सुंदरम सिलेक्ट मिड कॅप
बदल होऊ घातलेल्या कररचनेचा लाभ लार्ज कॅपपेक्षा मिड कॅप कंपन्यांनाच अधिक होणार आहे. तीन ते पाच वर्षांनतर या कंपन्यांच्या नफाक्षमतेत मोठी वाढ निश्चितच संभवते. तथापि मिड कॅप समभागांच्या किमतीत वेगाने चढउतार लक्षात घेता ही गुंतवणूक दीर्घ मुदतीची असली तर गुंतवणूकदारांच्या पदरात पडत परताव्याचे माप पडेल हेही लक्षात घ्यावे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

वस्तू व सेवा कर विधेयकास काही बदलानंतर राज्यसभेने मंजुरी दिली. आर्थिक उदारीकरणाच्या मार्गावरील वस्तू व सेवा कर विधेयकास मंजुरी मिळणे हे १९९१ नंतरचा सर्वात मोठा बदल समजला जातो. या विधेयकाच्या मंजुरीमुळे विक्री कर, अबकारी कर, मूल्यवर्धित कर, अन्य उपकर (मद्य, वीजनिर्मिती व पेट्रोलियम उत्पादने वगळता) यांची जागा वस्तू व सेवा कर घेणार असल्याने कर कायद्यात सुसूत्रता येईल. पुरवठा साखळीची कार्यक्षमता वाढल्यामुळे असंघटित क्षेत्र व संघटित क्षेत्र यांच्यावरील कररचनेतील सध्याचा मोठा फरक नाहीसा होणार असल्याने नवीन कर कायद्याचा थेट लाभ ज्या कंपन्यांना होणार आहे. विजय केळकर समितीने कररचनेत सुधारणा सुचविणारा Task Forces on Direct and Indirect Taxes या मथळ्याचा एक अहवाल सादर केला होता. या अहवालात कर आकारणी अधिक कार्यक्षम करून कर पळवाटा बंद करण्यासाठी कर सुधारणा सुचविल्या होत्या. या अहवालानुसार वस्तू व सेवा कराचे मूळ विधेयक तयार करून सुधारणांसहित ते मंजूर करण्यात आले. मोठी करचोरी असंघटित क्षेत्राकडून होत असल्याने या करचोरीच्या वाटा या कायद्याने बंद केल्याने असंघटित क्षेत्रातील कंपन्या व मिड कॅप कंपन्या या समान पातळीवर आल्या आहेत. उदाहरणार्थ गणेश इकोस्पीयर ही भारतातील पेय बाटल्यांच्या पुनर्वापर क्षेत्रातील सर्वात मोठी कंपनी आहे. या कंपनीला धारावीसारख्या ठिकाणी असलेल्या असंघटित क्षेत्राकडून मोठय़ा स्पर्धेला तोंड द्यावे लागते. कर पळवाटा बंद झाल्यामुळे, या स्पर्धेची दाहकता नक्कीच कमी होईल. अशा कंपन्यांपैकी बहुसंख्य कंपन्या या मिड कॅप प्रकारात मोडणाऱ्या असल्याने तीन ते पाच वर्षांनतर या कंपन्यांच्या नफाक्षमतेत मोठी वाढ संभवत आहे. या बदल होऊ घातलेल्या कररचनेचा लाभ लार्ज कॅपपेक्षा मिड कॅप कंपन्यांनाच अधिक होणार आहे. अधिकची जोखीम पत्करून लार्ज कॅपपेक्षा अधिक भांडवली लाभ घेण्याची इच्छा असणारे गुंतवणूकदार ५-७ वर्षे दरम्यानच्या कालावधीसाठी एसआयपीच्या माध्यमातून मिड कॅप फंडात गुंतवणुकीचा विचार करू शकतात.
३० जुलै २००२ रोजी पहिली एनएव्ही जाहीर झालेला ‘सुंदरम सिलेक्ट मिड कॅप’ हा फंड मिड कॅप फंडातील एक अव्वल फंड आहे. फंडात ३० जुलै २००२ मध्ये १,००,००० गुंतविणाऱ्या गुंतवणूकदाराचे ५ ऑगस्ट २०१६ च्या एनएव्हीनुसार ३,९७,३३५ झाले असून परताव्याचा दर ३०.०२% इतका आहे. वेगवेगळ्या आर्थिक आवर्तनांच्या टप्प्यात फायद्याच्या, सुयोग्य उद्योग क्षेत्रातील मिड कॅप समभागांमध्ये गुंतवणूक केल्याने एक यशस्वी मिड कॅप फंड असा या फंडाचा लौकिक आहे. एक वर्ष, ३ वर्षे, ५ वर्षे, १० वर्षे व १५ वर्षे या कालावधीत परताव्याच्या दरानुसारच्या क्रमवारीत हा फंड सतत पहिल्या पाच क्रमांकांत आपले स्थान अबाधित राखून आहे. परताव्याच्या दरानुसार फंडाच्या कामगिरीचा तौलनिक आढावा कोष्टक क्रमांक १ मध्ये दिला आहे
मिड कॅप समभागातील गुंतवणूक (मिड कॅप फंडातीलसुद्धा) ही अधिक जोखमीची समजली जाते, परंतु दीर्घकालीन उद्दिष्टांसाठी मिड कॅप गुंतवणूक लार्ज कॅपपेक्षा अधिक परतावा देऊ शकते. ही गुंतवणूक करण्यापूर्वी गुंतवणूकदारांनी बाजाराच्या चढ-उतारांना सामोरे जाण्याची तयारी ठेवणे गरजेचे आहे. सुंदरम समूहातील गैरबँकिंग वित्तीय कंपनी असलेल्या सुंदरम फायनान्स या कंपनीने प्रवर्तित केलेल्या सुंदरम म्युच्युअल फंडाची ही योजना असून भारतातील मिड कॅप योजनांपैकी ही एक जुनी योजना असल्याने अनेक पारंपरिक गुंतवणूकदार आपल्या गुंतवणुकीत या फंडाचा आवर्जून समावेश करतात. २००७ ते २०१२ या कालावधीत या फंडाचे व्यवस्थापन सतीश रामनाथन यांच्याकडे होते. २०१२ पासून या फंडाचे व्यवस्थापन एस. कृष्णकुमार यांच्याकडे आहे.
फंडाच्या गुंतवणुकीत ५०-५५ समभागांचा समावेश केलेला असून निधी व्यवस्थापकाने अग्रक्रम दिलेल्या पहिल्या पाच उद्योग क्षेत्रांचा तपशील सोबत दिला आहे. फंडाच्या पहिल्या पाच गुंतवणुकांचे प्रमाण एकू ण गुंतवणुकीच्या १७.३२, तर पहिल्या दहा गुंतवणुकांचे प्रमाण एकू ण गुंतवणुकीशी ३१.२९ टक्के आहे. मिड कॅप गुंतवणुकीतील जोखीम नियंत्रित करण्यासाठी १२ समभागांचे प्रमाण एकू ण गुंतवणुकीच्या १% हून कमी असून प्रत्येक समभागातील सरासरी गुंतवणूक १.५७% आहे. भारतीय अर्थव्यवस्था संक्रमण अवस्थेतून बाहेर पडत असल्याने बँकिंग, भांडवली वस्तू, अभियांत्रिकी, सिमेंटसारख्या आर्थिक आवर्तनाच्या दिशाबदलाचा फायदा होणाऱ्या उद्योग क्षेत्रांचा गुंतवणुकीत समावेश आहे. निधी व्यवस्थापकाने परतावा मिळविताना गुंतवणुकीत घेतलेली जोखीम अधिक असल्याने परताव्याची टक्केवारी जोखमीच्या प्रति एकक अधिक आहे. फंडाचे ३ ते ५ वर्षे दरम्यानचे प्रमाणित विचलन १८-३०% दरम्यान असल्याने अन्य फंडांच्या ‘शार्प रेशो’ची तुलना केली असता सुंदरम सिलेक्ट मिड कॅपचा ‘शार्प रेशो’ अधिक आहे. हे चांगल्या पोर्टफोलिओ व्यवस्थापकाचे लक्षण आहे. सात व १० वर्षे कालावधीत हा फंड अन्य स्पर्धक फंडांच्या तुलनेत जोखीम संलग्न परताव्याच्या पातळीवर अव्वल ठरतो.
तात्पर्य :
समभाग गुंतवणूक हे दीर्घ मुदतीचे गुंतवणूक साधन आहे. त्यातही मिड कॅप हे अति जोखमीची गुंतवणूक समजली जाते. मिड कॅप समभागांच्या किमतीत वेगाने चढउतार होतात. म्हणून दीर्घ मुदतीची मिड कॅप गुंतवणूक केल्यास परताव्याचे भरघोस माप गुंतवणूकदारांच्या पदरात पडत असल्याने गुंतवणूकदार समुदायात मिड कॅपप्रेमींचा मोठा वर्ग आढळतो. बाजारातील मिड कॅप समभागांच्या चढउताराची दाहकता ‘सिप’ गुंतवणुकीमुळे कमी होते. अव्वल परतावा देणाऱ्या या मिड कॅप योजनांची मालिका योजली आहे. आपल्या आर्थिक उद्दिष्टांची पूर्ती करणाऱ्या या मिड कॅप योजनांचा समावेश आपआपल्या गुंतवणुकीत आपल्या आर्थिक उद्दिष्टांच्या कालावधीनुसार करावा.

shreeyachebaba@gmail.com
(अस्वीकृती: लेखात वापरलेली माहिती व आकडेवारी ही उपलब्ध माहिती स्रोतांपासून घेतली आहे. या लेखाचा उद्देश या योजनेची वाचकांना ओळख व्हावी इतपतच मर्यादित आहे. वाचकांनी गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे अभिप्रेत आहे.)