आतापर्यंत आपण ‘पोर्टफोलिओ बांधताना’ या सदरातून आपला पोर्टफोलिओ कसा बनवावा? तो बनवण्याच्या पायऱ्या काय आहेत? बचत आणि गुंतवणूक यात काय फरक आहे? गुंतवणूक कुठे करावी? कर कार्यक्षम गुंतवणूक म्हणजे काय? सोन्यात गुंतवणूक करावी का? शेअर बाजारात गुंतवणूक करणे फायदेशीर आहे का? मग ती कशात/ कशी  करावी? गुंतवणूक सल्लागाराची मदत घेणे का गरजेचे आहे? निवृत्तीपश्चात उत्पन्नाची तरतूद कशी करावी? अशा अनेक बाबी समजून घेतल्या. त्यासाठी अर्थात तुम्हा सर्वाचे साहाय्य लाभले.

तर मग आता आपल्याला गुंतवणूक कुठे, कधी, किती आणि कशात करायची हे समजले आहे. म्हणूनच आजच्या भागात आपण पाहणार आहोत की गुंतवणूक करताना काय काळजी घ्यावी आणि कोणत्या चुका टाळल्या पाहिजेत :

mita shetty
टाटा इंडिया इनोव्हेशन फंडाची कामगिरी कशी राहील?
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
rs 28677 crore withdrawn by foreign investors from stock market
शेअर बाजाराकडे परदेशी गुंतवणूकदारांची पाठ? बाजार कोसळण्याचे तेच एक कारण?
Jeevan pramaan online process
Money Mantra: हयातीचा दाखला ऑनलाईन मिळवण्यासाठी जीवन प्रमाण सुविधा काय आहे?
investors of DSK, Maval-Mulshi sub-divisional magistrate, Court, DSK,
‘डीएसके’ यांच्या गुंतवणूकदारांची यादी सादर करण्याचे मावळ-मुळशी उपविभागीय दंडाधिकाऱ्यांना न्यायालयाचे आदेश
loksatta editorial no interest rate cut by rbi retail inflation surges in october
अग्रलेख : म्हाताऱ्या शब्दांचा आरसा…
readers comments on Loksatta editorial,
लोकमानस : अर्थव्यवस्थेत वाढ, मग रुपयाची घसरण का?

१. योजना न करता गुंतवणूक करणे :

लक्षात ठेवा गुंतवणूक करणे म्हणजे एजंटला गाठणे, फॉर्म भरणे आणि धनादेश सुपूर्द करणे इतकेच नाही. जर आपल्याला संपत्ती निर्माण करायची असेल तर आपले उद्देश ठरविणे; अल्पकालीन, मध्यमकालीन आणि दीर्घकालीन उद्दिष्टे स्पष्ट असावीत आणि तशी योजना बनवून गुंतवणूक करणे गरजेचे आहे. योजना न बनवता, कोणताही उद्देश न ठरवता गुंतवणूक करणे हे तुमच्या संपत्ती निर्माणाच्या दृष्टीने अहितकारकच ठरेल.

२. गुंतवणूक विभागून (डायव्हर्सिफाय) न करणे :

असे म्हटले जाते की ‘Don’t put all eggs in one Basket’ (एकाच गुंतवणूक पर्यायात सगळा पैसा गुंतवूनका.) कारण असे केल्याने आपण फार मोठा धोका पत्करत असतो. जर तो गुंतवणूक पर्याय चांगला परतावा देत नसेल तर आपली पंचाईत होऊ  शकते. म्हणून विविध गुंतवणूक पर्यायांमध्ये गुंतवणूक करणे गरजेच आहे.

३. गुंतवणूक पर्यायाच्या धोक्याकडे दुर्लक्ष करणे :

स्वत:ची धोका पत्करण्याची क्षमता आणि इच्छा लक्षात न घेता केवळ नातेवाईक, मित्र-मैत्रिणींनी केली म्हणून किंवा कुठे तरी वाचले, ऐकले म्हणून गुंतवणूक करू नये. प्रथम तो पर्याय मला योग्य आहे का? त्यामध्ये कोणता धोका आहे आणि मी तो घेऊ  शकतो का? याचा विचार करून मगच गुंतवणूक करायची की नाही हे ठरवले पाहिजे.

४. गुंतवणुकीचे पुनरावलोकन न करणे :

ही नेहमी होणारी चूक आहे. एकदा गुंतवणूक केली की संपले, अशी आपली मानसिकता असते, पण आपण केलेल्या गुंतवणुकीत अडकून न पडता त्यामध्ये वेळोवेळी बदल करणे, ती तपासून पाहणे त्याचा आढावा घेणे गरजेचे आहे. हा बदल काळागणिक, गुंतवणूक करण्याचा अनुभव वाढल्याने, उत्पन्न वाढल्यामुळे, जोखीम घेण्याची क्षमता बदलल्याने किंवा ठरवलेला उद्देश पूर्ण झाल्याने किंवा बदलल्याने करणे गरजेचे आहे.

५. गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला न घेणे:

जसे आपण शारीरिक स्वास्थ्यासाठी स्वत:चे स्वत: औषध न घेता डॉक्टरांकडे जातो, तसेच आपल्या आर्थिक स्वास्थ्यासाठी गुंतवणूक सल्लागाराची मदत घेणे गरजेचे आहे. तो आपल्याला कशात, कधी, किती गुंतवणूक करावी हे सांगेल, आपल्या गुंतवणुकीवर लक्ष ठेवेल आणि जेव्हा गरज वाटेल तेव्हा नफा काढून घेण्याचा आणि परत कशात गुंतवणूक करावी याचा सल्लादेखील देईल. म्हणजेच आपला पोर्टफोलिओ समतोल राखण्याचे काम करेल.

हे लक्षात ठेवा:

* गुंतवणूक करण्याची घाई करू नका; सांगोपांग विचार करून, ठरवून गुंतवणूक करा

* गुंतवणूक करणे सोपे नाही; कधी कधी ती कंटाळवाणी, क्लिष्ट प्रक्रिया असू शकते

* गुंतवणूक करण्याचा उद्देश लक्षात घ्या; यातूनच आपल्याला काय हवे व त्यासाठी कोणत्या पर्यायात गुंतवणूक करावी हे ठरवणे सोपे जाईल, आपली धोका घेण्याची क्षमता आणि इच्छा समजून घ्या व त्यानुसार गुंतवणूक करा.

* वेगवेगळ्या गुंतवणूक पर्यायांत गुंतवणूक करा; त्याचे पुनरावलोकन करून, जरूर भासली तर त्यात बदल गरजेचा.

* आपत्कालीन फंड कधीही खर्च करू नका; तो अडीअडचणीसाठी वापरल्यास लगेच पुन्हा जमा करण्यास विसरू नका.

* गुंतवणूक करताना महागाई निर्देशांक लक्षात घेऊनच गुंतवणूक करा; जर महागाई दरापेक्षा जास्त परतावा नसेल तर तुमची गुंतवणूक अयोग्य समजावी.

* कर्ज काढून कधीही गुंतवणूक करू नका; स्थावर मालमत्ता गुंतवणुकीचा मात्र याला अपवाद.

*  योग्य गुंतवणूक सल्लागाराची मदत घेऊनच गुंतवणूक करा; ज्याच्यावर तुमचा विश्वास असेल असाच सल्लागार निवडा.

*     गुंतवणुकीचे पुनरावलोकन करायला विसरू नका; वेळोवेळी तपासून बघा व त्यात पाहिजे असल्यास बदल करा.

स्वाती शेवडे cashevade.swati @gmail.com

(लेखिका सनदी लेखपाल असून त्या पोर्टफोलिओ मॅनेजर म्हणूनही कार्यरत होत्या.)