मागील महिन्यात कोणत्या निधी व्यवस्थापकांची स्वत:च्या फंडात किती गुंतवणूक आहे याचा तपशील असणारी बातमी एका अर्थविषयक वार्ताकनकरणाऱ्या दैनिकात प्रसिद्ध झाली होती. निवडक म्युच्युअल फंडाच्या निधी व्यवस्थापकांनी आपल्या बचतीचा मोठा हिस्सा आपण व्यवस्थापन करीत असलेल्या फंडातच गुंतविला असल्याचे या बातमीत म्हटले होते. काही निधी व्यवस्थापकांनी मात्र आपल्या बचतीचा मोठा हिस्सा आपल्या फंडाव्यतिरिक्त अन्य ठिकाणी गुंतविला असल्याचे दिसून आले. आपल्या फंडाच्या एकूण निधीपैकी १ टक्क्य़ांहून अधिक निधी स्वत:च्या फंडात गुंतविलेल्या फंड व्यवस्थापकांपैकी एक नाव होते राजीव ठक्कर. ते ‘पीपीएफएएस लाँग टर्म व्हॅल्यू फंडा’चे निधी व्यवस्थापक आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

समभाग गुंतवणुकीसाठी ‘व्हॅल्यू’ आणि ‘ग्रोथ’ ही दोन तंत्रे प्रामुख्याने अवलंबिली जातात. विकसित अर्थव्यवस्थांमध्ये समभाग गुंतवणूकदारांची पहिली पसंती नेहमीच ‘व्हॅल्यू फंडां’ना असते. अमेरिकेसारख्या प्रगत भांडवली बाजारात ‘व्हॅल्यू’ तंत्राने संपत्तीची निर्मिती करता येते हे बेंजामिन ग्रॅहम, वॉरेन बफे, ख्रिस्तोफर ब्राऊनी वॉल्टर श्लॉस यांच्यासारख्या ‘व्हॅल्यू इन्व्हेस्टर्स’नी सिद्ध केले आहे. त्यांनी या तंत्राच्या आधारे संपत्तीची निर्मिती तर केलीच, परंतु हे गुंतवणूक धोरण आपल्या लिखाणामुळे जगभरात लोकप्रिय केले. बेंजामिन ग्रॅहम यांची ‘सिक्युरिटी अ‍ॅनालिसिस (सह लेखक डेव्हिड डॉड) ‘द व्हॅल्यू इन्व्हेस्टर’ ‘द इंटेलिजन्ट इन्व्हेस्टर’ यांसारखी पुस्तकांतून ग्रॅहम यांनी या तंत्राचे सखोल विश्लेषण केले आहे. वरील पुस्तके गुंतवणूकविषयक सर्वकालीन उत्तम पुस्तके समजली जातात. बफे हे दरवर्षी आपल्या गुंतवणूकदारांना ‘लेटर टू शेअर होल्डर्स’ या मथळ्याखाली संदेश लिहून संबोधित करीत असतात. बफे यांची गुंतवणूकधारकांच्या वार्षिक सर्वसाधारण सभेतील भाषणे आणि त्यांची ही पत्रे वाचलेली मंडळी शेअर बाजाराला जुगार न समजता संपत्ती निर्मितीचे साधन का मानावे, याचे उद्बोधन घडते. भारतातून बफे यांचे विचार ऐकण्यासाठी वारकऱ्याच्या भावनेने अनेक मंडळी अमेरिकेच्या नेब्रस्का राज्यातील ओहामा शहरात दाखल होत असतात. पराग पारीख यांनी याच ‘व्हॅल्यू’ तंत्राचा वापर करून आपल्या अशिलांसाठी संपत्तीची निर्मिती केली. ‘पीएमएस’ प्रकारामुळे किमान गुंतवणूक २५ लाख रुपये असल्याने हे तंत्र सामान्य गुंतवणूकदारांच्या आवाक्याबाहेर होते. मूठभर धनाढय़ गुंतवणूकदारांपुरते मर्यादित असलेले हे तंत्र सामान्य गुंतवणूकदारांच्या आवाक्यात आणण्यासाठी त्यांनी ‘पीएमएस’ प्रकार बंद करून म्युच्युअल फंडाची स्थापना केली असल्याने या फंड घराण्याची ‘पीपीएफएएस लॉंग टर्म व्हॅल्यू फंड’ ही एकमात्र योजना आहे.

भारतात आर्थिक उदारीकरणाला सुरुवात झाल्यानंतर भारतीय गुंतवणूकदारांना ‘व्हॅल्यू’ तंत्राने गुंतवणूक करणाऱ्या फंडांची ओळख झाली. यापैकी १ डिसेंबर १९९३ रोजी पहिली एनएव्ही जाहीर केलेल्या एका व्हॅल्यू फंडात १,००० गुंतवणुकीचे ६ सप्टेंबर रोजी ९१ हजार रुपये झाले आहेत व वार्षिक परताव्याचा दर २२.१३ टक्के असून याच कालावधीत सेन्सेक्सने १०.४ टक्के व निफ्टीने १०.५८ टक्के वार्षिक परतावा दिला आहे. जे गुंतवणूकदार दीर्घ मुदतीच्या गुंतवणुकीतून संपत्तीची निर्मिती करू इच्छितात त्यांच्यासाठी ‘व्हॅल्यू फंड’ नेहमीच चांगला परतावा देतात हे या फंडाने दाखवून दिले आहे. आजच्या ‘इन्स्टंट’च्या जमान्यात पाच वर्षे हा कालावधीसुद्धा लाँग टर्म वाटावा अशी परिस्थिती आहे. ‘व्हॅल्यू फंड’ हे ग्रोथ फंडाच्या तुलनेत कमी ‘बीटा’ व कमी प्रमाणित विचलन असलेले फंड असल्यामुळे ‘व्हॅल्यू फंडां’चा जोखीम संलग्न परतावा ग्रोथ फंडापेक्षा अधिक असतो.

पीपीएफएएस लाँग टर्म व्हॅल्यू फंड हा गुंतवणुकीस कायम खुला असणारा व ‘व्हॅल्यू इन्व्हेस्टिंग’ तंत्राचा अवलंब करणारा फंड आहे. फंडाच्या एकूण गुंतवणुकीपैकी ६५ टक्के गुंतवणूक भारतीय कंपन्यांतून तर ३५ टक्के गुंतवणूक परदेशी कंपन्यांच्या समभागात केली आहे. देशी कंपन्यांच्या जोडीला या फंडाच्या गुंतवणुकीत सर्वाधिक गुंतवणूक अल्फाबेट इन्क. या गुगलच्या उपकंपनीत असून अन्य परदेशी गुंतवणुकांत आयबीएम, थ्री एम, नेस्ले (एडीआर), स्टँडर्ड चार्टर्ड बँक पीएलसी यांचा समावेश आहे. फंडाची अंशत: गुंतवणूक डॉलर निर्देशित असल्याने फंडाच्या गुंतवणुकीत आयएनआर – यूएसडी फ्युचरचा समावेश केलेला आहे. सर्वसाधारणपणे रुपयाचे अवमूल्यन होत असल्याने वार्षिक ३ ते ३.१५ टक्के परतावा या गुंतवणुकीतून मिळतो.  फंडाच्या दीर्घकालीन गुंतवणुकांत उच्च दर्जाचे व्यवस्थापन असणाऱ्या कंपन्यांचा समावेश होतो. या कंपन्यांची निवड भांडवली परताव्याचा दर, अन्य स्पर्धकांना नवीन व्यवसाय सुरूकरण्यास येणारे अडथळे, आणि गुंतवणूक करतेवेळचे मूल्यांकन यांचा दीर्घकालीन विचार करून गुंतवणुकीसाठी समभागांची निवड केली जाते. याचा परिणाम गुंतवणूकदारांना संदर्भ निर्देशांकाहून कायम अधिक परतावा (अल्फा) मिळाल्याचे आलेख क्रमांक १ मधून दिसून येते. वेगवेगळ्या कालावधीत या फंडाच्या परताव्याचा दर संदर्भ निर्देशांकापेक्षा सातत्याने दोन ते चार टक्के अधिक राहिला आहे.

भारतीय गुंतवणूकदारांना आपल्या गुंतवणुकीत मिड कॅप स्मॉल कॅप प्रकारचे फंड हवे असतात. या फंडात गुंतवणूक केल्यानंतर त्याच्या बरोबरीने येणाऱ्या बाजार मूल्यांच्या चढउतारांना सामोरे जाण्याची तयारी अनेक गुंतवणूकदारांची नसते. आयुर्विम्यासारख्या पारंपारिक गुंतवणूक साधनांतून मिळणाऱ्या विमाछत्र आणि ४ टक्के परतावा यांच्यापेक्षा दीर्घ मुदतीच्या समभाग गुंतवणुकीचा परतावा दर कैकपटीने अधिक आहे. भौतिक साधनांतून अभौतिक साधनांकडे वळू इच्छिणाऱ्या गुंतवणूकदरांसाठी आजचा फंड आदर्श पर्याय ठरावा. समभाग गुंतवणुकीचा परतावा व मिड कॅप स्मॉल कॅप पेक्षा कमी चढउतार असलेल्या या फंडाची गुंतवणूकदारांनी आठ ते १० वर्षांसाठी ‘सिप’पद्धतीने गुंतवणूक करण्यासाठी निवड आपल्या जोखीम स्वीकारण्याच्या क्षमतेनुसार आणि अर्थात आपल्या गुंतवणूक सल्लागाराच्या मदतीने करावी हीच आजची शिफारस.

पीपीएफएएस लाँग टर्म व्हॅल्यू फंड

‘व्हॅल्यू’ तंत्राने संपत्तीची निर्मिती करता येते हे बेंजामिन ग्रॅहम, वॉरेन बफे, ख्रिस्तोफर ब्राऊनी वॉल्टर श्लॉस यांच्यासारख्या ‘व्हॅल्यू इन्व्हेस्टर्स’नी सिद्ध केले आहे. त्यांनी या तंत्राच्या आधारे संपत्तीची निर्मिती तर केलीच, परंतु हे गुंतवणूक धोरण आपल्या लिखाणामुळे जगभरात लोकप्रिय केले. विकसित अर्थव्यवस्थांमध्ये समभाग गुंतवणूकदारांची पहिली पसंती नेहमीच ‘व्हॅल्यू फंडां’ना असते. अशाच एका ‘व्हॅल्यू इन्व्हेस्टिंग’ तंत्राचा अवलंब करणाऱ्या फंडाविषयी. भौतिक साधनांतून अभौतिक साधनांकडे वळू इच्छिणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी हा फंड आदर्श पर्याय ठरावा..

गुंतवणुकीची पाच पसंतीची क्षेत्रे

  • बँकिंग              १४.५३
  • इंटरनेट व तंत्रज्ञान १२.६७
  • वाहन व पूरक उद्योग ११.९२
  • आर्थिक सेवा        ७.७२
  • संगणक प्रणाली        ७.४०

गुंतवणूक असलेले आघाडीचे पाच समभाग

  • अल्फाबेट इन्क (गुगल)         ११.३५
  • महाराष्ट्र स्कूटर्स        ९.४०
  • एचडीएफसी बँक        ६.९३
  • इक्रा               ४.८७
  • पर्सिस्टंट सिस्टीम्स ४.४४

(अस्वीकृती: लेखात वापरलेली माहिती आकडेवारी ही उपलब्ध माहिती स्रोतांपासून घेतली आहे. या लेखाचा उद्देश या योजनेची वाचकांना ओळख व्हावी इतपतच मर्यादित आहे. वाचकांनी गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे अभिप्रेत आहे.)

shreeyachebaba@gmail.com