* प्रश्न: माझ्याकडे एका शेअर बाजारात सूचिबद्ध कंपनीचे काही वर्षांपूर्वी विकत घेतलेले शेअर्स आहेत. या शेअर्सवर मला २०१५-१६ या वर्षी बोनस शेअर्स मिळाले. हे सर्व शेअर्स (बोनस शेअर्ससहित) मी जर शेअर बाजारामार्फत विकले तर तर मला कर भरावा लागेल का? – अभय दातार, मुंबई
* प्रश्न: मी जून १९९५ मध्ये एका दुकानात पैसे गुंतविले होते. हे दुकान मी ७ लाख रुपयांना खरेदी केले होते आणि ते भाडय़ाने दिले होते. हे दुकान मी या वर्षी ७० लाख रुपयांना विकून एक घर विकत घेण्याचा विचार करीत आहे. यासाठी मला दुकानाच्या विक्रीवर होणाऱ्या नफ्यावर कर सवलत मिळू शकेल का? यासाठी काय करावे लागेल? – सीमा पुरंदरे, ई-मेलद्वारे
उत्तर : दुकानविक्रीवर होणारा भांडवली नफा हा दीर्घ मुदतीचा असेल. आपल्याला ‘कलम ५४ एफ’नुसार विक्री किमतीएवढी (विक्री खर्च वजा जाता) गुंतवणूक नवीन घरात केली तर त्यावर होणाऱ्या भांडवली नफ्यावर कर भरावा लागणार नाही. यासाठी काही अटींची पूर्तता करावी लागते. या अटी अशा- (अ) करदात्याकडे एकापेक्षा जास्त घरे (नवीन घराव्यतिरिक्त) नसली पाहिजेत. (ब) नवीन घर दुकानविक्री केलेल्या दिवसापासून दोन वर्षांच्या आत (बांधले तर तीन वर्षांच्या आत) विकत घेतले पाहिजे, म्हणजेच या नवीन घराचा ताबा या काळात मिळाला पाहिजे. (क) नवीन घर विकत घेण्यासाठी किंवा बांधण्यासाठी वरील कालावधी आहे. या कालावधीमध्ये दुकानविक्रीतून मिळालेले पैसे आपल्याला भांडवली खात्यात (कॅपिटल गेन अकाऊंट स्कीम, १९८८) ठेवावे लागतील आणि या खात्यातून नवीन घराचे पैसे द्यावे लागतील. हे खाते त्या वर्षीचे विवरणपत्र भरण्याच्या मुदतीपूर्वी उघडावे लागेल. (ड) या नवीन घराचे हस्तांतरण किंवा विक्री तीन वर्षे करता येणार नाही आणि केल्यास सवलत घेतलेल्या रकमेवर कर भरावा लागेल.
या अटींशिवाय आपल्याला या वर्षीच्या विवरणपत्रात हा व्यवहार दाखवावा लागेल.
* प्रश्न : माझे वय ६१ वर्षे आहे. माझ्या उत्पन्नामध्ये निवृत्तिवेतन आणि बँकेच्या मुदत ठेवींवरील व्याजाचा समावेश आहे. माझे करपात्र उत्पन्न कलम ८० क नुसार केलेली गुंतवणुका वजा जाता तीन लाख रुपयांपेक्षा कमी आहे. मला विवरणपत्र भरणे बंधनकारक आहे का? – रवींद्र देशपांडे, ईमेलद्वारे
उत्तर : प्राप्तिकर कायदा कलम १३९ नुसार ज्या ज्येष्ठ नागरिकांचे (ज्यांचे वय ६० वर्षांपेक्षा जास्त आहे आणि ८० वर्षांपेक्षा कमी आहे.) उत्पन्न कलम ८० च्या वजावटीपूर्वी ३ लाख रुपयांपेक्षा जास्त आहे त्यांना विवरणपत्र भरणे बंधनकारक आहे.
* प्रश्न : आपण मागील लेखात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना असे सांगितले होते की, पत्नीच्या नावाने ठेवलेल्या मुदत ठेवींवर पतीला कर भरावा लागतो. जर पतीने पत्नीला पैसे भेट दिले असते तर त्याचे उत्पन्न पत्नीला करपात्र झाले असते आणि पतीला कर भरावा लागला नसता. भेट दिलेली रक्कमसुद्धा ही ठरावीक नातेवाईकाला दिल्यामुळे करमुक्त आहे. हे बरोबर आहे का? – एम.बी. वाळके, पुणे
उत्तर : पतीने पत्नीला भेट दिलेली रक्कम ठरावीक नातेवाईकाकडून आली असल्यामुळे करमुक्त आहे हे बरोबर आहे; परंतु कलम ६४ नुसार पतीने पत्नीला दिलेल्या भेटीवर मिळालेल्या व्याजावर पतीलाच कर भरावा लागतो.
* प्रश्न : मी एप्रिल २०१५ मध्ये एक घर बिल्डरकडे बुक केले होते आणि मे २०१५ मध्ये मी बँकेतून गृहकर्ज घेतले. हे गृहकर्ज मी नोव्हेंबर २०१५ पासून फेडण्यास सुरुवात केली. या घराचा ताबा मी मे २०१६ मध्ये घेतला. मला २०१५-१६ या आर्थिक वर्षांत गृहकर्जाच्या मुद्दल आणि व्याजाच्या परतफेडीची किती वजावट मिळेल? – संजय दामले, ईमेलद्वारे
उत्तर : घराचा ताबा घेतल्याशिवाय गृहकर्जाच्या मुद्दल किंवा व्याजाच्या परतफेडीची उत्पन्नातून वजावट मिळत नाही. आपण घराचा ताबा मे २०१६ मध्ये म्हणजे आर्थिक वर्ष २०१६-१७ मध्ये घेतल्यामुळे, आर्थिक वर्ष २०१५-१६ मध्ये कोणतीही वजावट मिळणार नाही; परंतु २०१५-१६ या आर्थिक वर्षांत गृहकर्जावर घेतलेल्या व्याजाची वजावट, आपण घराचा ताबा घेतल्या वर्षांत आणि त्यापुढील चार वर्षांत अशी पाच वर्षांत सम प्रमाणात विभागून घेता येईल.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा