सुमारे शतकभराचा उद्योगवारसा असलेल्या दक्षिण भारतातील व्हीएसटी समूहाने जपानच्या मित्सुबिशी कंपनीबरोबर तांत्रिक करार करून १९६७ मध्ये पॉवर टिलर्स आणि डिझेल इंजिन उत्पादन या स्वतंत्र कंपनीद्वारे सुरू केले. एका उत्तम वंशावळीतील ही उमदी कंपनी आहे. १९८४ मध्ये मित्सुबिशीच्या साहाय्याने कंपनीने ट्रॅक्टर्सचे उत्पादनही  सुरू केले. सध्या कंपनीची सुमारे २५ हजार पॉवर टिलर्स, ३२ हजार इंजिन्स आणि ५ हजार ट्रॅक्टर्स उत्पादन करण्याची क्षमता आहे.
कंपनीचे प्रमुख उत्पादन पॉवर टिलर्स आणि ट्रॅक्टर्स असून कृषी क्षेत्रात ते प्रामुख्याने वापरले जाते. भारताखेरीज कंपनी आपल्या उत्पादनांची निर्यात प्रामुख्याने आफ्रिका, युरोप, कोरिया आणि थायलंड येथे करते. म्हैसूर, बंगळुरू आणि होसूर या तीन ठिकाणी कंपनीचे कारखाने आहेत. सातत्याने उत्तम कामगिरी करणाऱ्या या कंपनीने १९९८ आणि २०१० मध्ये २:१ प्रमाणात बोनस समभागांचे वाटप करून आपल्या भागधारकांना खूष केले आहे. केवळ ७ च्या आसपास किंमत-उत्पन्न गुणोत्तर (पी/ई) असणारा हा शेअर मध्यम ते दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी उत्तम वाटतो.
 व्हीएसटी टिलर्स ट्रॅक्टर्स लि.
सध्याचा भाव     रु. ४४३
वर्षांतील उच्चांक/नीचांक    रु. ५६३/४०७
प्रवर्तक     :    व्हीएसटी समूह
प्रमुख उत्पादन    : टिलर्स, ट्रॅक्टर्स निर्मिती
भरणा झालेले भागभांडवल    :    रु.  ८.६४ कोटी
प्रवर्तकांचा हिस्सा     :    ५३.८५ %
दर्शनी मूल्य       :     रु. १०
पुस्तकी मूल्य       :     रु. २३७
प्रतिभाग मिळकत (ईपीएस)    :    रु. ६०.९
किंमत-उत्पन्न गुणोत्तर (पी/ई)    :    ७.३ पट

Narayana Murthy Success Story
Success Story : एकेकाळी नोकरीसाठी मिळाला नकार; जिद्दीने उभी केली स्वतःची कंपनी अन् उभारला हजारो कोटींचा व्यवसाय
IND vs NZ AB de Villiers on Rishabh Pant Controversial Dismissal
IND vs NZ : ऋषभ पंतच्या वादग्रस्त विकेटवर…
My Portfolio Phoenix Mills Ltd
माझा पोर्टफोलियो : फिनिक्स मिल्स लिमिटेड
market leading stock for 50 years was Tata Deferred
बाजारातली माणसं- बाजाराला तालावर नाचवणारा समभाग : टाटा डिफर्ड
In yavatmal front of collectors office Shetkari Warkari Sangathan protested today while celebrated Black Diwali
यवतमाळ : काळी दिवाळी अन शिदोरी…, काय आहे नेमके प्रकरण जाणून घ्या
Started the business of selling organic eggs
Success Story : मेहनत व जिद्दीच्या जोरावर सुरू केला सेंद्रिय अंडी विकण्याचा व्यवसाय; आज वर्षाला करतात करोडोंची कमाई
Gig workers of companies providing online services in various sectors went on strike on Thursday
गिग कामगारांनी साजरी केली काळी दिवाळी! जाणून घ्या कारणे…
पेट्रोल पंपचालकांची दिवाळी यंदा गोड! सरकारकडून कमिशनमध्ये वाढ; भाववाढ नसल्याने ग्राहकांनाही दिलासा