे संपूर्ण श्रेय अर्थात तांत्रिक विश्लेषण शास्त्राला) पुढील काही लेखांच्या श्रुखलांमध्ये निर्देशांकाचा भविष्यकालीन आढावा घेण्याचा प्रयत्न राहील. आताच्या घडीला मंदीच्या वातावरणात गुंतवणूकदारांच्या कोमेजलेल्या मनाला प्रसन्न करणारं भाकीत म्हणजे.. २०२०-२१ ला सेन्सेक्स-निफ्टी निर्देशांकाचा उच्चांक अनुक्रमे ४५,०००/ १४,००० असा असेल.

यात एका बाजूला उच्चांकाची नवनवीन शिखरे आहेत तर दुसऱ्या बाजूला मंदीच्या खोल दऱ्यादेखील आहेत. या दऱ्याखोऱ्यातून गुंतवणूकदाराला स्वतचा तोल सांभाळत वाटचाल करायची आहे. यात प्रामुख्याने दोन ते तीन वर्षांचा कालावधी आणि त्यामधील अनिश्चितता ही गृहीत धरावी लागेल. यात प्रामुख्याने २०१९च्या लोकसभेच्या निवडणुका व त्यानंतर नवीन सरकारची आर्थिक धोरणे, आंतरराष्ट्रीय पटलावर ट्रम्पसाहेबांचे फतवे या सर्व अनिश्चिततेत पुढील दोन ते तीन वर्षांचे मार्गक्रमण करायचे आहे. यात व्यक्ती म्हटली की मर्यादा आल्या. माझ्या ज्ञानाला मर्यादा असू शकतात / अंदाज चुकू शकतात पण इंग्रजीत एक सुंदर वाक्य आहे  ‘नॉट फेल्युअर, बट लो ऐम इज क्राईम’. (अपयश नव्हे तर उच्च ध्येयाचा अभाव आणि प्रयत्नांची पराकाष्ठा न करणे हा गुन्हा आहे)

तेव्हा पुढील लेखापासून निर्देशांकांचे ‘मिशन २०२०’ची श्रुखंला सुरू होईल.

सोन्याचा  किंमत-वेध

*   पृथ्वी जशी आपल्या अक्षाभोवती फिरते तसे सोने हे  रु. ३०,५०० च्या अक्षाभोवतीच फिरत आहे. ज्याचा उल्लेख आपण महत्त्वाची ‘कल निर्धारण पातळी’ म्हणून केलेला आहे.  रु. ३०,५०० स्तराखाली सोन्याचे खालचे उद्दिष्ट हे रु. ३०,१०० असेल जे १९ मार्चला साध्य झाले आणि रु. ३०,५०० च्या स्तरावर सोने ३०,८००-९०० चे वरचे इच्छित उद्दिष्ट असेल जे २ एप्रिलला गाठले गेले आणि उच्चांक मारून परत सोने ३०,५०० वर स्थिरावले. या आठवडय़ात सोने रु. ३०,५०० चा स्तर राखण्यात यशस्वी ठरल्यास रु. ३०,८०० / ३१,१०० ही वरची इच्छित उद्दिष्टे असतील. अन्यथा रु. ३०,५०० स्तराखाली सोने रु. ३०,३०० ते ३०,१०० पर्यंत खाली घसरू शकते. (सोन्याचे भाव ‘एमसीक्स’ वरील व्यवहारावर आधारित).

लक्षणीय समभाग

एनबीसीसी इंडिया लि.

(बीएसई कोड – ५३४३०९८)

शुक्रवारचा बंद भाव – रु. २०७.५०

*  समभागाचा सामान्य मार्गक्रमण पट्टा (बॅण्ड) हा रु. १८० ते २१५ आहे. रु. २१५ वर रु. २२५-२३५ ही अत्यल्प मुदतीची उद्दिष्टे असतील. समभागात शाश्वत तेजी ही रु. २३५ च्या वर सुरू होऊन प्रथम वरचे उद्दिष्ट रु. २५० आणि नंतर रु. २९० असेल. या दीर्घ मुदतीच्या गुंतवणुकीला रु. १७०चा स्टॉप लॉस ठेवावा. ‘स्टॉप लॉस’ ठेवावा.

आशीष अरविंद ठाकूर ashishthakur1966@gmail.com

अस्वीकृती :  शेअर बाजारातील व्यवहार हे बाजारातील जोखमीच्या अधीन आहेत. अंदाज चुकल्यास मुद्दल गमावण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी ‘स्टॉप लॉस’ आणि इच्छित उद्दिष्ट या संकल्पनाचे पालन करणे आवश्यक आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

Story img Loader