गुंतवणूक १७,३८६ रुपये,केवळ नऊ  महिन्यांत ३,७०० रुपयांचा नफा!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लार्ज कॅप शेअर्समधील गुंतवणूक ही नेहमी सुरक्षित आणि उत्तम परतावा देणारी ठरते असा एक सर्वमान्य समाज आहे. ‘माझा पोर्टफोलियो’ अंतर्गत मात्र आपण नेहमीच एक वेगळा दृष्टिकोन ठेवून कंपन्या निवडत असतो. यंदा पोर्टफोलियोसाठी मुख्यत्वे स्मॉल कॅप आणि मिड कॅप शेअर्सवर भर दिला आहे आणि त्याचा अपेक्षित परिणाम दिसून येतोय.

एकूण १७,३८६ रुपयांच्या गुंतवणुकीवर ३,७०० रुपयांचा नफा केवळ नऊ  महिन्यांत मिळाला आहे. सरळ टक्केवारीने पोर्टफोलियोचा हा नऊमाही परतावा २१.३ टक्के आहे, तरीही या गुंतवणुकीवरील वार्षिकीकृच परताव्याचा दर (इंटर्नल रेट ऑफ रिटर्न – आयआरआर) हा तब्बल ६९.७६ टक्के आहे, हेही येथे लक्षात घ्यायलाच हवे. ‘माझा पोर्टफोलियो’ची कामगिरी ही मुंबई शेअर बाजारच्या गत नऊ महिन्यांतील १७.६० टक्के परताव्याच्या तुलनेत खूपच सरस आहे. सुचविलेल्या शेअर्सपैकी सेंच्युरी प्लाय, ल्युमॅक्स, एचपीसीएल, पॉलिमेडिक्युअर, केएनआर कन्स्ट्रक्शन्स आणि यूपीएल यांसारख्या कंपन्यांनी अल्पावधीतच उत्तम परतावा दिला आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे गुरुवारी २९ सप्टेंबर रोजी शेअर बाजारात मोठी पडझड होऊनही इतका उत्तम परतावा मिळाला आहे.

आपले नफ्याचे उद्दिष्ट पूर्ण झाले असल्याने पोर्टफोलियोचे गुंतवणूकदार हे शेअर्स विकून टाकून नफा पदरात पडून घेऊ  शकतात. बाकी शेअर्सचे काय करायचे हे मात्र गुंतवणूकदारांनी आपल्या उद्दिष्टाप्रमाणे ठरवायचे आहे. मात्र निवडलेले सर्वच शेअर्स एकत्र आणि एकाच वेळी उत्तम कामगिरी करून दाखवू शकत नाहीत हेही इथे लक्षात घ्यायला हवे.

‘माझा पोर्टफोलियो’ची कामगिरी सातत्याने  उत्तम कशी? 

असा गुंतवणूकदारांना प्रश्न पडला असेल तर त्याचे उत्तर म्हणजे स्वत: केलेला अभ्यास, सतर्कता, आत्मविश्वास आणि संयम. दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी संयम आवश्यक आहे. चलनवाढीवर मात करून उत्तम परताव्यासाठी म्युच्युअल फंड किंवा शेअर बाजार हाच पर्याय आहे आणि आतापर्यंतचा अनुभव पाहता दीर्घकालीन गुंतवणूकच फायद्याची ठरते हे सिद्ध झालेले आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांनी संधी मिळताच प्रत्येक पडझडीला शेअर बाजारातून उत्तम कंपन्यांचे शेअर्स टप्प्याटप्प्याने खरेदी करायचे धोरण ठेवावे. ज्यांना शेअर बाजारात विशेष गम्य नाही त्यांनी म्युच्युअल फंडाचा पर्याय निवडावा.

पोर्टफोलियोच्या वाचकांना आणि गुंतवणूकदारांना ही दिवाळी भरभराटीची जाणार हे आताच स्पष्ट झाले आहे, पुढील गुंतवणुकीसाठी शुभेच्छा!

आयआयआर’      काय आहे?*

परताव्याचा अंतर्गत दर (इंटर्नल रेट ऑफ रिटर्न – आयआरआर) हे गुंतवणुकीवरील संभाव्य नफा मोजण्यासाठी वापरले जाणारे सर्वमान्य परिमाण आहे. एका परीने हा वार्षिकीकृत परताव्याचा दर आहे. जे गुंतवणुकीचे नक्त वर्तमान मूल्य लक्षात घेऊन ज्यात भविष्यातील रोख प्रवाह शून्य गृहीत धरून वार्षिक कालावधीतील नफा ढोबळ रूपात पुढे आणते.

अजय वाळिंबे -stocksandwealth@gmail.com