* प्रश्न : मी सप्टेंबर २०१३ मध्ये माझ्या नावाने एक आणि माझ्या पत्नीच्या नावाने एक अशा दोन वेगवेगळ्या एक रकमी (सिंगल प्रिमियम) विमापत्रे घेतली होती. सदर विमापत्रे १५ वर्षे मुदतीची आहेत. त्याचा हफ्ता प्रत्येकी ५,९९,००० रुपये इतका भरला आणि जोखीम रक्कम ८ लाख रुपये इतकी आहे. विमा करारानुसार १,२०,००० रुपयांचा पहिला हफ्ता मला सप्टेंबर २०१६ मध्ये मिळाला. या हफ्त्यातून विमा कंपनीने १ टक्का उद्गम कर (टीडीएस) कापून घेतला. माझा प्रश्न असा आहे की हा उद्गम कर नियमानुसार कापला गेला आहे का? हे मी विवरणपत्रात कसे दाखवू?
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
भालचंद्र उर्सेकर, डोंबिवली
उत्तर : एक रकमी विमापत्रे (सिंगल प्रिमियम पॉलिसी) आता लोकप्रिय होत आहेत. याला अनेक कारणे आहेत. एक म्हणजे दरमहा, त्रमासिक, सहामाही, वार्षिक विमा हफ्ता भरणे हे काहींना त्रासदायक होते. अनेकदा हफ्ता वेळेवर भरला जात नाही आणि विमापत्र रद्द होण्याची भीती असते. एकदाच हफ्ता भरला तर या त्रासातून सुटका होते. ज्यांचे अनियमित उत्पन्न असते त्यांच्यासाठी हा पर्याय चांगला आहे.
याचे काही तोटे आहेत. ‘कलम ८० सी’ प्रमाणे विमा हमी रकमेच्या फक्त २० टक्के इतकी रक्कम (१ एप्रिल २००३ नंतर आणि १ एप्रिल २०१२ पूर्वी जारी झालेल्या विमा पत्रासाठी) आणि विमा हमी रकमेच्या फक्त १० टक्के इतकी रक्कम (१ एप्रिल २०१२ नंतर जारी झालेल्या विमापत्रासाठी) वजावट मिळते. आपल्या बाबतीत विमा हमी रक्कम ८ लाख रुपये आहे आपण विमा हफ्ता जरी ५,९९,००० रुपये भरला असला तरी कलम ८० सी नुसार वजावट फक्त ८०,००० रुपये (८ लाख रुपयांच्या १० टक्के) मिळेल.
अशी एक समजूत आहे की विम्याचे मुदतीनंतर किंवा मुदतीपूर्वी मिळालेले पैसे करमुक्त असतात. ‘कलम १० (१० डी)’ नुसार विम्याची रक्कम करमुक्त होती. परंतु, २००३ साली आलेल्या सुधारणेनुसार पुढील विम्याची मिळालेल्या रकमेसाठी सवलत काढून घेतली आहे. विमा जोखमीच्या २० टक्क्य़ांपेक्षा जास्त रक्कम, कोणत्याही एका वर्षांत हफ्ता भरली असेल तर (१ एप्रिल २००३ नंतर आणि १ एप्रिल २०१२ पूर्वी जारी झालेल्या विमा पत्रासाठी) कलम १० (१०डी) नुसार सवलत मिळत नाही. तसेच विमा जोखमीच्या १० टक्क्य़ांपेक्षा जास्त रक्कम, कोणत्याही एका वर्षांत हफ्ता भरला असेल तर (१ एप्रिल २०१२ नंतर जारी झालेल्या विमा पत्रासाठी) कलम १० (१०डी) नुसार सवलत मिळत नाही. १ एप्रिल २०१३ नंतर अपंगांसाठी ही मुदत १५ टक्के इतकी करण्यात आली आहे. विमाधारकाच्या मृत्यूनंतर वारसाला मिळालेल्या विमाच्या रकमेसाठी ही तरतूद लागू नाही. आपल्या बाबतीत विमा हफ्ता हमी रकमेच्या १० टक्क्य़ांपेक्षा जास्त असल्यामुळे कलम १० (१०डी) नुसार सवलत मिळणार नाही.
याशिवाय, विमा कंपन्यांना १ लाख रुपयांच्यावर विमा रकमेवर २ टक्के उद्गम कराची तरतूद करण्यात आली आहे (१ जून २०१६ पासून १ टक्का). कलम १० (१०डी) नुसार करमुक्त असणाऱ्या रकमेवर हा उद्गम कर लागू नाही. त्यामुळे आपल्याबाबतीत केलेला उद्गम कर हा उचित आहे.
असे करपात्र उत्पन्न इतर उत्पन्नात दाखवावे लागते.
* प्रश्न : माझे एक डिमॅट खाते आहे आणि नुकतीच शेअर बाजारात घसरण झाली तेव्हा मी ४ लाख रुपयांचे शेअर्स विकत घेतले. मला २,४०,००० रुपये निवृत्तीवेतन मिळते. आजपर्यंत मला नफा मिळाला नव्हता त्यामुळे मी प्राप्तिकर विवरणपत्र भरले नाही. मला दुसरे उत्पन्न नाही. जर मी काही शेअर्स एका वर्षांच्या आत विकले तर होणारा भांडवली नफा (समजा १ लाख रुपये) हा माझ्या निवृत्तीवेतनात मिसळला माझे उत्पन्न ३ लाख रुपयांच्यापेक्षा जास्त झाले तर तीन लाखापर्यंत मला कर भरावा लागणार नाही. मी १ लाख रुपये ‘कलम ८० सी’नुसार गुंतवणूक केली तर मला सूट मिळेल का?. भांडवली नफ्यावर मला १५ टक्के कर भरावा लागेल का?
– अनिल गोविंद राव, बदलापूर
उत्तर : आपले करपात्र उत्पन्न आणि देय कर खालील प्रमाणे :
निवृत्ती वेतन ” २,४०,०००
अल्पमुदत भांडवली नफा ” १,००,०००
एकूण उत्पन्न ” ३,४०,०००
वजावट (कलम ८० सी ) ” १,००,०००
करपात्र उत्पन्न ” २,४०,०००
हे उत्पन्न करमुक्त उत्पन्नाच्या मर्यादेत असल्यामुळे आपल्याला कर भरावा लागणार नाही. परंतु आपले एकूण उत्पन्न कलम ८० च्या वजावटी पूर्वी ३ लाख रुपयांपेक्षा जास्त असल्यामुळे विवरणपत्र भरावे लागेल.
* प्रश्न : माझ्या वडिलांना दरमहा मूळ वेतन १७,८४० रुपये आणि ग्रेड पे ४,४०० रुपये त्यांना कर किती भरावा लागेल?
– प्रशांत ठाकरे, गडचिरोली</strong>
उत्तर : आपल्या वडिलांना एकूण वार्षिक उत्पन्न २,६६,८८० रुपये (१७,८४० रुपये अधिक ४,४०० रुपये x १२ महीने) इतके मिळते. आपले वडील ज्येष्ठ नागरिक असतील त्यांचे उत्पन्न कमाल करमुक्त उत्पन्न ३ लाख रुपयांच्यापेक्षा कमी असल्यामुळे कर भरावा लागणार नाही. आणि ज्येष्ठ नागरिक नसतील तरी ‘कलम ८७ ए’ ची कर सवलत विचारात घेतल्यास कर भरावा लागणार नाही.
प्रश्न : मी एक पगारदार नोकर आहे. माझ्या पगारातून दर महिन्याला उद्गम कर कापला जातो. हा उद्गम कर नोव्हेंबर, २०१६ पर्यंत कापला आहे. मी नुकतेच माझे घर विकले. घर विकत घेणाऱ्याने घराच्या विक्री किमतीवर १ टक्का उद्गम कर कापला आहे. मी दुसऱ्या नवीन घरात गुंतवणूक करून घराच्या विक्रीवर होणाऱ्या दीर्घ मुदतीच्या भांडवली नफ्यावरील कर वाचविणार आहे. त्यामुळे मला घर विक्रीवर कर भरावा लागणार नाही. त्यामुळे मला या रकमेचा कर परतावा मिळणार आहे. यामुळे मी माझ्या कार्यालयात पुढील चार महिन्यात पगारावर उद्गम कर न कापण्यासंबंधी विनंती केली. परंतु ती त्यांनी अमान्य केली. हे कायद्याला धरून आहे का?
दिलीप देशमुख, नेरूळ
उत्तर : कलम १९२ नुसार पगारदार नोकरांना आपल्या कार्यालयाला पगाराव्यतिरिक्त इतर उत्पन्न आणि त्यावर केलेला उद्गम कर कळवावा लागतो. आणि ते उत्पन्न आणि त्यावर कापलेला उद्गम कर विचारात घेऊन कार्यालयाला पगारावरील उद्गम कर कापावा लागतो. परंतु कलम १९२ नुसार अशा उत्पन्न आणि उद्गम करामुळे जर पगारावरील उद्गम कराचे दाइत्व कमी होत असेल तर असे उत्पन्न आणि उद्गम कर कार्यालयाला विचारात घेता येत नाही. याला अपवाद फक्त गृहकर्जावरील व्याजामुळे झालेल्या ‘घरभाडे उत्पन्नाचा’ तोटा हा आहे. म्हणजेच फक्त अशा तोटय़ामुळे होणारे उद्गम कराचे दाइत्व कमी करण्याचे अधिकार कार्यालयाला आहेत. इतर कोणत्याही कारणाने नाही. आपल्या बाबतीत घर विक्रीवर झालेला उद्गम कर कार्यालयाला विचारात घेता येणार नाही. जर आपण कार्यालयाला कलम १९७ नुसार प्राप्तीकर अधिकाऱ्याचे उद्गम कर कमी कापण्याचे किंवा न कापण्याचे प्रमाणपत्र दिल्यास उद्गम कर कापला जाणार नाही. यासाठी आपल्याला प्राप्तीकर अधिकाऱ्याकडे फॉर्म १३ भरून आवश्यक कागदपत्रे सादर करून हे प्रमाणपत्र मिळवता येते.
* प्रश्न : मी २००९ मध्ये एक सदनिका प्री-लाँच योजनेत बुक केली आणि १४ लाख रुपये भरले होते. अजून प्रकल्प पूर्ण झाला नाही आणि मला सदनिकेचा ताबा मिळाला नाही. हे पैसे मी बिल्डरकडून परत मागत आहे आणि त्याने १० लाख रुपये परत दिले आहेत. या पैशांवर काही करदायीत्व काय?
उत्तर : आपण बिल्डरला सदनिका बुकिंगच्या वेळेला दिलेले १४ लाख रुपयांपैकी १० लाख रुपये आपल्याला ७ वर्षांनंतर परत मिळाले. ही रक्कम आपणच भरलेली असल्यामुळे यावर कर भरावा लागणार नाही. जर बिल्डरने आपल्याला सदनिका अलॉटमेन्टचे पत्र दिले असेल तर बांधण्यात येणाऱ्या सदनिकेवर आपला ‘हक्क (राइट)’तयार होतो. हा असा ‘हक्क’सुद्धा एक भांडवली संपत्ती आहे. हा ‘हक्क’ आपण तीन वर्षांनंतर परत बिल्डरला दिल्यास त्यावर होणारा नफा किंवा तोटा दीर्घ मुदतीचा असतो. त्यामुळे या व्यवहारावर झालेला तोटा आपण इतर दीर्घ मुदतीच्या भांडवली नफ्यातून वजा करू शकता किंवा तो पुढील वर्षांंसाठी कॅरी फॉरवर्डसुद्धा करू शकता. असे करण्यापूर्वी आपले कागदपत्र करसल्लागाराला दाखवून निर्णय घ्यावा.
* प्रश्न : मी जुलै, २००० मध्ये एक सदनिका २,०९,००० रुपयांना खरेदी केली होती आणि ती मी नोव्हेंबर, २०१६ मध्ये ३७ लाख रुपयांना विकली. मला कलम ५४ नुसार नवीन घरात किती गुंतवणूक करावी लागेल?
– एक वाचक, ईमेलद्वारे
उत्तर : आपल्याला झालेला भांडवली नफा हा दीर्घ मुदतीचा असेल. त्यामुळे महागाई निर्देशांकाचा लाभ मिळेल. दीर्घ मुदतीचा नफा खालील प्रमाणे :
सदनिका विक्री किंमत : ” ३७,००,०००
सदनिका खरेदी किंमत : ” २,०९,०००
महागाई निर्देशांकानुसार खरेदी मूल्य :
२०००-०१ सालचा निर्देशांक – ४०६
२०१६-१७ सालचा निर्देशांक – ११२५
महागाई निर्देशांकानुसार खरेदी मूल्य : २,०९,००० x ११२५ / ४०६
= रु ५,७९,१२६
दीर्घ मुदतीचा भांडवली नफा = ” ३१,२०,८७४
या दीर्घ मुदतीच्या भांडवली नफ्याएवढी म्हणजेच ३१,२०,८७४ रुपये किंवा त्यापेक्षा जास्त गुंतवणूक कलम ५४ नुसार केल्यास कर भरावा लागणार नाही. परंतु आपल्याला मुद्रांक शुल्कासाठी बाजारभाव मूल्य किती आहे हे सुद्धा विचारात घ्यावे लागेल.
* प्रश्न : माझे पगाराचे उत्पन्न ६,३०,००० रुपये इतके आहे. मला शेअर्सवर १,००,००० रुपयांचा दीर्घ मुदतीचा भांडवली नफा मिळाला आणि २०,००० रुपयांचा लघु मुदतीचा नफा मिळाला. याशिवाय मी १,५०,००० रुपयांची गुंतवणूक ‘कलम ८० सी’ मध्ये आणि ‘कलम ८० डी’नुसार २५,००० रुपयांची गुंतवणूक केली आहे. मला किती कर भरावा लागेल?
– प्रमोद देशमुख
उत्तर : शेअर्सवर मिळालेला दीर्घ मुदतीचा (शेअर्स खरेदी केल्याच्या तारखेपासून एक वर्षांनंतर विकले तर) भांडवली नफा हा करमुक्त आहे. (आणि त्यावर शेअर उलाढाल कर — एसटीटी भरला गेला असेल तर) शेअर विक्रीतून झालेला अल्पमुदतीचा भांडवली नफा हा करपात्र आहे. यावर एसटीटी भरला गेला असेल तर १५ टक्के इतका कर भरावा लागेल. आपला देय कर (आर्थिक वर्ष २०१६-१७ साठी) खालील प्रमाणे :
* लेखक मुंबईस्थित सनदी लेखाकार असून, वाचक त्यांना pravin3966@rediffmail.com या ई-मेलवर आपले प्रश्न पाठवू शकतील.