फंडाविषयक विवरण
फंड प्रकार : समभाग गुंतवणूक असलेला फंड
जोखीम प्रकार : समभाग गुंतवणूक असल्याने धोका अधिक (मुद्दलाची शाश्वती नाही)
गुंतवणूक : हा फंड समभाग केंद्रित बॅलन्स्ड फंड आहे. मुंबई शेअर बाजाराचा ‘एस अँड पी बीएसई १००’ हा फंडाचा संदर्भ निर्देशांक आहे. गुंतवणूक केल्यापासून १२ महिन्यांच्या आत बाहेर पडल्यास १% निर्गमन शुल्क लागू. १२ महिन्यांनंतर फंडातून गुंतवणूक काढून घेतल्यास निर्गमन शुल्क शून्य आकारण्यात येते.
३१ ऑक्टोबर २०१५ रोजीच्या फंड विवरण पत्रकानुसार एकूण गुंतवणुकीच्या ९५.५६ टक्के समभागात व ३.६९ टक्के गुंतवणूक अल्प मुदतीच्या रोख्यात असून ०.७५ टक्के उर्वरित गुंतवणूक रोकड सममूल्य उछइड प्रकारात गुंतविली आहे.
फंड गंगाजळी : फंडाची मालमत्ता २,७७८ कोटी रु. ३०/१०/२०१५ रोजी
व्यवस्थापन : स्वाती कुलकर्णी या फंडाच्या समभाग निधी व्यवस्थापक आहेत. त्यांनी मुंबई विद्यापीठाची वाणिज्य शाखेतील पदवी व व्यवस्थापनातील पदव्युत्तर पदवी प्राप्त केली असून त्या ‘सीएफए’ आहेत. यूटीआय म्युच्युअल फंडात २२ वष्रे त्या निधी व्यवस्थापन विभागात काम करीत आहेत
पर्याय : वृद्धी (ग्रोथ) व लाभांश (डिव्हिडंड)
अन्य माहिती : या फंडात गुंतवणूक करण्यासाठी फंड घराण्याच्या http://www.utimf.com या संकेतस्थळाला भेट द्यावी किंवा १८०० २२ १२३० या क्रमांकावर संपर्क करावा.
ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवडय़ात या फंडाने फंड स्थापनेपासून २८ वर्षांतील २८ वे लाभांश वाटप केले. मागील २९ वर्षांत फंडाने आजपर्यंत २२४६ कोटीचे लाभांश वाटप केले असून या लाभांश वाटप केले असून ५४३.५० टक्के रक्कम आजपर्यंत युनिटधारकांना लाभांशाच्या रूपाने परत केली आहे. भारताच्या भांडवली बाजाराच्या व विशेषकरून म्युच्युअल फंडाच्या इतिहासात या फंडाचे विशेष स्थान आहे. हा फंड भारतातील ‘डायव्हर्सीफाईड इक्विटी’ फंड गटातील पहिला फंड आहे. हा फंड प्रामुख्याने ‘लार्ज कॅप’ प्रकारच्या समभागात गुंतवणूक करणारा फंड आहे. एचडीएफसी बँक, टीसीएस, इन्फोसिस, रिलायन्स इंडस्ट्रीज, आयसीआयसीआय बँक, अॅक्सिस बँक, भारत पेट्रोलियम, आयटीसी, सन फार्मा व लार्सन अँड टुब्रो या पहिल्या दहा गुंतवणुका आहेत. या आघाडीच्या दहा गुंतवणुकांची टक्केवारी एकूण गुंतवणुकीच्या ४४ टक्के आहे. हे या फंडाच्या गुंतवणूक धोरणाशी सुसंगत आहे. पहिल्या दहा गुंतवणुका एकूण गुंतवणुकांच्या ५० टक्क्याहून अधिक नसाव्यात, असे फंडाचे गुंतवणूक धोरण आहे. तसेच या फंडाच्या कुठल्याही एका उद्योगक्षेत्रात २५ टक्क्याहून अधिक व निर्देशांकात असलेल्या कुठल्याही एका कंपनीत ७.५ टक्क्याहून अधिक व निर्देशांकात समाविष्ट नसलेल्या समभागात ३ टक्क्याहून अधिक गुंतवणूक न करण्याचे धोरण आहे. या गुंतवणूक धोरणामुळे हा फंड कमी जोखीम घेऊन मध्यम परतावा मिळविणारा हा फंड आहे. साहजिकच हा फंड दीर्घकालीन गुंतवणूकदारांना अव्वल परतावा देणारा फंड ठरला आहे. एखाद्या बाजाराच्या तत्कालीन पसंतीच्या उद्योग क्षेत्रात किंवा एखाद्या समभागात जोखीम स्वीकारून या गुंतवणुकीमुळे इतर स्पर्धकांपेक्षा अतिरिक्त परतावा मिळविणे या फंडाच्या धोरण नसल्याने नेहमीच या फंडातील गुंतवणुका विकेंद्रित असतात. हा फंड अवास्तव जोखीम न पत्करणारा फंड असल्याने हा फंड परताव्याच्या दारात सातत्य राखून आहे. साधारण १५००० कोटींपेक्षा अधिक बाजारमूल्य असलेल्या कंपन्या लार्ज कॅप समजल्या जातात. साहजिकच या सर्वच कंपन्या एसएनपी बीएसई १०० किंवा तत्सम निर्देशांकाच्या यादीत समाविष्ट असतात. या योजनेसारख्या लार्ज कॅप केंद्रित फंडात गुंतवणूक करणे म्हणजे या आघाडीच्या कंपन्यांतून गुंतवणूक करणे होय. या लार्ज कॅप समभागात गुंतवणूक करणारे फंड हे नेहमीच मिड कॅप किंवा स्मॉल कॅप समभागातून गुंतवणूक करणाऱ्या फंडांपेक्षा कमी परतावा देतात.
mutualfund.arthvruttant@gmail.com
गुंतवणुकीला स्थैर्य..
या लार्ज कॅप समभागात गुंतवणूक करणारे फंड हे नेहमीच मिड कॅप किंवा स्मॉल कॅप समभागातून गुंतवणूक करणाऱ्या फंडांपेक्षा कमी परतावा देतात. परंतु लार्ज कॅप फंड गुंतवणुकीला स्थर्य देतात. सध्याच्या रोज वर-खाली होणाऱ्या निर्देशांकामुळे गुंतवणूकदारांनी नवीन गुंतवणुकीसाठी लार्ज कॅप फंडांची निवड करणे गुंतवणूकदारांच्या हिताचे आहे. दीर्घकालीन गुंतवणूकदारांनी आपल्या म्युच्युअल फंड गुंतवणूकीत आवर्जून स्थान द्यावे असा हा फंड आहे.
* मागील दहा वष्रे दरमहा १,००० रुपयाची एसआयपी गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांच्या १,२०,००० रुपये मुद्दलाचे १७ नोव्हेंबरच्या ‘रेग्युलर ग्रोथ एनएव्ही’ नुसार २,२४,६३९ रुपये झाले आहेत. अर्थात परताव्याचा दर १२.२२ टक्के इतका आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा